आता सरकारविरुद्ध सुरू केलेल्या कुठल्याही आंदोलनाला इतर जनतेच्याही रोषाला व टीकेला सामोरं जावं लागतं. ‘नागरिक’ विरुद्ध ‘सरकार’ अशी आंदोलनं होणं बंद झालं आणि ‘आपण’ विरुद्ध ‘ते’ असं चित्र दिसू लागलंय

सद्यस्थिती अशी आहे की, ‘ते’ आणि ‘आपण’ दोघांपैकी कोणीच रस्त्यावर उतरत नाही. हातातल्या मोबईलवर पोस्ट, कमेंट, शेअर, ट्वीट, रीट्वीट आणि अंगठे दाखवण्यातच धन्यता मानत आहे. देशात दोन निश्चित गट पडले आहेत. देश ‘विश्वगुरू’ होण्याच्या मार्गावर आहे, असं मानणारा एक गट आहे, तर दुसरा गट देश परत मध्ययुगात जात आहे, असं मानणारा आहे. पण या दोघांपैकी कुठेही आंदोलनकर्ता उरलेला दिसत नाही.......