‘कुशल मनुष्यबळ नसल्यामुळे रेडिओचा विकास खुंटला आहे’ – पंकज आठवले
ग्रंथनामा - मुलाखत
निनाद खारकर 
  • लेखक पंकज आठवले आणि ‘स्टे ट्यून द - स्टोरी ऑफ रेडिओ इन इंडिया’ या त्यांच्या पुस्तकाचं मुखपृष्ठ
  • Fri , 02 February 2018
  • ग्रंथनामा Granthnama मुलाखत पंकज आठवले Pankaj Athawale स्टे ट्यून द - स्टोरी ऑफ रेडिओ इन इंडिया STAY TUNED : The Story of Radio in India

‘जगातील बहुतेक शासकीय प्रसारण सेवा हा या स्थिरतावादाचे प्रतिनिधित्व करतात,’ असं लायोनेल फीडनेल यांचं म्हणणं आहे. आता हा कोण म्हणून प्रश्न पडला असेल तर उत्तर सोपं आहे, ज्यानं ‘Indian State Broadcasting Services’ (ISBS) असं नाव बदलून ‘All India Radio’ (AIR) हे सुटसुटीत नाव दिलं तोच हा. ज्या रेडियो माध्यमानं एक पर्व गाजवलं, ते आज काळाच्या पडद्यामागे जातंय की, काय असं वाटायला लागलंय. काय असावी यामागची कारणं? नवीन माध्यमांचा उदय कि आणखी काही?

‘भारतासारख्या जगात सर्वांत तरुण असलेल्या देशात भारताला वैज्ञानिक, व्यावसायिक धोरणं असतं, पण संपर्क धोरणं असतं नाही’, मेहेर मसानी हे विधान त्यांच्या ‘Broadcasting and the People’ या पुस्तकात करतात. मेहेर मसानी या All India Radio च्या Deputy Director General म्हणून निवृत्त झालेल्या अधिकारी.

नेहरूंच्या समाजवादी अर्थव्यवस्थेवर आणि परमिट कोटा व्यवस्थेवर सध्याच्या भाजप सरकार आणि समर्थकांनी अनेकदा टीका केली आहे. अटल बिहारी वायपेयी प्रधानमंत्री असताना ‘मायबाप सरकार असू नये’ अशी भूमिका ते नेहमी घ्यायचे. आर्थिक उदारीकरण हे नरसिंह राव आणि मनमोहनसिंग यांनी भारतात आणलं हे सर्वांनाच माहीत आहे. मुख्य मुद्दा म्हणजे नंतरच्या अटल बिहारी वायपेयींच्या सरकारने खाजगीकरणाची जोरदार सुरुवात केली. या काळात तब्बल २८ सरकारी कंपन्या आणि सरकारी हॉटेल्स यांचं खाजगीकरण झालं. खाजगीकरणानंतर राजकीय गणित चुकल्यामुळे वाजपेयीचं सरकार पडलं. नंतरच्या सरकारांनी खाजगीकरणात फारसा उत्साह दाखवला नाही किंवा दाखवला तरी त्यांचा उद्देश बाजारातल्या स्पर्धेला चालना देणं एवढा दिसत नाही.

सर्वोच न्यायालयात केंद्र सरकारनं एक प्रतिज्ञापत्र दाखल केलं होतं. केंद्र सरकारच्या अंदाजानुसार खाजगी एफ. एम. वाहिन्यांवर वृत्तसेवा आणि चालू घडामोडी प्रसारित करण्यास परवानगी दिल्यास भारताच्या सुरक्षेला धोका पोहचू शकतो. हा सरकारचा दावा अनेक कारणांनी उदारीकरणासाठी चिंताजनक आहे. जम्मू-काश्मीर, ईशान्य भारतासारख्या ठिकाणी खाजगी FM रेडिओ चालू करण्यासाठी नवी धोरणं भारत सरकारनं लागू केली. सरकारी आकड्यानुसार ६५ टक्के जनतेपर्यंत FM रेडियो पोहचू शकेल. याचे दूरगामी परिणाम म्हणजे त्या क्षेत्रात निर्माण होणारा रोजगार, कुशल मनुष्यबळ, जाहिराती आणि त्याचं एकंदर अर्थकारण.

या रेडिओ माध्यमाचा अभ्यास करून लेखक पंकज आठवले यांनी ‘स्टे ट्यून द - स्टोरी ऑफ रेडिओ इन इंडिया’ हे पुस्तक लिहिलं आहे. त्यासंदर्भात त्यांच्याशी मारलेल्या गप्पा.

