लेखिकेने स्त्री-पुरुष समता, समानता, स्त्रियांचे स्वातंत्र्य, विवाह, संततीनियमन, सामाजिक काम, ब्रह्मचर्य यांवरच्या लिखाणातून ‘रॅडिकल गांधी’ उभा केला आहे. यातच या पुस्तकाचे योगदान सामावले आहे

वास्तविक म.गांधींच्या कार्याचा ऐतिहासिक दृष्टीने विचार करून आजच्या काळाला उचित असा विचार त्यातून शोधला पाहिजे. या ऐवजी ऐतिहासिक व समग्रदृष्टीचा त्याग करून अस्मितांचे जतन सुरू आहे. अर्थातच यात गांधींच्या अनुयायांचाही दोष आहेच. या पार्श्वभूमीवर परिवर्तनवादी लेखिका व झुंजार कार्यकर्त्या निशा शिवूरकर यांनी या पुस्तकात ‘गांधीजी आणि स्त्री-पुरुष समते’च्या विविध पैलूंचा चिकित्सक विचार केला आहे.......