प्रणव मुखर्जींनी संघाच्या व्यासपीठावर जाऊन नेमके काय कमावले?
पडघम - देशकारण
टीम अक्षरनामा
  • माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी नागपुरात संघ स्वयंसेवकांसमोर भाषण करताना
  • Tue , 12 June 2018
  • पडघम देशकारण डॉ. मोहन भागवत Mohan Bhagwat काँग्रेस Congress संघ RSS प्रणव मुखर्जी Pranab Mukherjee

आपल्या विरोधी विचारांच्या विचारपीठावर जावे की जाऊ नये, याबाबत मतभिन्नता आहे. ती असते. असावी. ती अशीच टिकून राहावी. मतभेदांवर चर्चा व्हायला हव्यात. ती लोकशाहीची गरज आहे. त्यामुळे माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर जाऊन आले. त्यावर देशभर चर्चा झाल्या. मुखर्जींच्या कन्येपासून अनेक सन्मानीयांनी याबाबत मते मांडली आहेत. आता सगळे शांत झाल्यावर मुखर्जींनी या व्यासपीठावर जाऊन काय कमावले आणि काय गमावले, हे समजून घ्यायला हवे.

कार्यक्रमानंतर लगेचच मुखर्जींच्या एका छायाचित्रावर काही बदल करून जो प्रकार घडवला गेला, तो निषेधार्य आहे. पण ते होणारच होते. अर्थात तेवढ्या एका घटनेमुळे मुखर्जींचे जाणे चूक ठरवता येत नाही किंवा तेवढ्यावरून नुकसान मोजता येत नाही. पण या विषयाचे गांभीर्य अन परिणामाचे स्वरूप त्यापलीकडे आहे. जे परिणाम दिसत आहेत आणि जे आगामी काळातही दिसतील याचा अंदाज मुखर्जींना आला नसेल का?

मुखर्जी धूर्त व अनुभवी नेते म्हणून प्रसिद्ध आहेत. अशा माणसाचे पाऊल चूक असेल का? किंवा अशा गोष्टीला चूक–बरोबर यादीत बसवणे योग्य आहे का? पहिल्यांदा ते संघ व्यासपीठावर जाणे स्वाभाविक होते, हे समजून घेतले पाहिजे. मुखर्जी पक्के काँग्रेसी असले तरी मुळात ते श्रद्धाळू आहेत. त्यांच्या श्रद्धाळूपणाचा एक वाचनात आलेला पुरावा असा की, ते १९७७ पासून राष्ट्रपती होईपर्यंत दिल्लीत तालकटोरा रोडवरील एकाच घरात राहिले. दिल्लीच्या सत्तेत घर कुठे आहे, यावरून स्थान ठरते. असे असताना मुखर्जी अर्थमंत्री झाले तरी त्यांना जनपथकडे यावेसे वाटले नाही. कारण त्यांना १९७७ ला मिळालेल्या घराला ते ‘पावन’ मानत होते. त्यांच्या दृष्टीने त्या घरात आल्यावर प्रगती झाली आहे. मग असे घर कशाला सोडायचे?

श्रद्धा हा ज्याच्या त्याचा चॉईस असतो. पण मुखर्जींच्या अंतप्रेरणा समजल्याशिवाय त्यांच्या संघाच्या व्यासपीठावर जाण्याचा अर्थ समजून घेता येणाक नाही. राजकीय नेत्यांना काहीच वर्ज्य मानून चालत नाही. त्यातच मुखर्जी हे काँग्रेसचे ‘संकटमोचक’ होते. त्यांच्यात वैचारिक उदारपण होते. म्हणूनच त्यांना ‘संकटमोचक’ होता आले.

मुखर्जींच्या अंतप्रेरणेचा आणखी एक संदर्भ असा की, मुखर्जी नवरात्रामध्ये नियमितपणे गावी जात आले आहेत. पश्चिम बंगालमध्ये  दुर्गापूजेला  राजकीय महत्त्व आहे. मुखर्जी अन काँग्रेस पश्चिम बंगालात केव्हाच हद्दपार झालेले आहेत. तरीही ते त्या पूजेला जात होते. यातूनही त्यांचा श्रद्धाळूपणा दिसून येतो.

थोडक्यात मुखर्जी राजकीयदृष्ट्या काँग्रेसी असले तरी काँग्रेसमध्ये राहुन श्रद्धाळूपण जपत असलेल्या नेत्यांपैकी एक आहेत.  

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4425

.............................................................................................................................................