.............................................................................................................................................

प्रश्न - तुम्ही रेडिओ या माध्यमाकडे कसे वळलात? रेडिओ या माध्यमात यायचा विचार नेमका कधी केला? त्याविषयीची आवड कधी निर्माण झाली?

- रेडिओचा करिअर म्हणून विचार कधी केला नव्हता. इंजिनीरिंग झाल्यावर मला एक मित्रानं ऑल इंडिया रेडिओच्या कार्यालयात नेलं. तिथलं वातावरण नि तंत्रज्ञान मला आवडलं. मी तिथंच ऑडिशन दिली आणि मी रेडिओ जॉकी झालो. माझ्या इंजिनीरिंगचा मला रेडिओ हे माध्यम समजून घ्यायला फायदा झाला. मी क्रिकेटसुद्धा खेळायचो. त्याचा मला समालोचन करायला फायदा झाला.

प्रश्न - आजकाल सर्व माहिती एका क्लिकवर उपलब्ध असताना पुस्तक का लिहावंसं वाटलं? तुमच्या पुस्तक लिहिण्याच्या प्रवासाबद्दल सांगाल का? माहितीचे स्त्रोत, प्रेरणा, पुस्तकातले काही किस्से वगैरे...

- जग जरी डिजिटल युगाकडे प्रस्थान ठेवत असलं तरी जगातल्या सगळ्या गोष्टी क्लिकवर उपलब्ध नाहित. ऐकायला जरा विचित्र वाटेल, पण माहितीच्या जाळ्यातून किंवा कचऱ्यातून तुम्हाला हवी ती गोष्ट शोधावी लागते. इंटरनेटची उपलब्धता हे वरदान आहेच, पण तुम्ही सगळीकडे लॅपटॉप आणि मोबाईल घेऊन जाऊ शकत नाही ना! म्हणून विचारांती रेडिओवर पुस्तकं लिहावं असा विचार मनात आला. माध्यमाची पदवी किंवा पदव्युत्तर शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना हे पुस्तक हँडबुक म्हणून कामला येऊ शकेल.

या पुस्तकाची प्रेरणा विद्यार्थ्यांमधूनच आली. मी व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून बऱ्याच महाविद्यालयांमध्ये माध्यमं हा विषय शिकवायला जायचो. माझे विद्यार्थी रेडिओ या विषयांवरच्या नोट्स मागायचे. मी इंटरनेटवर शोधायचा प्रयत्न केला, पण हाताला फारसं काही लागलं नाही. आंतरराष्ट्रीय संदर्भ असलेले दुवे सापडले, पण त्यात भारतीय माध्यमांविषयी फारसं काही नव्हतं. आधी मनात फक्त विचार चालू होताच, नंतर असं लक्षात आलं की, याला माहितीचा एक रचनात्मक आकार हवा. मला तेव्हा प्रकाशनाबद्दल काहीही माहीत नव्हतं. बऱ्याच लोकांबरोबर बोलल्यावर ज्येष्ठ माध्यमतज्ज्ञ डॉ. संजय रानडे यांनी मला प्रकाशकांना भेटण्याविषयी सुचवलं. तेव्हा मी इंडस प्रकाशनच्या संपर्कात आलो.

प्रश्न - वृत्तपत्रांच्या काळात रेडिओ तंत्रज्ञान आधुनिक होतं. निरक्षर ते प्रकांड पंडित यांना माध्यमानं जवळ आणलं. जनसंपर्काचं एक प्रभावी माध्यम म्हणून रेडिओ प्रस्थापित झाला, पण सध्याचा भारतातला रेडिओवरचा कंटेंट बघता, हे माध्यम काम करता करता ऐकायचं माध्यम म्हणून काम करू लागल्यासारखं वाटतं. यात एक माध्यम म्हणून त्याच्यावर अन्याय होतोय असं वाटतं का?

