“पाटीलबुवा, तुम्हाला धन्यवाद, आम्हाला मूळ पदावर आणले म्हणून!”
संकीर्ण - ललित
जयदेव डोळे
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 29 November 2025
  • संकीर्ण ललित सेल्फ सर्व्हिस Self-service स्वयंसेवा व्हॉलंटिअर Volunteer

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

“नाना, तुम्ही स्वत:चे कपडे स्वत: धुतले आहेत का? आपली कपबशी आपण विसळली आहे का? आपले कपडे घरी इस्त्रीने कडक केले आहेत का? मुलांना शाळेत सोडायला किंवा घरी न्यायला स्वत: गेला आहात का? शेतात मजूर कमी पडला म्हणून तुम्ही कापसाची बोंडे वेचली किंवा टोमॅटो तोडले आहेत का? घरी झाडलोट करायला कोणी नाही म्हणून सारे घर केरसुणीने झाडून स्वच्छ केले आहे का? आमच्या मते ही ‘स्वयंसेवा’. गांधीजी तिला ‘स्वावलंबन’ म्हणत. गांधीवादी, समाजवादी तसे करत. पुलंनी अशा स्वयंसेवेची टिंगलही एका नाटकात उडवली आहे. शक्यतो इतरांवर आपला बोजा नको, अशी धारणा या स्वयंसेवेमागे असे. आताही घराघरांत अंथरुणे आवरणे, केरवारा करणे, घरातली धूळ साफ करणे, भाज्या निवडणे, संडास धुणे आदी कामे मुलांना शिकवली जातात. या कामांमधले काहीही सार्वजनिक काम नाही. म्हणून ते राष्ट्रीयही नाही. देशासाठी करायची ती कामे नाहीत. तरीही त्यांच्याकडे ‘व्हॉलिंटिअर’ म्हणून नव्हे, ‘सेल्फ सर्व्हिस’ म्हणूनही नव्हे, केवळ जबाबदारी आणि कर्तव्य म्हणूनच बघितले जाते. बघितले पाहिजे.”

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

‘ताबडतोब जिथं असाल तिथून निघून घरी या!’ नानांचा जरबेचा आवाज आमच्या कानात त्यांच्या घरी पोचेपर्यंत घुमत राहिला. त्यांचा बुलावा आला त्या वेळी आम्ही प्रभातशाखेच्या बाहेर परममित्र पक्क्याची वाट बघत आमच्या दुचाकीवर बसून होतो. शाखेत लाठी मिरवतेवेळी चुकून म्हणे एकाची लाठी त्याच्या नरडीवर बसली आणि आम्ही पक्क्याचे सेवक झालो. त्याला हवे तिथे नेणे-आणणे आमचे राष्ट्रकर्तव्य ठरले. आम्ही पक्क्याला विचारलेसुद्धा की, ‘जे तू आमच्याकडून करवून घेत आहेस, त्याला काय म्हणणार? सेवा की स्वयंसेवा, की परसेवा?’

आधी पक्क्याला असा प्रश्न विचारणे आवडले नाही. तो म्हणाला, ‘लेका, मित्रकर्तव्याला असे काही नाव देता येत नसते! तुला जमले तर कर, नाहीतर फूट!’ माझे उत्तर लगेच तयार झाले. म्हटले, ‘फूट म्हणजे इंग्रजी भाषेतला पाय ना? तुझा फूट निकामी झालेला आहे. तो बरा होईपर्यंत मी कसा फुटेन? सध्या तुझी फूटतूट झालेली असल्याने तुला माझी गरज आहे. गरजवंत तू आहेस, मी नाही. सेवा माझी गरज नाही…’

माझा आवाज शाखेतून बाहेर पडणारे ऐकू लागले, तसे पक्क्याने ‘चल, चल लवकर’ असं म्हणत आम्हाला चालते केले. आम्ही त्याला त्या संवादाआधी नानांचा तातडीचा निरोप सांगितल्याने त्याचीही हजेरी नानांच्या बैठकीत लागणार होती. इलाज नव्हता. तरीही माझ्या डोक्यात अन् कदाचित पक्क्याच्याही डोक्यात ‘सेवा’ हा शब्द (किंवा मानवी कृती) नीट गडबड करीत राहिला.

