हो, हीच वेळ आहे एका ब्रेकची
ग्रंथनामा - झलक
राजेन्द्र यादव
  • ‘ब्रेकिंग न्यूज’ या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 24 November 2017
  • ग्रंथनामा Granthanama झलक ब्रेकिंग न्यूज Breaking news राजेन्द्र यादव Rajendra Yadav इलेक्ट्रॉनिक मीडिया Electronic media

टीव्ही चॅनल्समध्ये काम करणाऱ्या पत्रकारांनी आपले जीवनानुभव कथांच्या माध्यमातून लिहिले. त्याचे हे पुस्तक. ‘ब्रेकिंग न्यूज’ हे त्याचे नाव. मुळात ‘हंस’ या हिंदी वाङ्मयीन मासिकाचा टीव्ही विशेषांक प्रकाशित झाला होता. त्यातील या कथा आहे. नंतर त्याचे पुस्तक करण्यात आहे. टीव्ही विशेषांक आणि हे पुस्तक हे दोन्ही हिंदीमध्ये पुष्कळ गाजले. अलीकडेच या पुस्तकाचा मराठा अनुवाद प्रकाशित झाला. या पुस्तकाला ‘हंस’चे माजी संपादक (कै.) राजेन्द्र यादव यांनी लिहिलेली ही प्रस्ताना...

.............................................................................................................................................

इलेक्ट्रॉनिक मीडियाचं आजचं पतन ज्या स्तरावर पोहचलंय, त्याबाबतची कल्पना क्वचितच कुणी केली असावी… त्याच त्या अपराधकथा, त्याच हत्या, बलात्कार, तेच भ्रष्टाचार, घोटाळे आणि तेच चमत्कारी बाबा, भूतप्रेत, हडळी आणि अघोरी कृत्य किंवा नव्या चित्रपटांचे प्रोमो… आणि यावर कडी म्हणजे तेच ते क्रिकेट… तुम्ही तासनतास चॅनल बदलत राहा. तुम्हाला तेच ते सगळं पाहावं लागणार… एकच गोष्ट इतक्या वेळा दाखवली जाईल की, तुम्हाला टीव्हीचा स्क्रीन फोडावासा वाटेल. मला वीस-एक वर्षांपूर्वी लिहिली गेलेली पंकज बिष्ट यांची ‘बच्चे गवाह नही हो सकते’ ही कथा आठवतेय. त्यात टीव्ही स्क्रीनमधून एक हात निघून नायकाचं डोकं फोडतो असं दाखवलं होतं.

कदाचित तुम्ही स्वत: टीव्हीच्या समोरून दूर व्हाल, किंवा टीव्ही बंद कराल; पण तुम्ही तुमच्या कुटुंबीयांना त्यांच्यापासून कसं वाचवणार? त्यांना तर महिन्यातले दहा सण, करवाँ चौथ, छट, भव्य लग्नसमारंभ, सास-बहु छापाच्या वेडपट सीरिअल्स पाहायची सवय झालेली आहे किंवा एखाद्या भंपक बाबाच्या प्रवचनांचा आस्वाद घेऊन त्यांना आपली पापं धुऊन स्वर्गप्राप्ती निश्चित करायची आहे. हिंदू धर्मातले चमत्कार आणि गुन्हेगारी कथा या समांतर का दाखवल्या जातात असं कुणीच कसं विचारीत नाही?... असा प्रश्न मला नेहमी पडलेला आहे.

