बारसूची रणभूमी : आज कोकणी माणूस सत्तेच्या विरोधात धैर्याने उभा आहे. त्याचा हजारो वर्षांपूर्वीचा पूर्वज राजापूरच्या विस्तृत पठारावर उभा होता, तसाच

बारसू सोलगावमध्ये पेट्रोकेमिकल रिफायनरी प्रकल्पाबद्दल नकारात्मक भावना तयार झाली आहे. पोलिसांनी मोर्चेकऱ्यांवर सौम्य का होईना लाठीमार केल्यामुळेही असंतोषाचे वातावरण आहे. कोकणी माणूस हा अत्यंत निश्चयी आहे, हे त्याच्या संघर्षाचा दीर्घ इतिहास सांगतो. कोकणातील लोक पोलिसी खाक्याला घाबरत नाहीत किंवा राजकीय दबावालाही बळी पडत नाहीत. त्यांच्या अस्तित्वाचा प्रश्न आल्यावर ते कोणालाही शिंगावर घेऊ शकतात.......