‘आजचा सुधारक’ १ एप्रिलपासून नव्या, आंतरजालीय स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचणार!
पडघम - सांस्कृतिक
प्राजक्ता अतुल
  • ‘आजचा सुधारक’च्या वेबसाईटच्या पहिल्या पानावरील चित्र व वेबसाईटचा पत्ता
  • Mon , 18 March 2019
  • पडघम सांस्कृतिक आजचा सुधारक Aajcha Sudharak

१ एप्रिल १९९० रोजी सुरू झालेले ‘आजचा सुधारक’ हे नियतकालिक २०१६ पर्यंत म्हणजे २७ वर्षे सातत्याने प्रकाशित झाले. नियतकालिकाचे संस्थापक व प्रथम संपादक प्रा. दि. य. देशपांडे व त्यांच्या पत्नी प्रा. मनुताई नातू हे दोघेही आगरकर वाङ्मयाचे गाढे अभ्यासक होते. त्यानंतर ‘आजचा सुधारक’चे संपादकपद दिवाकर मोहनी, प्र. ब. कुळकर्णी, नंदा खरे, संजीवनी कुळकर्णी, अनुराधा मोहनी, प्रभाकर नानावटी, रवीन्द्र रुक्मिणी पंढरीनाथ यांनी भूषवले. विवेकवादी विचारांची कास धरणारे, तशा विचारांची धुरा वाहून नेणारे अनेक लोक सोबतीला असतानाही काही तांत्रिक अडचणींमुळे ते बंद करावे लागले होते. त्यावेळीदेखील ‘आजचा सुधारक’ एका नव्या स्वरूपात पुनश्च सुरू होईल अशी आशा, असा विश्वास अनेकांच्या मनात होता.

हे नियतकालिक पुन्हा सुरू होईल याविषयीचा विश्वास चुकीचा नसून येत्या १ एप्रिलपासून ते नव्या स्वरूपात वाचकांपर्यंत पोहोचवण्याचा मानस आहे. नवे प्रकाशन छापील स्वरूपात नसून ते आंतरजालीय स्वरूपाचे असेल आणि सुरुवातीला ते दर तीन महिन्यांतून एकदा प्रकाशित होईल. ‘सुधारक’ हे प्रत्येकालाच आपले व्यासपीठ वाटावे असे प्रयत्न सदोदित राहतील.

पहिल्या आवृत्तीच्या निमित्ताने आपले मनोगत व्यक्त करीत असताना दि.य. देशपांडे यांनी लिहिले होते, “श्रद्धावादी आणि भावनावादी लोकांचे आक्षेप असे आहेत की श्रद्धा आणि भावना या दोहोंनाही मानवी जीवनात महत्त्वाचे स्थान आहे. म्हणून विवेकाला थोडा आवर घालायला हवा. हे आक्षेप कितपत समर्पक आहेत? अशा प्रश्नांची हवी तितकी चर्चा अजून मराठीत झालेली नाही अशी आमची समजूत आहे. ती चर्चा घडवून आणणे हा या ‘नवा सुधारक’चा एक प्रधान उद्देश आहे. धर्माने आपल्या सामाजिक जीवनात घातलेला धुडगूस आजही तेवढ्याच, किंबहुना अधिक तीव्रपणे चालू आहे. अंधश्रद्धा, जादूटोणा, मंत्रतंत्र, बुवाबाजी इत्यादि गोष्टी पूर्वीइतक्याच जोमाने सुरू आहेत. शनिवार, सोमवार, चतुर्थी, एकादशी इत्यादि उपासतापासांना ऊत आला आहे. जुन्या देवळांचे जीर्णोद्धार होताहेत आणि नवीन मंदिरे बनताहेत. कुंभमेळे, गंगास्नान, यज्ञयाग आणि सर्व जातिभेद अजून पूर्वीइतकाच तळ ठोकून आहेत. राजकारणात निवडणुकांच्या निमित्ताने त्याला उघड आवाहन केले जात आहे. दलित आणि स्त्रिया यांवरील अत्याचाराने परिसीमा गाठली आहे. जिकडे नजर फिरवावी तिकडे कालची स्थिती आजच्यापेक्षा बरी होती असे म्हणण्याची पाळी आली आहे. या सर्व शोचनीय स्थितीवर उपाययोजना करणे अतिशय कठीण आहे. आभाळच फाटल्यावर त्याला ठिगळ तरी कोठे कोठे लावणार? परंतु तरी या कामास प्रत्येकाने हातभार लावणे जरूर आहे असे आम्हाला वाटते आणि म्हणून त्यात आपला वाटा उचलणे आम्ही आपले कर्तव्य समजतो.”