पक्क्या आणि आम्ही बालपणीचे मित्र असल्याने आमच्यात टेलिपथी खूप चालते. न बोलता आम्ही बरेच विचार सारखे करत असतो. त्यामुळे आम्ही सतत सहमत असतो. धुसफूस अशी आमच्यात नसतेच. पक्क्या जे करील ते मात्र आम्ही न करण्याचे ठरवले होते. शाखा आम्हाला पूर्ण वर्ज्य होती. ते केसाळ पायांनी अर्धी चड्डी घालून अन् सफेद फूलशर्टाच्या बाह्या दंडावर दुमडून लाकडी दंड मिरवत जाणे आम्हाला पसंत नव्हते. त्याहून अधिक आमचा आक्षेप असे- तो प्रश्नांची उत्तरे न देण्याच्या त्यांच्या कार्यपद्धतीला. आम्ही अनेकदा पक्क्याला पटवून प्रश्न विचारायला लावले, शाखाप्रमुखांना अन् बौद्धिकासाठी आलेल्या प्रमुख पाहुण्यांना. कोण येणार आहे ते आम्ही पक्क्याकडून आधीच जाणत असू. कारण त्या पाहुण्यांना ने-आण करू शकणारा पक्क्या एकमेव कारमालक व कारचालक असा दोन्ही होता. आमचा तो कट फसला.

तर आम्ही दोघेही नानांकडे निघालो. नाना आजकाल शाखेत जात नसत. काहीतरी बिनसले असावे. काय नेमके खटकलेय त्याचा छडा आज लावायचाच या बेताने आम्ही तयारी केलेलीच होती. तशात पक्क्यासोबत असल्याने आम्हाला थोडा हुरूपही आलेला होता.

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now

.................................................................................................................................................................

‘जय श्रीराम’चा भगवा ध्वज नानांच्या घरावर फडकत नव्हता. वारे नसल्याने तो मलूल, मान टाकून होता. फाटक उघडून आम्ही आत आमची दुचाकी घेतली. कारण पाय तुटक्या आणि तात्पुरत्या दिव्यांग पक्क्याला जास्त चालायला लागू नये ही आमची धडपड. हातातल्या दंडाचा लंगड्याच्या काठीसारखा वापर करत पक्क्या आधी पायऱ्या चढून वर गेला. आम्ही दुचाकीला व्यवस्थित कडेला उभी करून त्याच्या मागोमाग गेलो.

नाना समोरच्या खोलीत म्हणजे त्यांच्या दिवाणखान्यात बसलेले दिसले. चांगलेच घुश्श्यात होते. कपाळावर आठ्या, नजर कुठेतरी शून्यात हरवलेली. दोन्ही हातांची बोटे सतत काही बोलायच्या खटपटीत असावीत, अशी हलवताना दिसले. आम्ही दोघेही समोरच बसलो. नानांनी आमची दखल घेतली आणि पुन्हा ते हरवून गेले. दोन मिनिटे शांततेत गेली. पक्क्याचा फोन वाजला. त्याने नानांची तंद्रा मोडली. पक्क्या लंगडी मारत मारत एका पायावर अंगणातल्या ओसरीवर जाऊन बोलू लागला. आम्ही नानांकडे व्याकूळ होत पाहत राहिलो. काय झाले? कशासाठी तातडीने बोलावले? कोण गेलेबिले की काय? मौतीला जावे लागले की काय? आमचे प्रश्नाळू डोके उत्तरांच्या शोधात भरकटू लागले.

‘हं, आलात? बरं झालं! बोलूयात लगेच…’, ‘अहो, ऐकलेत का? पाटीलबुवा आणि प्रकाशजी आले आहेत. त्यांच्यासाठी काही तरी आणा बरं…’ नानांनी आधी मान आमच्याकडे करून आणि नंतर उजवीकडे स्वयंपाकघराच्या दिशेने वळवत तोंड उघडले. आम्ही सावरलो.

नाना पक्के शाखानिष्ठ आहेत. मात्र त्यांचे-आमचे चांगले जमले. आम्ही त्यांच्या मूळगावचे पाटील. त्यांचे घर आमच्या लगतच असे. लहानपणापासून त्यांचा परिचय होता. दोघांचे राजकीय विचार भिन्न, मात्र नानांना का कोण जाणे, आमच्यासारखे टीकाकार फार प्रिय. आमच्याशी वाद घालत, पण कधी वैर अथवा दुश्मनी फिरकली नाही त्यांच्याआमच्यात. काही महत्त्वाचे असो की मामुली, ते आमच्याशी सल्लामसलत करू बघत. कधी तसा आव आणत, तर कधी खरंच चौकशा करत. मात्र संभाषण करायला निमित्त जरूर शोधून ठेवत. तर असाच काहीसा प्रसंग असावा, असा आमचा कयास त्यांनी ‘तातडीने या’ असे बजावल्यामुळे जरा डगमगू लागला होता. कधी कधी परिचितसुद्धा अनोळखी होतात. नाही?

