‘घाचर घोचर’ : आधुनिक जीवनशैली स्वीकारतानाच्या नेमक्या, कुचकामी जागा या कादंबरीत ‘आ’ वासून लेखकानं उघड केल्या आहेत आणि एकूणच भारतीयांच्या ‘स्वीकार’ या मनोवृत्तीबाबत चिंतनीय प्रश्नचिन्हं उपस्थित केली आहेत! (भाग ३)

घाचर घोचर या अक्षरांच्या उच्चारणातून निर्माण होणाऱ्या नादात जी घालमेल आहे, जो गुंता आहे आणि तरीही जी निरर्थकता आहे, तो सगळा दाब, सगळा ताण आणि त्याची सगळी जबाबदारी आपल्यावर कोसळते आणि आपण या सगळ्याखाली दबले जात असल्याची भावना आपल्याला पछाडून टाकते. वास्तविक ‘घाचर घोचर’ एक शब्द आणि शीर्षक म्हणून त्याचं केलेलं उपयोजन लेखकाच्या प्रतिभेची झेप दाखवण्यासाठी पुरेसा आहे.......

‘घाचर घोचर’ : आधुनिक जीवनशैली स्वीकारतानाच्या नेमक्या, कुचकामी जागा या कादंबरीत ‘आ’ वासून लेखकानं उघड केल्या आहेत आणि एकूणच भारतीयांच्या ‘स्वीकार’ या मनोवृत्तीबाबत चिंतनीय प्रश्नचिन्हं उपस्थित केली आहेत! (भाग २)

जागतिकीकरणानं तयार केलेली बाजार नावाची व्यवस्था स्लो पॉयझनिंगप्रमाणे कशी काम करते, हेही लेखकानं ‘मुंग्या’ या रूपकातून अगदी चपखलपणे मांडलं आहे. मुंग्या काय करतात? तर कुठल्याही साध्याशा अडचणीचं उपद्रवमूल्य वाढवतात. याने साधी अडचण विनाकारण टोकदार होते. एकदा अडचण टोकदार झाली की, जाणिवांना ‘कम्फर्ट’ नावाच्या गरजा खुणावू लागतात.......

‘घाचर घोचर’ : आधुनिक जीवनशैली स्वीकारतानाच्या नेमक्या, कुचकामी जागा या कादंबरीत ‘आ’ वासून लेखकानं उघड केल्या आहेत आणि एकूणच भारतीयांच्या ‘स्वीकार’ या मनोवृत्तीबाबत चिंतनीय प्रश्नचिन्हं उपस्थित केली आहेत! (भाग १)

एका लहानशा, शब्द जवळजवळ मुके असणाऱ्या फक्त ॲक्शन-रिॲक्शन-निष्ठ प्रसंगातून एकेक पापुद्रा सोलत शानभाग वरण वर्मी बाण मारतात. इथेच त्यांनी कादंबरीवर मांड ठोकलेली आहे आणि वाचकाला झडप घालून हायजॅक केलं आहे; पण आपण हायजॅक झाल्याचं वाचकाला मात्र फार उशिरा, सगळ्या जंजाळात फसल्यानंतर कळतं. शानभागांचा निवेदनातला हा एक प्रकारचा अंडर टोन ‘गनिमी कावा’ जबरदस्त आहे.......

‘मृत्यू पाहिलेली माणसं’ : जीवन-मरणाच्या उंबरठ्यावरदेखील माणसात ठाण मांडून बसलेल्या मूल्यविवेकाचं, समाजशीलतेचं, हळुवार भावनिक बंधाचं आणि विनोदबुद्धीचं दर्शन

पुस्तकाची कॅचलाईन पुस्तकाचा आशय अगदी नेमकेपणाने आणि तंतोतंत व्यक्त करते – ‘मृत्यूच्या दारातून परतलेल्या व्यक्तींच्या थरारक कहाण्या’. या गोष्टी वाचताना ‘अत्त्युच्च भीती’ आणि ‘कल्पनेपलीकडची आशा’ या दोन टोकाच्या भावना मनाची पकड घेतात आणि या गोष्टींमधल्या माणसांप्रमाणे वाचकही या दोन टोकांमध्ये झुलत राहतो. लेखिका गौरी कानेटकर यांनी मनोगतात म्हटल्याप्रमाणे, या कहाण्या खरोखरच झपाटून टाकणाऱ्या आहेत.......