‘युगानयूगे तूच’: ही कविता आंबेडकरांना अभिप्रेत समता, स्वातंत्र्य, बंधुता आणि न्यायाचा केंद्रबिंदू व क्रांतिबिंदू होते. भारतीय संविधानाचा मूल्यजागर करते.

आंबेडकरांच्या विचाराचं दर्शन घडवणारी, हा महामानव समजावून सांगू पाहणारी मराठी दीर्घकवितेच्या परंपरेतली ही महत्त्वाची कविता आहे. सध्या कवींना वाईट दिवस आहेत. त्यातल्या त्यात भूमिका घेऊन लिहिणारी संवेदनशील कवी तर हिटलिस्टवर आहेत. ‘आमच्या विरोधात लिहाल\बोलाल तर तुमचा दाभोळकर-पानसरे करू’, असं दहशतीचं वातावरण असताना कांडर यांची ही दीर्घकविता प्रकाशित होणं, ही महत्त्वाची सांस्कृतिक घटना आहे.......