मुखर्जी संघाच्या व्यासपीठावर गेल्याने त्याला स्वाभाविक राजकीय वळण लागले. म्हणजे मोदी पुढचे पंतप्रधान होऊ शकले नाहीत, तर मुखर्जींना संधी देण्याचा संघाचा ‘बी प्लॅन’ आहे, इथवर अर्थ काढले गेले. मुखर्जी उदारमतवादी प्रवाहातील नेते आहेत. त्यातच राष्ट्रपती पदावरून निवृत्त झाल्याने त्यांच्यावर कुठे जावे याची बंधने नाहीत. त्यातच संघाच्या थेट पार्श्वभूमीत घडलेली व्यक्ती जर राष्ट्रपती होऊ शकत असेल तर माजी राष्ट्रपतींनी अशा कार्यक्रमांना जाण्यात चूक काय, हा प्रश्न त्यांच्या मनात असणार.

पण मुखर्जींच्या जाण्याने डावीकडे झुकलेला अन संघ-भाजप नको म्हणणारा वर्ग दुखावला गेला, हे काँग्रेसचे अप्रत्यक्ष नुकसान आहे. कारण प्रणव मुखर्जी प्रचंड अनुभवी नेते आहेत. दिल्लीच्या राजकारणात सदा सर्वदा आपल्या शांत स्वभावासह त्यांनी एक वजन प्राप्त केलेले आहे. दिल्लीसाठी जे धूर्तपण लागतं, ते त्यांच्याकडे सुरुवातीपासून आहे. केंद्रात मनमोहनसिंग सरकार असताना त्यांना अनेकदा ‘संकटमोचका’च्या भूमिकेत आपण पाहिले आहे. काँग्रेसवर डावी किंवा उजवीकडून जेव्हा जेव्हा आक्रमण झाली, तेव्हा त्यातून त्यांनी वाचवलेले आहे. ते मनमोहन सिंग यांच्याइतके सोनिया गांधींचे ऐकत नाहीत म्हणून ते राष्ट्रपती झाले. अन्यथा त्यांना पंतप्रधान करण्यात काहीही अडचण नव्हती. काँग्रेसला जी एकाग्रतेसारखी निष्ठा लागते, ती प्रणव मुखर्जींकडे नाही.

खरे तर मुखर्जींना पंतप्रधान का केले नाही याचे उत्तर त्यांनीच संघाच्या विचारपीठावर जाऊन दिले आहे. संघ स्वतःचे सरकार असताना काँग्रेसी वातावरणात वाढलेल्या, घडलेल्या व्यक्तीला सन्मानपूर्वक बोलावत असेल तर त्यात उदात्त हेतू आहे असे एका प्रवाहाला वाटते आहे. मुखर्जींच्या जाण्याने संघाचा एक हेतू प्रचंड प्रमाणात सिद्ध झाला. तो म्हणजे संघ जे काही वर्ग भरवतो, ते अख्ख्या देशाला नीट माहीत झाले. अन्यथा अन्य कोणा व्यक्तीला बोलावण्याने या कार्यक्रमाकडे लक्ष वेधता आले नसते. तो उद्देश मुखर्जींमुळे अतिशय नेमकेपणाने सफल झाला आहे.  

संघ याच समाजातील सांस्कृतिक जाणीवांचे प्रतीकात्मक संघटन  आहे. संघाला जाहीरपणे अनेक गोष्टी मान्य असतात. पण संघाचा व्यवहार तेवढा निर्हेतुक नसतो. संघ लोकशाही मानतो असे म्हणतो, संघ घटना मानतो असे म्हणतो, संघ विविधता मानतो असे म्हणतो, पण या सगळ्या बोलायच्या गोष्टी आहेत असा आरोप होतो, तेव्हा संघ फारसे लॉजिकल स्पष्टीकरण देत नाही.  स्वातंत्र्याच्या चळवळीत संघ कुठेही नव्हता, हे जरी खरे असले तरी संघाच्या गत इतिहासातील मर्यादित अर्थाने ना का होईना, जी अधिमान्यता कमावली आहे, ती नाकारून कसे चालेल? संघात दोष आहेत, तसे दोष अनेक संघटनांमध्ये आहेत. पण असे असले तरी भाजप पक्ष म्हणून आकार घेण्यापूर्वी संघ विचाराचे अनेक लोक काँग्रेसमध्ये होते. किंबहुना उजवीकडे झुकलेला मोठा गट काँग्रेसचा भाग होते. ज्येष्ठ काँग्रेस नेते सलमान खुर्शीद यांनी मागे या संदर्भात खुलासा केला होता.

प्रत्यक्ष राजकारण यशस्वी करण्यासाठी संघ विचारांच्या अनेकांनी काँग्रेसचा मार्ग अवलंबला होता. मात्र त्यांच्या सामाजिक निष्ठा संघाला अभिप्रेत असतील अशाच होत्या असे मानले जाते. यामध्ये एक गोष्ट महत्त्वाची अशी की, ज्या काळात संघ उदयाला आला, त्यावेळी स्वातंत्र्य चळवळ अखेरच्या टप्यावर होती. काळाच्या अनुषंगाने जरी लक्षात घेतले तरी या काळात धर्माचे प्रेम कमी नव्हते. काँग्रेस ही काही जन्मतः धर्मनिरपेक्ष लोकांची संघटना नव्हती. ती शेवटी तत्कालीन भारतीय समाजाचेच एक प्रतिबिंब होती.

