मराठीच्या अभिजातत्वाची मांडणी साधार आणि निर्दोष असावी : अभिजात मराठी भाषा समिती अहवाल २०१३ आणि संबद्ध चर्चेच्या निमित्तानं

मराठी भाषेला केंद्र शासनाचा अभिजात भाषेचा दर्जा मिळायला अजिबात विरोध नाही, पण अभिजातत्वाची मांडणी भाषाशास्त्राच्या शिस्तीनं खरे पुरावे आणि ग्राह्य प्रमाणं यांच्या आधारावर केली जाणं गरजेचं आहे. शंकास्पद मांडणी, सांगोवांगीच्या गोष्टी, आख्यायिका, दंतकथा, आणि विपर्यस्त किंवा अभिनिवेशपूर्ण भावनिक "पुरावे" हे मराठीच्या अभिजातत्वाचे आधार समजले गेले, तर त्यातून मराठी भाषेचं भलं होण्याची शक्यता नाही.......