सत्यजित राय यांची गणना डी सिका, फेडरिक फेलिनी, किंवा अकिरा कुरोसावा यांच्याबरोबर केली गेली. भारतीय सिनेमासाठी ही एक मोठीच गोष्ट होती, आहे

राय यांच्या चित्रपटांचा एका सूत्रात विचार करता येईल की, नाही माहीत नाही, परंतु एक खरे की, माणूस आणि त्याची वृत्ती-प्रवृत्ती हा त्यांच्या चिंतनाचा भाग आहे. ते परिस्थिती हादेखील एक महत्त्वाचा घटक मानताना दिसतात. आपल्या चित्रपटांबद्दल सत्यजित राय यांनी असे म्हटले होते की, मध्यमवर्गीय बंगाली संस्कृतीमधील प्रेक्षक मला अभिप्रेत असतो. त्याचमुळे त्यांनी बदलत चाललेल्या मूल्यांना स्वत:चे असे एक ‘स्टेटमेंट’ दिले.......