पक्क्या आत येईपर्यंत नानांनी बोलायला सुरुवात केली. तसा पक्क्या त्यांच्या काही कामाचा नसे आणि नव्हता. त्याची बौद्धिक कुवत त्यांना नीट ठाऊक होती. दोघेही संघिष्ट. मात्र काही वैचारिक देवाणघेवाणीचे प्रसंग आम्ही हजर असल्याशिवाय नाना पार पडू देत नसत.

“पाटीलबुवा, तुमची हजेरी अगदी भटासारखी बरं का. त्यानं मंत्र म्हटल्यावरच जसं कार्य पार पडल्याचा संतोष मिळतो, तसा तुमचा सल्ला! आम्हाला सारंच काही पटणार नाही तुमचं. मात्र तुमचं विश्लेषण ऐकत राहावं असं असतं.” अशी आमची तारीफ नाना नेहमी आम्हाला ऐकवत. नानांनी मग प्रश्नाचा पत्ता आम्हापुढे फेकला- “हां, पाटीलबुवा, एक सांगा. सेवा म्हंजे नेमकं काय? सेवा, स्वयंसेवा, परसेवा कशाला म्हणतात अन् कशानं ठरतात?”

आम्ही चाट! अगदी हेच प्रश्न आमच्या मेंदूत खळबळ माजवत होते. पक्क्याच्यादेखील मेंदूत खळबळ माजवत असणार. आमच्यातला वाद आमच्या नकळत पक्क्याने नानांना सांगितला की काय? पण तशी संधी त्याला मिळणे अशक्य. आम्ही मघापासून एकत्रच होतो. आम्ही चमकलो. आता नाना आमच्या टेलिपथीत शिरले की काय? ही टेलिपथी-शाखा होत चालली की काय? संघात कोणी कोणाला सुगावा लागू देत नाही म्हणतात! इथे तर ‘मन की बात, बिनबोभाट’ होत चालल्याने आमचे धाबे दणाणले. क्षणभर आम्ही बुचकळ्यात पडलो.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

“मला वाटते, पाटीलबुवा, तुम्ही जी ‘स्वयंस्फूर्ती’ आणि ‘अंत:प्रेरणा’ सांगितली, ती या उपजतबुद्धीला टक्कर देते, असे माझे मत होऊ लागले आहे. ठरवून सेवा करणे वा सेवेसाठी पुढाकार घेणे आणि आपापत: विचार न करता संकटकाळी धावणे, यांत फरक नाही का? सेवा करायला जाण्यापूर्वी मनाचा कौल मागणे अथवा त्याची तयारी आहे काय सेवेची, अशी विचारणा करणे, माझ्या मते प्रतारणाच आहे!” ‘कशाची प्रतारण नाना?’ आम्ही नानांचा हा धबधबा थांबताच प्रश्न केला. ते तयारच होते. म्हणाले, “स्वत:शी केलेली प्रतारणा! आम्ही जर आमचे कार्य ईश्वरी असल्याचे मानतो, तर ही ईश्वराशी केलेली फसवणूक आहे, असे मला वाटू लागले आहे.”

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

नानांना आमच्या टेलिपथीत मुळीच न घेता बाहेरच्या बाहेर कटवावे असे ठरवून आम्ही म्हटले, “नाना, प्रश्न अगदी त्रोटक होतोय. थोडा तपशील भरला तर चर्चेस सोपे जाईल.”

नाना बोलू लागले, “बघा पाटील, आम्ही बालपणापास्नं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे. कधी मनात शंका आणू दिली नाही, परंतु आजकाल या प्रश्नानं फार सतावलंय. आम्ही परवा नातवंडांसह मॉलमध्ये गेलो, कँटिनमध्ये गेलो. तर सर्वत्र ‘सेल्फ सर्व्हिस’ असं इंग्रजीत, तर ‘स्वयंसेवा’ असं देवनागरीत लिहिलेलं वाचायला मिळालं. मॉलमध्ये आपलं सामान आपणच निवडायचं हे अंगवळणी पडलंय. कँटिनमध्येही चहा वगैरे रांगेतून स्वत: घ्यायचा हेही पटलं आणि जमलंही. सवाल असा की, ही ‘स्वयंसेवा’ आणि आमची म्हणजे संघाची ‘स्वयंसेवा’ यांत फरक काय? शाखेत जाणे, राष्ट्रप्रेम व्यक्त करणे, प्रार्थना म्हणणे, संचलन करत फिरणे, व्यायाम करणे, अशा ‘शाखीय’ कृतींत स्वयंसेवा कोठून आली? मॉलमध्ये सारे स्वयंसेवक हे गिऱ्हाईक असतात. संघातले लोक मग कशा प्रकारचे ठरवायचे, आम्हाला कळेनासं झालंय!”

