जयंत पवार गेले त्या वेळची गोष्ट (हात थरथर कापायला लागले. आपली कवचकुंडले कुणीतरी काढून घेतलीत, त्वचा सोलून काढली जात आहे, असा भास होत राह्यला…)

जयंत पवार गेल्याचं कळलं, आणि मी सुन्न झालो. एक हात आणि पाय लुळा पडल्याचा भास झाला. अंगाला कापरं सुटलं. काहीच सूचेना. दाट निबिड अरण्यात आपल्याला एकटे सोडून सगळे निघून आलेत आणि आपला रस्ता हरवला आहे. हो, खरंच रस्ता हरवला आहे. हे केवळ भावनिक नाही. त्यांच्या लेखनाने आणि सहवासाने माझ्यासह आमच्या पिढीला एक नवा मार्ग दाखवला आहे. तो वाटाड्याच आता आपल्यात राह्यला नाही. लेखक कसा असावा, याचा उत्तम आदर्श म्हणजे जयंत पवार होत........