- रेडिओ हे अतिशय व्यक्तिगत आणि गतिशील माध्यम आहे. ते ऐकायची आधुनिक प्रक्रिया अस्थिर आहे.  एकेकाळी रेडिओ ही घरी ऐकायची गोष्ट होती. आता तो ऐकणाऱ्यांमधले ९५ टक्के लोक हे प्रवासात असतात. कोठेही ऐकता येईल असं तंत्रज्ञान आल्याचा रेडिओला फायदाच झाला आहे. श्रोत्यांची संख्या नक्कीच वाढली आहे. डिजिटल माध्यमं सर्वदूर गेली असली तरी वर्तमानपत्रं, रेडिओ, मोबाइल, रेडिओ ही माध्यमं आपलं वेगळं अस्तित्व टिकवून राहतील. बाकीच्या दृक्-श्राव्य माध्यमात तुमचं पूर्ण लक्ष देणं गरजेचं आहे, पण रेडिओचा फक्त ध्वनी असल्यामुळे तुम्ही एकीकडे तुमचं काम करू शकता. असं असलं तरी रेडियोचे कार्यक्रम बऱ्याच प्रमाणात लोकांच्या लक्षात राहतात.

प्रश्न - आर्थिक उदारीकरणानंतर भारतात टीव्ही, इंटरनेटसारखी माध्यमं घराघरात गेली, रेडिओचा FM झाला आणि तो सामान्य लोकांच्या रोजच्या शैलीत बोलायला लागला. तरीसुद्धा आज सगळ्या भाषेत वा बोलीभाषेत रेडिओ नाही. उदाहरण द्यायचं झालं तर माओवादी चळवळीची भाषा ही गोंदी आहे. पण त्या भाषेत ऑल इंडिया रेडियोचं एकसुद्धा बुलेटीन नाही. या बाबतीत योजनेत घोळ आहे कि प्रशासनात? 

- मला नमूद करायचं की, गोंदी ही नक्षलवाद्यांची भाषा नाही. त्या भागात राहणारे लोक ती भाषा वापरतात. स्थानिक भाषांमध्ये बऱ्याच प्रमाणात रेडिओवर कार्यक्रम होतात. संस्कृतसारख्या भाषेतसुद्धा कार्यक्रम केले जातात. याबरोबरचं जे प्रसारण AM, FM and DTH मध्ये होतंय, ते अधिक विस्तृत आणि वितरित करून सामान्य लोकांपर्यंत नेलं पाहिजे.

प्रश्न - मुंबईसारख्या महानगरात मराठी गाणी FM वाहिन्यांनी लावावी म्हणून चळवळ करावी लागली होती. प्रादेशिक भाषांना इंग्रजी-हिंदी भाषेत असणारे FM दुय्यम स्थान देतात असं वाटतं का? आणि प्रादेशिक भाषा बोलणारे FM चालवणे आर्थिकदृष्ट्या शक्य होईल का?

- ही समस्या फक्त मुंबईपुरती मर्यादित आहे, बाकीच्या शहरांमध्ये स्थानिक भाषांमध्ये प्रसारण होतं. मुंबईत आता मराठी समाज हा बहुसंख्य राहिला नाहीये, जेमतेम २८ टक्के आहे. मनोरंजनावर चालणाऱ्या रेडिओवर २४ तास लावावी अशी मराठी गाणी नाहीत. मराठी लोकांनासुद्धा हिंदी आणि इंग्रजी गाणी आवडतात. तेव्हा व्यावसायिकदृष्ट्या मराठी रेडिओ वाहिनी चालवणं आव्हानात्मक आहे.

प्रश्न - स्वातंत्र्यलढ्यात रेडिओची फार मोठी भूमिका होती, क्रांतिकारांनी भूमिगत रेडिओ केंद्र वापरून प्रचंड प्रसार केला होता. त्याविषयी तुम्हाला काही नवीन माहिती मिळाली का?

- मी पुस्तकात आझाद हिंद रेडिओवर एक अख्ख प्रकरणं लिहिलेलं आहे.”

प्रश्न - सध्या ऑल इंडिया रेडिओ त्यांचे कार्यक्रम soundcloud या वेबसाईटवर टाकतो. त्यांच्या वेबसाईटपेक्षा हे सोशल नेटवर्क वापरायला खूप सोपं आहे, पण ते फार थोड्या लोकांना माहीत आहे असं दिसतंय. ऑल इंडिया रेडिओ इंटरनेट युगात जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवणाऱ्यासाठी नवीन मार्ग वापरले जातायत का?

- ते खूप प्रयत्न करतायत पण ते लाल फितीच्या कारभारात अडकले आहेत. बीबीसीसारखं त्यांना काळाप्रमाणे बदलता आलेलं नाही. त्यांच्या समकालीन व्यवस्थापनाच्या तुलनेनं ते फारच हळू बदल करतायत.

