‘जैतापूर ते पॅरिस व्हाया बर्लिन’ : अणु-ऊर्जेला विरोध या एकाच ध्येयानं पछाडलेल्या, एकाच विचारानं भारावलेल्या लोकांबरोबरचा समृद्ध प्रवास
मुळात प्रदीप इंदुलकर हे नाव परिचयाचं असेल तर हे साचेबद्ध पठडीतलं आणि सरधोपट प्रवासवर्णन असणारच नाही, हे सांगायला नकोच. त्यांचं हे पुस्तक अशाच एका चळवळीसाठी बनवलेल्या माहितीपटामुळे घडलेल्या युरोप प्रवासाची निष्पत्ती आहे. त्यामुळे या पुस्तकात अणुविरोधी चळवळीचा प्रवास जसा वाचायला मिळतो, त्याचबरोबर फ्रान्स आणि जर्मनी या दोन देशांमधील प्रवासात भेटलेली माणसं त्यांच्या रंगरूपांसह साकार होतात.......