आमचा पुरता फज्जा उडाला. आम्ही भयंकर मोठ्या उत्सूकतेने नानांकडे धाव घेतली, तर हा असा पेचप्रसंग नानांनी आम्हापुढे उभा केला. “नाना, आम्ही काही तुमच्यासारखे शाखावाले नाही. त्यामुळे तिथल्या सेवेचा किंवा स्वयंसेवेचा आम्हाला थोडाही गंध नाही. बाहेरची सेवा कशी चालते, याची थोडीफार कल्पना आहे. तुमचे समाधान होईल अशी काही माहिती आम्हापाशी नाही. उगाच शाब्दिक खेळ केल्यासारखं होईल. म्हणून तुम्ही बोलत राहा. आम्ही त्यावर मतप्रदर्शन नंतर करू.” आम्ही बोललो.

नाना पुढे सांगू लागले, “आम्ही खरोखर असा शब्दार्थ कधी करून पाहिला नाही हो! ‘सेल्फ सर्व्हिस’ म्हणजे ‘स्वयंसेवा’ असे कधी वाटलेच नाही आम्हाला! देशाची सेवा म्हणजे स्वयंसेवा असे वाटले होते आम्हाला. तशा अर्थाने मग आम्ही ‘स्वयंसेवक’ म्हणवून घेऊ लागलो.”

नानांच्या शेजारी दोन-तीन मराठी शब्दकोश का होते, त्याचा उलगडा आता आम्हाला झाला. खरे तर आल्या आल्याच विचारणार होतो नानांना. पण म्हटले रागरंग पाहू अन् मग विचारू. नानांचा मन:स्ताप कमी व्हावा म्हणून आम्ही ‘बघू, हे शब्दकोश काय म्हणतात बरं?’ असे बोलत संघातल्यासारखे लक्षविचलन करून टाकले. ‘स्वयंसेवा म्हणजे स्वेच्छेने वा स्वयंप्रेरणेने केलेली सेवा’ असा अर्थ एक कोश देत होता; तर दुसऱ्याने ‘मोबदल्याशिवाय काहीही करण्यासाठी स्वच्छेने तयार असणारा तो स्वयंसेवक’ असा अर्थ सांगितलेला; तिसऱ्याने ‘आपणहून, अंत:स्फूर्तीने सेवेस तयार होणारा’ असे म्हटले. थोडक्यात, इंग्रजीत ‘व्हॉलंटिअर’ असा जो शब्द असतो, त्याचे हे सुबक आणि सालस भाषांतर होय. थोडेफार ‘नि:स्वार्थी’ असेही म्हणता येईल.

नानांची समजूत घालण्यासाठी आम्ही म्हटले, “नाना, एवढे सचिंत होऊ नका. येऊनजाऊन जी सेवा तुम्ही इतकी वर्षं बजावत आहात, ती स्वयंस्फूर्तीने जरी असली, तरी ती आहे परसेवाच! दुसऱ्यांचीच करतो ना सेवा माणूस? स्वत:ची सेवा कशी करता येईल त्याला?”

सुंस्कारित असल्यामुळे नाना तसे स्वयंभू आणि सार्वभौम होते. आपण जे कार्य करतो ते थेट ईश्वरी कार्य असल्याचा त्यांचा पक्का समज झालेला होता. तसा तो शाखांमधल्या सर्वांचाच असतो. त्यांना आपण कधीही चुकीचे असू, याची अपराधजाणीव होत नसते. परमेश्वर सतत त्यांच्या ‘सोबत’ असतो. मग चुकीचे असे काय घडणार हातून, असा त्यांचा हेका असतो. शंका, संशय, संभ्रम अथवा दुविधा कधीही त्यांच्या वाट्याला येत नसते. वाटेवर लागणाऱ्या शाखांमध्येही तिला ठाम मज्जाव असतो. नाना आम्हाला कधी साशंक, शंकित अथवा द्विधा मन:स्थितीत दिसले नव्हते. आमच्याशी वाद घालतेवेळीही ते सतत ठोस व ठाम मते मांडतात. त्यांना शास्त्रीय आधार तसा काही नसतो. तरीही वाद घालायला आम्हीच लागतो त्यांना! ते कशासाठी, आम्ही कधी जाणायचा प्रयत्न केला नाही.