त्यामुळे संघाच्या व्यासपीठावर जाऊन मुखर्जी जे काही बोलून आले, त्याचे मर्यादित अर्थाने का होईना स्वागत व्हायला हवे. मुखर्जींनी आणखी भारदस्त अन आक्रमक बोलायले हवे होते, ते ते बोलले नाहीत म्हणून काहींनी प्रश्न उपस्थित केले आहेत. अशा अपेक्षावजा भूमिकांचे स्वागत करून एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. ती अशी- ज्या कुठल्या विरोधी विचारांच्या व्यासपीठावर एखादी व्यक्ती जाते, तेव्हा तिने त्या व्यासपीठाच्या मर्यादाही समजून घेतल्या पाहिजेत. कारण विरोधात बोलणे सोपे असते. पण जिथे आपण बोलतो आहोत, तिथे काय पचेल याचा अंदाज घेतला पाहिजे. ज्यांनी सन्मानाने बोलावले आहे, त्यांनी त्यांचे माप काढण्यासाठी बोलावलेले नसते, हे लक्षात ठेवावेच लागते. अन्यथा तो औचित्यभंग होतो. मुखर्जींनी औचित्यभंगाचे भान राखले हे लक्षात घ्यायला हवे. संघाचे काय चुकते आहे हे त्यांनी सांगितलं नाही, पण काय बरोबर आहे, हे मात्र नेमकेपणाने सांगितले आहे. 

............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......

स्वयंपाकघरात टांगलेल्या कॅलेंडरवरच्या चित्राइतकीच थरारकता वा जाहिरातीतून एखादं उत्साहवर्धक पेय विकणार्‍या म्हातार्‍या अमिताभ बच्चनइतकीच विश्वासार्हता, दहा वर्षं राष्ट्रीय व्यासपीठावर वावरलेल्या मोदींच्या व्यक्तिमत्त्वामध्ये उरली आहे...

प्रचारसभांमधून दिसणारे पंतप्रधान दमले-भागलेले, निष्प्रभ झालेले आहेत. प्रमाणापलीकडे वापरलेली छबी, अतिरिक्त भलामण आणि अतिश्रम, यांमुळे त्यांची ‘रया’ गेल्यासारखी वाटते. एखाद्या ‘टी-ट्वेंटी’ सामन्यात जसप्रीत बूमराला वीसच्या वीस षटकं गोलंदाजी करायला लावावी, तसं काहीसं हे झालेलं आहे. आक्रसत गेलेला मोदींचा ‘भक्तपंथ’ टिकून असला, तरी ‘करिष्मा’ उर्फ ‘जादू’ मात्र चाकोरीबद्ध झालेली आहे.......

भाजपच्या ७६ पानी ‘जाहीरनाम्या’त पंतप्रधान नरेंद्र मोदींची तब्बल ५३ छायाचित्रं आहेत. त्यामुळे हा जाहीरनामा आहे की, मोदींचा ‘छायाचित्र अल्बम’ आहे, असा प्रश्न पडतो

काँग्रेसच्या ४८ पानी जाहीरनाम्यात राहुल गांधींची फक्त पाच छायाचित्रं आहेत. त्यातली तीन काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्यासोबत आहेत. याउलट भाजपच्या जाहीरनाम्याच्या मुखपृष्ठावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठीमागे बळंच हसताहेत अशा स्वरूपाचं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांचं छायाचित्र आहे. त्यातली ‘बिटवीन द लाईन’ खूप सूचक आणि स्पष्टता सूचित करणारी आहे.......

जर्मनीत २० हजार हत्तींचा कळप सोडण्याची धमकी एका देशाने दिली आहे, ही ‘हेडलाईन’ जगभरच्या प्रसारमाध्यमांमध्ये गाजतेय सध्या…

अफ्रिका खंडातील बोत्सवाना हा मुळात गरीब देश आहे. त्यातच एवढे हत्ती म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. शेतांमध्ये येऊन हत्ती मोठ्या प्रमाणात पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकरी वैतागले आहेत. याची दखल बोत्सवानाचे अध्यक्ष मोक्ग्वेत्सी मेस्सी यांनी घेतली आहे. त्यामुळेच त्यांनी संतापून एक मोठी घोषणा केली आहे. ती म्हणजे तब्बल २० हजार हत्तींचा कळप थेट जर्मनीमध्ये पाठवण्याची. अनेक माध्यमांमध्ये ही ‘हेडलाईन’ गाजते आहे.......