प्रश्न - मुंबई विद्यापीठाच्या कॉम्युनिटी रेडिओचं काम तुम्ही बराच काम करत होतात, तोमध्ये बंद पडणार अशी बातमी आली होती. त्याचं काय झालं?

- विद्यापीठाच्या कारभारामुळे कम्युनिटी रेडिओचा विभाग बंद पडला. विद्यापीठाची कार्यसंस्कृती अनेक वर्षांपासून बिघडली आहे, त्यात भविष्यात काही सुधारणा होईल असं  मला वाटत नाही.

प्रश्न - खाजगी FM वाहिन्या सुरू झाल्यापासून या क्षेत्रात रोजगार वाढला आहे. भविष्यात तो अजून वाढेल का? अजून संधी निर्माण होतील का? एक प्रसारमाध्यम म्हणून तुम्ही याकडे कसा पाहता?

- खाजगी व्यावसायिक FM वाहिन्यांनी संधींची नवीन दारं उघडली आहेत. कौशल्य निर्मिती असलेलं मनुष्यबळ नसल्यामुळे रेडिओ या माध्यमाचा विकास खुंटला आहे. रेडिओवर बोलणं, त्यासाठी कार्यक्रम तयार करणं, त्यांची विक्री करणं यासाठी विशेष कौशल्य असणं गरजेचं आहे. भविष्यात या व्यवसायात भरपूर संधी निर्माण होतील असा अंदाज आहे.

प्रश्न -  पुस्तकानंतर पुढे काय?

हे पुस्तक वेगवेगळ्या माध्यम शिक्षणसंस्थांमध्ये नेण्याचा विचार आणि प्रयत्न सुरू आहेत. या पुस्तकाच्या मराठी आणि हिंदी आवृत्त्यांवर काम चालू आहे. त्याचबरोबर रेडिओ जॉकिंग आणि क्रीडा समालोचनसुद्धा सुरू आहे.

.............................................................................................................................................

विचारवंत जॉन स्टुवर्ट मिल म्हणाला होता, ‘जी राज्यसंस्था स्वतःच्या व्यवस्था सबलीकरणासाठी व्यक्तींना मोठं होऊ देत नाही, त्या राज्यसंस्थेला खुजेच लोक मिळतात.’ माध्यमांसंदर्भात उदारमतवाद म्हणजे राज्यसंस्थेतील घटकांना अधिकाधिक स्वातंत्र्य देणं. वास्तविक चंदा कमिटी, वर्घीस कमिटी यांनी दूरदर्शन आणि रेडिओ या स्वतंत्र संस्था करून त्यांना स्वातंत्र्य द्यावं, अशी मागणी केली होती. पण त्याचं पुढे काहीच झालं नाही.

रेडिओसारखं माध्यम हातात असताना राज्यसंस्थेनं त्याचा वापर कल्पक आणि आधुनिक परिमाणांवर आधारित केल्यास भारतात कमी खर्चात फार मोठी श्रवण क्रांती करता येईल.

.............................................................................................................................................

STAY TUNED : The Story of Radio in India - Pankaj Athawale
​Indus Source Books​, Mumbai, pages - 168, Rs -  250 

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/client/book_detailed_view/4347

.............................................................................................................................................

लेखक निनाद खारकर जाहिरात क्षेत्रात कार्यरत आहेत.

kharkarninad1@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......

‘रेघ’ : या पुस्तकाच्या ‘प्रामाणिक वाचना’नंतर वर्तमानपत्रांतील बातम्यांचा प्राधान्यक्रम, त्यांतल्या जाहिरातींमधला मजकूर, तसेच सामाजिक-राजकीय-सांस्कृतिक क्षेत्रांतील घटनांसंबंधीच्या बातम्या, यांकडे अधिक सजगपणे, चिकित्सकपणे पाहण्याची सवय लागेल

मर्यादित संसाधनांच्या साहाय्याने जर डोंगरे यांच्यासारखे लेखक इतकं चांगलं, उल्लेखनीय काम करू शकत असतील, तर करोडो रुपये हाताशी असणाऱ्या माध्यमांनी किती मोठं काम केलं पाहिजे, असा विचार मनात आल्याशिवाय राहत नाही. पण शेवटी प्रश्न येतो तो बांधीलकी, प्रामाणिकपणा आणि न्यायाची चाड असण्याचा. वृत्तवाहिन्यांवर ज्या गोष्टी दाखवल्या जात, त्या विषयांवर ‘रेघ’सारख्या पुस्तकातून प्रकाशझोत टाकला जातो.......