तरीही नानांचे काही भलेथोरले बिनसलेय असे जाणवू लागले आम्हाला. त्यांनीच मग मनातली तगमग बाहेर काढावी, तशा सुरात बोलणे सुरू केले. “पाटीलबुवा, नुसती ‘सेवा’ म्हटले की, आईबापाची, थोरामोठ्यांची, देवाधर्माची असे मनात आपोआप येते. ‘स्वयंसेवा’ असे म्हटले की, तुम्ही सांगितल्यानुसार स्वेच्छा, आत्मप्रेरणा लागते. आता मला सांगा, आपल्या पुढ्यात एखादी व्यक्ती धडपडली अन् तिला उभे राहता येईना. तर आपण कशाचीही परवानगी न घेता, मागेपुढे न बघता धावतो ना तिच्याकडे? आपणच नव्हे, आजूबाजूचे सारेच जण तिकडे धाव घेतात. याचा अर्थ माणसाची मूळ प्रेरणा सेवा करणे, मदतीला जाणे, असा मला वाटतो. आपण कडमडलो तरीही शेजारचे लोक धावून येतात. या कृतीला ‘स्वयंप्रेरणा’ असे म्हणावे की, ‘उपजतबुद्धी’? समजा आग लागली आहे. अशा जळत्या घरात जाण्यापूर्वी मनात आपल्या सुरक्षेचा विचार येणारच. अत्यंत आजारी माणसाचा आजार आपल्यालाही होऊ शकतो, असा विचार त्याला औषधोपचार करणाऱ्या व्यक्तीच्या मनात येणार नाही का?

“मला वाटते, पाटीलबुवा, तुम्ही जी ‘स्वयंस्फूर्ती’ आणि ‘अंत:प्रेरणा’ सांगितली, ती या उपजतबुद्धीला टक्कर देते, असे माझे मत होऊ लागले आहे. ठरवून सेवा करणे वा सेवेसाठी पुढाकार घेणे आणि आपापत: विचार न करता संकटकाळी धावणे, यांत फरक नाही का? सेवा करायला जाण्यापूर्वी मनाचा कौल मागणे अथवा त्याची तयारी आहे काय सेवेची, अशी विचारणा करणे, माझ्या मते प्रतारणाच आहे!”

‘कशाची प्रतारण नाना?’ आम्ही नानांचा हा धबधबा थांबताच प्रश्न केला. ते तयारच होते. म्हणाले, “स्वत:शी केलेली प्रतारणा! आम्ही जर आमचे कार्य ईश्वरी असल्याचे मानतो, तर ही ईश्वराशी केलेली फसवणूक आहे, असे मला वाटू लागले आहे.”

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

आम्ही अगदी आठवून आठवून नानांना ठाऊक असलेली स्वयंसेवा कशा प्रकारचे असते, याचा मनाशी काथ्याकूट करू लागलो. संघाची आमच्यासारख्यांच्या स्मरणात असलेली सेवा आपत्तींमधली आणि वाईट घटनांपुरती असल्याचे आम्हाला आमच्या मन:चक्षुंवर दिसू लागले. भूकंप झालाय, मोठी पडझड झालीय, खाकी चड्डी घातलेले लोक प्रेते नेते आहेत, अशी छायाचित्रे पाहिल्याचे आम्हाला आठवले. पूर किंवा तशाच काही दुर्घटनांवर संघाच्या स्वयंसेवकाचे नाते घट्ट जोडले गेल्याने तेवढेच स्मरण आम्हाला होत असल्याचे आम्हाला जाणवले. अन्य विधायक अथवा सुखद किंवा आनंदी प्रसंगी स्वयंसेवकांची फळी कार्यरत वा कार्यमग्न आहे, असे आमच्या डोळ्यांपुढे येईना.

_ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ __ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _ _

नाना आता तत्त्वज्ञानाच्या अगाध अन् अगम्य प्रांतात शिरू पाहत आहेत, असा आमचा ग्रह झाला. तेवढ्यात आपला प्रदीर्घ कॉल संपवून पक्क्या व्हरांड्यातून दिवाणखान्यात प्रवेशला. तो बहुधा बाहेरून आमचे संभाषण ऐकत फोनवर बोलत असावा असे वाटले. तो मध्येच पचकला, ‘‘परंतु नानाजी, उपजत प्रेरणांवर नियंत्रण म्हणजे संस्कार ना? सुसंस्कृत माणूस कोण, तर ज्याने त्याच्या उपजत इच्छा-आकांक्षा यांच्यावर हुकमत मिळवली तो. शाखा सुरू झाल्यावर जे करता येऊ लागले ते हेच किनई? माणसाच्या मनाला आपल्याला हवे ते वळण लावणे, याचा अर्थच मुळी संस्कार! ते आपण मिळवतो तसे आपणही करत जात असतो. आता तुम्हाला जे वाटते ते साफ चुकीचे आहे. कारण सारे काही तो ईश्वर निश्चित करतो. आपण सगळे त्याच्या हातची खेळणी…”

पक्क्याला एवढे कळते, असे प्रश्न आमच्या दोघांच्याही चेहऱ्यांवर उमटले. नानांना हे पक्क्याचे रूप केवळ अनपेक्षित होते. तो न थांबता पुढे म्हणाला, “अहो, स्वयंसेवा ही खरी परसेवा असते. आपण स्वयंसेवक जरी असलो, तरी असतो परसेवकच! स्वहून जे इतर असतात ते देशातलेच असतात. म्हणून आपण स्वयंसेवक जे करू, ते सारे देशसेवेत गणले जाते!”

