उर्दूच्या चेहऱ्यावर लोकसंस्कृतीचं सौम्य तेज झळाळतंय. त्यामुळे तिच्या सौंदर्यात भर पडत्येय
उर्दूवर जेवढा हक्क मुसलमानांचा तेवढाच हिंदूंचा. उर्दूवर मुसलमानांनी जेवढं प्रेम केलं, तेवढंच हिंदूंनी केलं. धर्म, जात, पंथ हा सवालच नव्हता; असं समीक्षक शम्सुर्रहमान फ़ारुकी म्हणतात. अख़्तरसाहेबांची मुलगी नर्गिसबाईंना ‘बूआ’ म्हणायची. तर इंदिरा गांधी आपल्या आत्येला, विजयालक्ष्मी पंडितांना ‘फुप्पी’ म्हणायच्या. ‘फुप्पी’ हा उर्दू शब्द. हिंदी हिंदूंची आणि उर्दू मुसलमानांची ही ब्याद ब्रिटिशांनी आणली.......