‘आजचा सुधारक’सारखी नियतकालिके ही जितकी वाचकांची असतात, तितकीच ती लिहिणार्‍यांची असतात. निरनिराळ्या विषयांवर विवेकी आणि परखड लिखाण करणार्‍या अनेकांकरिता हा नवा आंतरजालीय अंक मुक्तपणे व्यक्त होण्याचे व्यासपीठ ठरेल असा विश्वास वाटतो. sudharak.in या ठिकाणी हे अंक प्रकाशित होतील. या संकेतस्थळावरच ‘आजचा सुधारक’चे मागचे सगळे अंकही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न सुरू आहे.

२०१९ निवडणुकांचे वर्ष आहे. निवडणुकांच्या तारखाही नुकत्याच घोषित झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर पहिला अंक राजकारणावर भाष्य करणारा असावा असे वाटते.

लोकशाही अधिक सक्षम कशी करता येईल, त्याकरता नेमके कोणते बदल असावेत, त्याची अंमलबजावणी कशी व्हावी, लोकशाहीत लोकांचा सहभाग कसा वाढवावा, सामान्य माणूस राजकारणाविषयी सजग कसा होऊ शकतो, ‘दुसरा किती वाईट’ अशा नकारात्मक रीतीने निवडणुका लढवण्यापेक्षा ‘मी कसा चांगला’ या सकारात्मक मार्गाने निवडणुका लढवल्या जाऊ शकतात का, ‘नोटा’चे (NOTA) औचित्य व त्याची निकड या व अशा विविध विषयांवर अनेकांगी लेखन होऊ शकते.

तेव्हा राजकारण व निवडणुका यांच्या अनुषंगाने आपले लेख २५ मार्च २०१९ पर्यंत आमच्याकडे पाठवावेत असे sudharak.in च्या वतीने आम्ही आवाहन करतो. 

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

Post Comment

Shashikant Vandana

Mon , 18 March 2019

विवेकवादी चिंतनाला वाहिलेल्या या त्रैमासिकास पुनर्जिवन मिळत आहे हे वाचून आनंद झाला.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘आप’च्या पराभवाची जबाबदारी अरविंद केजरीवाल यांची आहे. त्यांच्या अहंमन्य तत्त्वशून्य आणि स्वार्थी राजकारणामुळे ‘आप’चा पराभव झाला...

अशा तत्त्वशून्य अहंमन्यतेचा पराभव होणं गरजेचं होतं. तसा तो झाला. याबाबतीत वाईट वाटण्याचं कोणतंच कारण नाही. भ्रष्टाचारविहीन शुद्ध चारित्र्याच्या राजकारणाचे स्वप्न ‘इंडिया अगेन्स करप्शन’ आंदोलनाने जनतेला दाखवले होते. त्याकडे मध्यमवर्गीय समाज आणि तरुण आकर्षितही झाले होते. या मध्यमवर्गाचा भ्रमनिरास करण्याचं पाप केजरीवालांनी केलं आणि त्याची शिक्षा त्यांना मिळाली. दुःख इतकंच की, ‘सापनाथ गेला आणि नागनाथ आला’.......

आजच्या राजकीय वातावरणात हर्षवर्धन सपकाळ हा ‘गांधीवादी साधेपणा’चा ब्रँड आदर्श, स्वप्नवत (युटोपियन) वाटू शकतो, परंतु तीच त्यांची खासीयत आहे!

हर्षवर्धन सपकाळ पारंपरिक राजकारण्याच्या साच्यात बसत नाहीत. ते कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेल्या कुटुंबातून येतात. त्यांचे आई-वडील सरकारी कर्मचारी होते. त्यामुळे स्वतःच स्वतःला घडवलेल्या नेत्यांपैकी ते एक आहेत. त्यांनी १९९०च्या दशकात औपचारिकपणे काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यांचा राजकीय प्रवास त्यांच्या गावच्या सरपंच पदापासून सुरू झाला. काँग्रेसला पुन्हा उभारणे हे आता सपकाळ यांच्यासमोरचे आव्हान आहे.......