पक्क्याचे हे उत्तर अगदी बरोबर होते. त्याची जी तर्कबुद्धी होती, ती तशीच घडवली गेली होती. त्याने सरळ रेषेत बेरीज करून टाकली होती. नाना पुष्कळच बरोबर होते. विचारपूर्वक आणि पूर्वनियोजित सेवा कशी काय उपजत असू शकते, हे त्यांना वाटणे साहजिक होते. ‘सोशल सर्व्हिस’ आणि ‘सेल्फ सर्व्हिस’ यांच्यात त्यांचा घोळ झाला होता, पण तो फक्त त्यांचाच नव्हता.

आम्ही अगदी आठवून आठवून नानांना ठाऊक असलेली स्वयंसेवा कशा प्रकारचे असते, याचा मनाशी काथ्याकूट करू लागलो. संघाची आमच्यासारख्यांच्या स्मरणात असलेली सेवा आपत्तींमधली आणि वाईट घटनांपुरती असल्याचे आम्हाला आमच्या मन:चक्षुंवर दिसू लागले. भूकंप झालाय, मोठी पडझड झालीय, खाकी चड्डी घातलेले लोक प्रेते नेते आहेत, अशी छायाचित्रे पाहिल्याचे आम्हाला आठवले. पूर किंवा तशाच काही दुर्घटनांवर संघाच्या स्वयंसेवकाचे नाते घट्ट जोडले गेल्याने तेवढेच स्मरण आम्हाला होत असल्याचे आम्हाला जाणवले. अन्य विधायक अथवा सुखद किंवा आनंदी प्रसंगी स्वयंसेवकांची फळी कार्यरत वा कार्यमग्न आहे, असे आमच्या डोळ्यांपुढे येईना.

कॉलनीतल्या नोकरदार जोडप्यांची मुले पाळणाघरात विनाशुल्क सांभाळण्याची, खेडोपाडी बायांना कष्ट पडू नयेत म्हणून पाण्याच्या कळश्या, बादल्या, पिंपे डोक्यावर वाहून नेण्याची, पानपट्ट्यांच्या समोरचा कचरा वेचून डब्ब्यांत भरण्याची, तुंबलेली गटारे उपसून घाण पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याची, अपार्टमेंटमधील चारचाकी वाहने स्वच्छ करून देण्याची, मुलींच्या वसतीगृहांत सॅनिटरी नॅपकिन्स पोचवण्याची, तसेच मुलींच्या शाळांत प्रसाधनगृहे बांधून देण्यात पुढाकार घेण्याची, शिकवणी वर्गांसाठी शहरांत जाऊन राहणाऱ्या तरुण-तरुणींना सकाळी नाश्ता देण्याची, गरीब विद्यार्थ्यांना त्यांच्या शाळा बंद पडल्यावर शिक्षक म्हणून काही विषय शिकवून तयार करण्याची, बिबटे ग्रामीण भागात धुमाकूळ घालत असताना रात्रीच्या सुमारास लाठ्या आपटत गस्त घालण्याची… अशी कितीतरी प्रकारची स्वयंसेवा आवश्यक असताना ती मात्र स्वयंसेवक अजिबात करत नसल्याचे आम्हाला डाचू लागले. नानांच्याही स्वयंसेवकपणाचा आम्हाला संशय येऊ लागला.

“नाना, तुम्ही स्वत:चे कपडे स्वत: धुतले आहेत का? आपली कपबशी आपण विसळली आहे का? आपले कपडे घरी इस्त्रीने कडक केले आहेत का? मुलांना शाळेत सोडायला किंवा घरी न्यायला स्वत: गेला आहात का? शेतात मजूर कमी पडला म्हणून तुम्ही कापसाची बोंडे वेचली किंवा टोमॅटो तोडले आहेत का? घरी झाडलोट करायला कोणी नाही म्हणून सारे घर केरसुणीने झाडून स्वच्छ केले आहे का? आमच्या मते ही ‘स्वयंसेवा’. गांधीजी तिला ‘स्वावलंबन’ म्हणत. गांधीवादी, समाजवादी तसे करत. पुलंनी अशा स्वयंसेवेची टिंगलही एका नाटकात उडवली आहे. शक्यतो इतरांवर आपला बोजा नको, अशी धारणा या स्वयंसेवेमागे असे. आताही घराघरांत अंथरुणे आवरणे, केरवारा करणे, घरातली धूळ साफ करणे, भाज्या निवडणे, संडास धुणे आदी कामे मुलांना शिकवली जातात. या कामांमधले काहीही सार्वजनिक काम नाही. म्हणून ते राष्ट्रीयही नाही. देशासाठी करायची ती कामे नाहीत. तरीही त्यांच्याकडे ‘व्हॉलिंटिअर’ म्हणून नव्हे, ‘सेल्फ सर्व्हिस’ म्हणूनही नव्हे, केवळ जबाबदारी आणि कर्तव्य म्हणूनच बघितले जाते. बघितले पाहिजे.”