या अंधानुकरणामध्ये कशात कल्पकता असेल तर ती जाहिरातींमध्ये. खरंच तिथे नावीन्य आहे. खरं तर स्क्रीनवर चाललेली सगळी मारधाड या जाहिरातींसाठीच असते. हे दृश्य मला खेडेगावातील चारपाच पानांच्या छोट्या साप्ताहिकाची आठवण करून देतेय… कोर्टकचेरी, सरकारी जाहिराती, नावातील बदल… फ्लॅट विकणे\खरीदणे…  विवाहाच्या जाहिराती किंवा दवाखान्यांच्या जाहिराती छापून बाकीची रिकामी जागा भरण्यासाठीच त्यामध्ये दोन-चार अर्ध्याकच्च्या बातम्या अशा साप्ताहिकातून छापल्या जातात, याचंच पॉलिश्ड रूप म्हणजे आजची ही टीव्ही चॅनल्स आहेत. फरक इतकाच आहे की, ‘तुफान मेल’ साप्ताहिकाचा ग्राहक डाळ, बटाटे तोलणारा व्यापारी आहे आणि टीव्ही चॅनल्सवरून जाहिरात करणाऱ्यांचे ग्राहक मोठमोठ्या फ्लॅटसमधून राहणारे, आलिशान कार्सचे मालक आहेत. हे सगळं त्यांना या ग्राहकांनाच विकायचं आहे आणि त्यासाठीच त्यांना दाखवायचं आहे. ‘जनतेला हेच हवं आहे… आमचा टीआरपी याची साक्ष आहे’ असं त्यांचं म्हणणं आहे. मल्टीनॅशनल कंपन्यांचे मालक आम्हाला आमचा जीवनस्तर सुधारण्यासाठी काय खरेदी करायला हवं हे ठरवताहेत. साहित्य, कला, संस्कृती किंवा विचार यासारख्या फालतू गोष्टी डोक्यात घेऊन फिरण्याने काय मिळणार आहे?... असे मजेत बसून ‘पेज थ्री’ पार्टीज बघा, राखी सावंतने दिलेली चुंबनं आणि शिल्पा शेट्टीसारख्या सुंदर स्त्रियांच्या लचकणाऱ्या कमरा बघून खूश व्हा… युपी, बिहार लुटायला निघालेल्या सुंदरींबरोबर तुम्हीही सामील व्हा. किंवा ‘कजरारे कजरारे’च्या गाण्यावर अमिताभसारखे ठुमके द्या… हे सगळं वर्गविभाजनाचं कारस्थान आहे. इथं गावं फक्त काही दुर्घटना घडली तर किंवा काही चमत्कार घडला तर दाखवली जातात. दलित स्त्रिया किंवा आदिवासींच्या संघर्षकथा इतक्या नीरस असतात की, चॅनलच बदलावं लागतं.

खरं तर पतनाची ही सुरुवात बीजेपीने राजकारणात जेव्हा खरं-खोटं, फॅक्ट-फिक्शन, इतिहास-पुराण, राष्ट्रवाद-हिंदुत्व यांची कॉकटेल्स तयार केली तेव्हापासून झालेली आहे. काँग्रेस जर दिल्लीमध्ये दोन हजार शिखांना मारू शकते तर आम्ही गुजरातमध्ये तीन हजार मुसलमानांची कत्तल का करून शकत नाही? अशी स्पर्धा तेव्हापासून सुरू झाली. जर एखादं चॅनल नागिणीचा पुनर्जन्म यावर आठवडाभर कार्यक्रम सादर करू शकतं, तर आमचं भूत त्यापेक्षा कुठे कमी आहे? अंधविश्वास, चमत्कार आणि अमानवीयतेच्या शेवटच्या टोकापर्यंत घेऊन जाणारी तंत्रसाधना आम्हाला विवेकहीन खरीददारांमध्ये बदलून टाकतेय, आम्ही हिंसक हिंदुत्वाचे समर्थक बनतोय, आम्ही मुसलमानांकडे आतंकवादी म्हणून बघू लागलेलो आहोत… असं कुणी कितीही ओरडू द्या… पण राहण्यासाठी एक शानदार घर, लज्जतदार खाणं आणि विचार करण्यासाठी चॅनलचा कट्टा… माणसाला यापेक्षा अजून काय हवंय?

निश्चितच बाजारवाद आम्हाला ‘उदार’ बनवतोय. तो आम्हाला जातीपातीच्या, भौगोलिक सीमांच्या पलीकडे घेऊन जाऊन फक्त खरीददार बनवतो आहे. तो सांस्कृतिक किंवा राष्ट्रीय संकोचितपणाच्या मानसिकतेतून आणि पूर्वग्रहांपासून आम्हाला मुक्त करतो आहे. सगळ्या पृथ्वीला खरेदीदार आणि विक्रेते यांच्या भल्यामोठ्या कुटुंबामध्ये तो आमचं परिवर्तन घडवून आणतोय… पण हाच बाजार आर्थिक वर्गातील अंतर्विरोधाला अधिक तीव्र करतो आहे. प्रत्येक उत्पादनाचे उपभोक्ता वेगळे आहेत… लिज्जत पापड, कायमचूर्ण आणि एमडीएच मसाला खरेदी करणारा वर्ग आणि लक्झरी सूट, घरं, हिरे, शानदार गाड्या खरीदणारा वर्ग हे वेगवेगळे आहेत. दुसरा जो वर्ग आहे तो बिकीनी किंवा स्विमिंग सूट अंगावर परिधान करून फाईव्ह स्टार हॉटेलच्या स्विमिंग पूलाच्या काठावर बसून पिझ्झा खाता खाता बिअर पिणारा आहे. क्रेडिट कार्ड घेऊन पॅरिस, हाँगकाँगमध्ये शॉपिंग करणारा, मौजमस्ती करणारा वर्ग आहे. जे आजही सायकल वापरतात त्यांच्यासाठी हे मोठेमोठे मॉल्स नाहीयेत. ते मोठ्या मुश्कीलीने अमिताभ बच्चन, शाहरूख खान किंवा सचिन तेंडुलकर यांच्या शिफारशीवरून बनियान किंवा अंडरवियर खरेदी करतात. मोठमोठी स्वप्नं पाहणाऱ्या या बेकार बेरोजगार युवकांच्या पुढे अपराध करणे, किंवा राजकीय, सांस्कृतिक टोळ्यांमध्ये सामील होऊन विरोध प्रदर्शन, गुंडागर्दी, तोडफोड, हत्या, बलात्कार यासारखे गुन्हे करणे याशिवाय कोणता मार्ग शिल्लक उरलाय? एकीकडे शेतकरी बँकेचे कर्ज फेडता न आल्याने आत्महत्या करताहेत आणि दुसरीकडे ही तरुण पिढी राजकारण्यांसाठी बुथ लुटणे, दंगे करणे, किंवा दुबईमध्ये, मुंबईमध्ये बसलेल्या माफियांसाठी जमीन, घर हडपण्यासाठी करोडो, अरबो रुपयांची वसुली करताहेत.

