राज्यकर्त्यांवर धाक ठेवण्यासाठी थोरो-गांधीजी यांनी आखून दिलेला आणि काळाच्या कसोटीवर उतरलेला ‘सविनय कायदेभंगा’चा मार्ग, हेच प्रभावी साधन आहे

वैयक्तिक सत्याग्रहाचा गांधीजी-विनोबा प्रयोग जरी भारतात झाला असला, तरी आज अशी उदाहरणं भारतात कमी बघायला मिळतात आणि अशा व्यक्तीची स्वीकारार्हताही आपल्याकडे कमी दिसते. ग्रेटा थूनबर्गला स्वीडनमध्ये मिळणारी वागणूक आणि दिशा रवीस आपल्याकडे मिळणार प्रतिसाद, यात खूप तफावत पाहायला मिळते. ‘सविनय कायदेभंग’ हा कितीही नकोसा असला तरी राज्यकर्त्यांनी आंदोलनाविषयी किमान सहानुभूती दाखवण्याची आवश्यकता असते.......

असं वाटतं की, व्हॉटसअ‍ॅप ग्रुपवर बायडेन व पुतिनला टॅग करता येतं का, ते बघावं! म्हणजे उद्यापर्यंत तेच जाहीर करतील- ‘युद्ध थांबवतो, पण फॉरवर्ड मेसेजेस नको!!...’

युद्धाच्या पहिल्या दिवशी ‘व्हॉटसअ‍ॅप विद्यापीठा’त विनोदाचा तास होता! नाही म्हणायला अगदी दोन दिवसांआधीपर्यंत बायडन यांना ‘म्हातारचळ’ लागला आहे, असे दावे करणारे जरा नरमले होते. पहिल्या दिवसाच्या विश्लेषणास एकच फ्लेवर होता. तो म्हणजे ऐन वेळी धुलाईच्या वेळेस गायब होणाऱ्या मित्राची तुलना NATO म्हणजेच पर्यायाने अमेरिकेशी केलेली होती. दुसऱ्या दिवशी मात्र मेसेजेसना ‘युद्धस्य कथा रम्या’चे रूप येऊ लागले.......