.................................................................................................................................................................

​Facebookवर अपडेट्ससाठी पहा- https://www.facebook.com/aksharnama/

Twitterवर अपडेट्ससाठी पहा- https://twitter.com/aksharnama1

Telegramवर अपडेट्ससाठी पहा- https://t.me/aksharnama

Whatsappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/jlvP4

Kooappवर अपडेट्ससाठी पहा- https://shorturl.at/ftRY6

.................................................................................................................................................................

नाना शांतपणे डोळे रोखून आमचे हे प्रवचन ऐकत राहिले. त्यांच्या बोटांच्या हालचाली थांबल्या. त्यांची अस्वस्थता संपली. ते थोडे सावरले. तेवढ्यात त्यांच्या पत्नी आमच्यासाठी चहा घेऊन आल्या. नाना जागेवरून हललेसुद्धा नाहीत. त्यांचे नेहमीचे म्हणणे असे की, कर्तबगार अन् कमावत्या पुरुषांनी घरकाम करून आणखी स्वत:ला कष्टवू नये. ज्यांना घरकाम उत्तम जमते त्यांनीच ते करावे. इतरांनी त्यात लुडबूड केल्यास विचका होतो.

शेवटी आम्हीच जागेवरून उठलो आणि वहिनींच्या हातातून ट्रे घेतला. सर्वांपुढे तो नेत अखेरीस आमचा कप आम्ही घेतला आणि नाना काय बोलतात, याची वाट पाहू लागलो. नाना दोन घोट घेऊन सुरू झाले-

“पाटीलबुवा, हे जे तुम्ही वर्णन केले किंवा उदाहरणे दिली ती सारी ‘अराष्ट्रीय’ आहेत. आम्ही जी स्वयंसेवा म्हणतो, ती ‘राष्ट्रीय’ असते. आम्ही सारे स्वयंसेवक ‘राष्ट्रीय’ आहोत. तुमची त्या दाखल्यांमधली स्वयंसेवा घरगुती, गावठी आणि गल्लीछाप आहे. आता आमच्या डोक्यात प्रकाश पडला. आम्ही उगाच संभ्रमात पडलो. मॉलमधली ‘सेल्फ सर्व्हिस’ अर्थात ‘स्वयंसेवा’ स्वार्थासाठी आहे. तुम्हाला चॉईस दिल्यासारखे दाखवायचे, मात्र प्रत्यक्षात समोर ठेवलेल्या वस्तूंमधूनच तुम्ही निवडता. यात कसले आले निवड स्वातंत्र्य?”

नानांना मध्येच थांबवत आम्ही म्हणालो, “मग नाना, तुम्ही ईशान्येकडच्या राज्यांत शाळा चालवता ते योग्य आहे, परंतु तुमचा हेतू हिंदुत्वाचा प्रसार आणि ख्रिश्चन मिशनऱ्यांना पर्याय असा आहे. मग ती नि:स्वार्थ अथवा निर्हेतूक अशी स्वयंसेवा कशी?”

नाना कुत्सितपणे हसत म्हणाले, “आलात तुम्ही मूळ पदावर? ‘स्वयं’ला म्हणजे ‘आम्हाला’ जे पटते, ते अन्य लोकांनाही पटले पाहिजे, म्हणून आम्ही जे करतो, ती ‘स्वयंसेवा’! इतरांना काय वाटते, ते कोण विचारतो? शंका फिटली आमची. तुम्हाला धन्यवाद, आम्हाला मूळ पदावर आणले म्हणून!”

..................................................................................................................................................................

लेखक जयदेव डोळे माध्यम विश्लेषक आहेत.

djaidev1957@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

वाचकहो, गेल्या नऊ वर्षांपासून आम्ही अक्षरक्ष: पदरमोड करून ‘अक्षरनामा’ हे मराठी फीचर पोर्टल चालवत आहोत. काही मोजके हितचिंतक वर्गणीदार मदत करतात, पण ती फारच तुटपुंजी होते. कुठल्याही व्यावसायिक तडजोडी न करता आणि सत्ताशरण न होता, पत्रकारिता करणाऱ्यांसाठी सध्याचा काळ अजिबात चांगला नाही. तरीदेखील आम्ही निदान अजून तरी हार मानलेली नाही. आम्हाला तुमच्या आर्थिक पाठबळाची नितांत गरज आहे. ‘अक्षरनामा’ केवळ तुमच्या पाठबळावरच तग धरून राहू शकते. 

