‘लक्ष्मी विलास’ची दिवाळखोरी आणि तिचे एका परदेशी बँकेमध्ये होणारे विलिनीकरण, हे भारतीय वित्तबाजाराच्या विदारक स्थितीचे आणि आपल्या पोकळ ‘आत्मनिर्भर’तेचे एक द्योतक आहे!

एकंदर भारतीय वित्तीय बाजाराला या प्रकरणाचा मोठा फटका बसणार आहे. आधीच हेलकावे घेत असलेला वित्तीय बाजार ‘लक्ष्मी विलास’मुळे अधिक हतबल झाला आहे. ‘लक्ष्मी विलास’ बँक प्रकरणातून ठेवीदार, गुंतवणूकदार योग्य धडा घेतील आणि पुढील काळात कोणत्याही वित्तीय संस्थेबरोबर व्यवहार करताना अधिक सजग राहतील, तसेच रिझर्व्ह बँक व अर्थ मंत्रालय भारतीय वित्त बाजार अधिक सक्षम आणि पारदर्शक बनवण्याचा प्रयत्न करतील अशी आशा करू या.......