भोंग्यांच्या ‘राज’कारणावर सर्वसामान्य आंबेडकरी जनतेने योग्य भूमिका घेतली आहे! त्यातून आश्वासक वातावरण निर्माण होण्याची आशा आहे

या देशातील दलित-बहुजन-आदिवासी-भटके विमुक्त आणि अन्य शोषित वंचित समुदायाने संयम आणि शांततेची भूमिका घेत भारतीय राज्यघटनेला पूरक वर्तन करण्याचा निर्णय घेतला आहे. कोणतेही वाद घटनेच्या चौकटीत सोडवले जाण्याचा आग्रह, या निमित्ताने व्यक्त होतो आहे. आणि त्याही पुढे जात कोणतेही वाद वा हिंसा आणि संकुचितता यापेक्षा या समाजाने व्यक्त केलेली बंधुतेची भावना महत्त्वाची असून त्यातून आश्वासक वातावरण निर्माण होण्याची आशा आहे.......