सेन्सेक्सच्या वरखाली होणाऱ्या आकड्यांमुळे करोडो अब्जावधी रुपये इकडेतिकडे होताहेत. संवेदनात्मक सूचकांक वर चढतोय, तर महागाई सामान्य माणसांची कंबर तोडतेय… साठ रुपये किलो कांदे-बटाटे?

खरंच किती वेगळ्या दुनियेत राहण्यासाठी मजबूर आहे आमचा उपभोक्ता समाज! अशात कोणताही बुद्धिजीवी माणूस डोकं ठोकून घेण्याशिवाय काय करू शकतो? विचाराला वृत्तपत्रात, टीव्ही चॅनलवर जागा उरलेली नाही. ‘पापराझी’नाही गरीब वर्गात इंटरेस्ट उरलेला नाहीये. किंवा तो विचारांची चिंता करीत नाहीये… उपभोक्ता तयार करण्यासाठी मुद्रित आणि दृश्यमीडिया आपली स्वत:ची अशी एक वेगळीच भाषा तयार करण्यात गुंतलेला आहे.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4287

.............................................................................................................................................

या सगळ्या पतनपुराणांमध्ये कधीतरी चॅनल्सवर न्यायाची पहाट उगवते. अन्यायाविरुद्ध अचानक विस्फोट होतो आणि मग वाटतं की, अजूनही आशेला काहीतरी जागा शिल्लक आहे. ‘तहलका’सारखं स्टिंग ऑपरेशन… मोठमोठ्या व्यवहारातील खरेदीविक्री आणि त्यांचं पितळ उघडं करणं, निठारीच्या मनिन्दर सिंह आणि कैलाससारख्या नरभक्षकांचा बुरखा फाडणे, किंवा जेसिका, कटारा, मट्टू, कविता यांच्या प्रकरणाच्या बंद झालेल्या फाईल्स ‘शोधून’ काढून त्या उघड करणे… यासारखी धाडसी कामं मीडियाने केली नसती तर आम्हाला आमच्या न्यायव्यवस्थेतील राक्षसी प्रवृत्तीचं दर्शन कसं घडलं असतं?... आपल्याला कसं कळलं असतं की, भारत कशा प्रकारे विश्वशक्ती बनतोय ते?...

हो, अजूनही आशेला जागा आहे. फक्त (ब्रेख्तच्या शब्दात) आंधळ्या युगात अंधाराचीच गीतं गाण्याच्या मजबुरीनं आम्हाला इतकंही निष्क्रिय बनवलेलं नहीये.

