सांप्रत काळात निवडणुकीत लोकशाहीची व्याख्याच बदलली आहे. जाती आधारित मतांच्या संख्येला ‘सोशल इंजिनियरिंग’, तर कट्टर धार्मिक किंवा बहुसंख्याक वादाला आता ‘राष्ट्रवाद’ म्हटले जात आहे

भाजपचे केंद्रीय नेतेही उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांना अडचणीत आणताना दिसत आहेत. गोरखपुरमध्ये चंद्रशेखर यांची उमेदवारी ही प्रतीकात्मक आहे. समाजवादी पक्षाच्या वतीने थेट युती करून लढण्याऐवजी मायावतींची दलित मते आधी चंद्रशेखर यांच्याकडे वळवण्याची आणि नंतर चंद्रशेखर यांच्यासोबत सत्ता वाटून घेण्याचा विरोधकांच्या धोरणात्मक संघर्षाचा भाग असावा, हे नाकारता येणार नाही.......