तुम्हाला ‘प्लांट ब्लाइंडनेस’ झालेला आहे का? म्हणजे प्राणी, पक्षी, वस्तू आणि वास्तू यांच्या तुलनेत वनस्पतींना कायम नजरअंदाज करण्याचा आंधळेपणा…!

आजच्या पिढीचं आपल्या भवतालाशी, तिथल्या झाडा-फुलांशी, एकूणच वनस्पतींशी असणारं जैविक नातं तुटत चाललं आहे. याबाबतची त्यांची असंवेदनशीलता कमालीची वाढत आहे, या विचारांनी एलिझाबेथ शुसलर आणि जेम्स वँडरसी. वनस्पतींबद्दल हरवत चाललेल्या संवेदनांची मूळ त्यांना शोधावीशी वाटतात. कारण ती हळूहळू लुप्त होत चाललेल्या निसर्ग- पर्यावरणाशी जोडलेली आहेत. ‘प्लांट ब्लाइंडनेस’ ही संकल्पना हा अस्वस्थ सूर अधोरेखित करते.......

कोविडकाळातही युरोपातल्या सार्वजनिक ग्रंथालयांनी ग्रंथसंस्कृती जपली आणि माणुसकीचंही उदात्त दर्शन घडवलं... त्याची ही गोष्ट...

हा लादलेला विजनवास आज अवघं जगच भोगत आहे. व्हर्च्युअल सहवासात रमत आहे. मात्र एकट्यानं जगणाऱ्या, जगावं लागणाऱ्या, शारीर व्याधी व आजारांचा सामना करत जगणार्‍या कुणाहीसाठी हा सक्तीचा बंदिवास तुलनेनं कितीतरी पीडादायी आहे. इथल्या या व्हल्नरेबल गटाची ही विकलता, हतबलता लक्षात घेऊन त्यांच्यापर्यंत पोचण्याचे, मदतीचे प्रयत्न सुरू झाले, तेव्हा  खचितच आघाडीवर राहिली ती समाजमनाशी आरपार जोडली गेलेली स्थानिक ग्रंथालयंच.......