मल्टिनॅशनल दहशतीनं जर सगळं जग एक होत असेल तर इकडे या साम्राज्यावादी लुटीच्या संबंधातही विरोध, असंतोष आणि रागाचं वैश्विकरणही व्यापक प्रमाणात होत आहे. सद्दामला फाशीवर चढवलं गेलं तेव्हा सगळी सावधता बाळगूनही रागाचं दर्शन चॅनल्सवर दाखवलं गेलंच. नेपाळच्या गुन्हेगार राजाला आम्ही लोकशाहीच्या मार्गानं संपताना बघितलं. नॉम चॉम्स्कीची क्रांतिकारी वक्तव्य आजही आम्हाला अस्वस्थ करतात. उज्जैनमधली प्रा. सब्बरवाल यांची हत्या पाहून आमचं रक्त खवळतं. शेवटी आम्ही किती वर्षं मेधा पाटकर किंवा चांगलं जीवन जगण्याची अपेक्षा करणारे नक्षलवादी यांच्याकडे गुन्हेगार, अपराधी म्हणून पाहत राहणार आहोत? वैश्विकरणामुळे जर जग गुलाम होणार असेल तर त्यातून मुक्त होण्यासाठी लोकांनी प्रयत्न करणं, त्यांच्या रागाचं सार्वत्रीकरण प्रकट होणंही स्वाभाविकच आहे.

नव्या नव्या मनोरंजनासाठी शोधलेले मार्ग आठवताना मला अमेरिकेतील एक घटना आठवतेय. एक मोठा काचेचा पिंजरा उंचीवर ठेवण्यात आला आणि त्यात विश्वसुंदरीसारखी सुंदर स्त्री न्यूड अवस्थेत पारदर्शी काचेच्या कमोडवर बसवण्यात आली. ती दहा हजार डोळ्यांसमोर संडास करताना दिसली. ते बघताना लोकांनी टाळ्या वाजवल्या. आनंदाची लहर उसळली. कदाचित आमची एक्सक्लुसिव्ह चॅनलही एखादे दिवशी अशा प्रकारच्या दृश्याचं प्रसारण दिवसभर करतीलही. कारण आम्हाला अमेरिकेची नक्कलच करायची आहे ना!

‘अक्षरनामा’चे लेखक नीतीन वैद्य यांनी ‘वक्त है एक ब्रेक का’ हे मूळ हिंदी पुस्तक वाचून त्याविषयी दैनंदिनीत केलेली नोंद

हत्या, बलात्कार आणि अदृश्य शक्तीचं प्रकटीकरण यांचं आकर्षण घटतं आहे. यातून फक्त बीभत्स दृश्यचं अजून तरी दाखवण्यात येत नाहीत. पण उद्या कदाचित मानवविष्ठा प्लेटमध्ये दाखवण्यासाठी ही चॅनल्स कमी करणार नाहीत. असो.

या अंगदाचा पाय धरून हे कधीपर्यंत सहन करायचं असं विचारण्याची वेळ आलेली नाहीये का? आता हे खूपच झालं. ‘दस फार अॅड नो फर्दर’ ही वेडीस्पर्धा आता थांबवलीच पाहिजे… शेवटी या श्रीमंतांचे चोचले पुरवणारी आणि उघड्या नागड्या स्त्रियांचे फोटो छापणाऱ्या वृत्तपत्रांच्या गर्दीत ‘द हिंदू’ हे एकच वृत्तपत्र खूप गंभीरपणे काहीतरी छापत दररोज आमच्या दरवाजापर्यंत पोहचत आहेच ना… आणि लक्षात ठेवा हे भारतातील दुसऱ्या नंबरचं वृत्तपत्र आहे. याचप्रकारे कुठेतरी अशाच एखाद्या चॅनलच्या निर्मितीची तयारी सुरूही असेल, पण आपणच आपल्या आत डोकावून पाहण्याची वेळ आलेली नाहीये का? आपणच आपली आचारसंहिता विकसित करायला काय हरकत आहे? शेवटी तीस-चाळीस करोड प्रेक्षकांची (सॉरी ग्राहकांची) जबाबदारी आपल्यावर आहे की नाही?

हे न्यूज चॅनल्समधील कथा देण्याचं एक कारणही आहे. काचेच्या केबिनच्या मागे किती असंतोष आहे, किती राग आहे, फ्रस्टेशन आहे हे तुम्ही यातून अनुभवू शकाल. मार्क्सचं म्हणणं आहे की, थिसिसच्या मध्येच अँटीथिसिस जन्म घेतो. तोच कालांतराने थिसिसला उदध्वस्त करतो. ही द्वंद्वात्मकता या कथांची मूळ प्रेरणा आहे. इथेही एक दिवस पापाचा घडा भरेल… पण सध्यातरी ही वेळ आहे एका ब्रेकची…

.............................................................................................................................................

ब्रेकिंग न्यूज : संपादन – राजेन्द्र यादव, अजीत अंजुम, रवीन्द्र त्रिपाठी,

मराठी अनुवाद चंद्रकांत भोंजाळ,

विजय प्रकाशन, नागपूर, पाने – २६७, मूल्य – ३०० रुपये.

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा –

http://www.booksnama.com/client/book_detailed_view/4266

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......