Pay Now 

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......

शिरोजीची बखर : प्रकरण २६ - आंदोलने, घोषणाबाजी, रस्त्यावर येणे, हा असंतोषाचा एक ‘सेफ्टी व्हॉल्व्ह’ असतो, परंतु मोदीशासन आपल्या ‘टूलकिट’वरच खुश होते!

‘वोट-चोरी’बद्दल मुख्य मुद्द्यांवर कुणीच काहीच बोलत नव्हते. सरकार आणि निवडणूक आयोग काहीतरी मोघम बोलून वेळ मारून नेत होते. लोकांना आपल्या हीरोने खोटेपणा केलेला चालत नाही. अंधभक्तांचा विषय नव्हता, पण संवेदनशील मोदीभक्तांचा भ्रमनिरास होत चालला होता. नोटबंदी, जीएसटी आणि कोव्हिड लॉकडाउन या फटक्यातून अर्थव्यवस्था उठत नव्हती. त्यात ट्रम्प महाशयांनी भारतावर १०० टक्के टॅरिफ लावले. म्हणजे अजून एक झटका.......

शिरोजीची बखर : प्रकरण २५ - २०२४मधील लोकसभा निवडणूक आणि त्या काळात झालेल्या इतर निवडणुका, यांच्याबाबत राहुल गांधी, योगेंद्र यादव आणि परकला प्रभाकर यांनी शेरलॉक होम्सची ‘डिडक्टिव्ह मेथड’ हा प्रकार सुरू केला होता…

परकला प्रभाकर निवडणुकीतील भ्रष्टाचाराचा एक ‘बर्ड्स आय व्ह्यू’ दाखवायच्या प्रयत्नात होते, राहुल गांधी डेटा मायनिंग करून नक्की खिलवाड कसा झाला, हे दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते आणि योगेंद्र यादव या भ्रष्टाचाराचे नवनवीन आयाम दाखवून द्यायच्या प्रयत्नात होते. शिरोजीची सर्व लोकशाहीवादी पात्रे ‘काहीतरी अयोग्य घडले आहे’ या निष्कर्षावर पोहोचली होती. निवडणूक आयोगाचा अडेलतट्टूपणा त्या संशयात तेल ओतत होता.......

शिरोजीची बखर : प्रकरण तेविसावे – राहुल गांधी यांनी २०२५ सालच्या जुलै महिन्यात संशयाचा फार मोठा भोवरा निर्माण केला होता, आणि निवडणूक आयोगाने याद्या आणि व्हिडिओ न दिल्यामुळे दिवसामाशी संशय वाढत होता

‘वोट चोरी’च्या आरोपांमुळे खूप अस्वस्थता माजली होती! हे प्रकरण काय वळण घेणार म्हणून भाजप अस्वस्थ, या संधीचा फायदा आपल्याला उठवता येणार की नाही म्हणून काँग्रेस पक्ष अस्वस्थ, त्याच कारणासाठी काँग्रेसचे सहकारी पक्ष अस्वस्थ, यात आपले काय होणार म्हणून भाजपचे सहकारी पक्ष अस्वस्थ आणि ही ‘वोट चोरी’ खरी असेल तर लोकशाहीचे काय होणार, या विचारांमुळे विचारवंत अस्वस्थ! सर्वदूर अस्वस्थता! .......

शिरोजीची बखर : प्रकरण बावीस - ‘मध्यमवर्ग’ ही समाजाची ‘लिंच पिन’ असते, पण ती राजकीय स्वार्थासाठी ‘मोदीकालीन भारता’त जाणूनबुजून खिळखिळी केली गेली होती...

ते सुशिक्षित नाहियेत, फक्त कॉलेजातून पास झालेले आहेत. ते धार्मिक नाहियेत, फक्त कर्मकांडी आहेत. ते खऱ्या अर्थाने नैतिक नाहियेत, फक्त अंधपणे परंपरा पाळणारे आहेत. ते सदाचारी नाहियेत, त्यांचा सदाचार फक्त भीतीमधून जन्मलेला आहे. ते समृद्ध नाहियेत, फक्त श्रीमंत आहेत. ते प्रामाणिक नाहियेत, फक्त गुलाम आणि खुशमस्करे आहेत. ते समाजाच्या भल्यासाठी काम करणारे नाहियेत, फक्त देशभक्तीच्या उथळ घोषणा देणारे आहेत.......