‘एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ : मोठ्यांनाही आपला दृष्टीकोन तपासून पहायला लावणारी छोट्यांची रंजक सृष्टी आणि दृष्टी
ग्रंथनामा - शिफारस\मराठी पुस्तक
उमेश घेवरीकर
  • ‘एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ
  • Fri , 06 October 2023
  • ग्रंथनामा शिफारस एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य EKA KOMBDYACHE ABHIVYAKTI SWATANTRYA नामदेव माळी NAMDEO MALI

मराठीत बाल-कुमारांसाठी तुलनेने खूपच कमी प्रमाणात लिहिले जाते. जे साहित्य आहे ते एकतर रंजनवादी आहे किंवा थेट अतिवास्तववादी तरी. मुलांच्या भावविश्वाशी नाते सांगणारे, त्यांच्या कल्पना, व्यक्त होण्याचे विविध आयाम, त्यांची भाषा, शाळा, शिक्षक, झपाट्याने बदलत असलेले जग, त्यातून निर्माण होत असलेले नवनवे प्रश्न, आजची शिक्षण पद्धती, याविषयीची वस्तुनिष्ठ निरीक्षणे, असा परीघ कवेत घेत, प्रबोधनाचा अभिनिवेश टाळून नेमका संदेश पोचवणारे साहित्य तर दिवसेंदिवस दुर्मीळ होत आहे.

या पार्श्वभूमीवर नामदेव माळी यांची ‘एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ ही बाल-कुमार कादंबरी लक्षणीय ठरते. कोंबडा आणि त्याची आरवण्याची अभिव्यक्ती, ही जितकी नैसर्गिक तितकीच, या कादंबरीतील पात्रे, घटना, भाषा आणि संदर्भही नैसर्गिक व अस्सल आहेत.

गौरवच्या आजीने ‘गब्रू’ नावाचा ऐटबाज कोंबडा पाळलेला असतो. तो तिचा जीव की प्राण होता. मात्र त्याच्या आरवण्याचा त्रास होतो, म्हणून शेजारचे आजी-आजोबा पोलीस तक्रार करतात. ती नेमकी ‘लोकशाही दिना’लाच जिल्हाधिकाऱ्यांपर्यंत पोचते. त्यावर ते निवाडा देतात, ढोबळमानाने हे या कादंबरीचे कथानक आहे.

पण हा सारा प्रवास उलगडताना लेखक सुरुवातीपासून शेवटपर्यंत गुंतून  ठेवतो. त्याचबरोबर शहरे आणि ग्रामीण संस्कृती यांतील फरक, ग्रामीण शहाणपण, लुप्त होत असलेल्या म्हणी, लोकगीते, समृद्ध ग्रामजीवन यांसह मुलांचे भावविश्व, मोठ्यांचं तऱ्हेवाईक वागणं, यांबाबत लेखकाची मार्मिक निरीक्षणे... प्राणी, पक्षी, निसर्ग यांच्या नैसर्गिक हक्कावरील मानवी अतिक्रमणे, त्याचे परिणाम, माणसांचा दुटप्पीपणा, याचाही प्रत्ययकारी आढावा वाचायला मिळतो.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

‘सृजनकट्टा’ या मुलांच्या अभिव्यक्तीशी निगडीत संकल्पनेचा समर्पक वापर करताना लेखकाने शाळकरी वयातील मुलांचे विचार, त्यांची अभिव्यक्ती, वर्तमानातील विविध घटनांकडे  पाहण्याचा त्यांच्या दृष्टीकोन, आपसांतील चर्चा\संवाद, दाद देण्याची आणि विरोध नोंदवण्याची सुसंस्कृत पद्धती, मोजक्या घटना आणि शब्दांतून तरलतेने चितारली आहे. ती मोठ्यांना विचार करायला भाग पाडते. त्यामुळे या कादंबरीतून उपदेशाचा अभिनिवेशी दृष्टीकोन न बाळगता खूप काही सांगून जाणे, हा बालसाहित्याचा महत्त्वाचा गुण अधोरेखित झालेला आहे.                

प्रचलित शिक्षण पद्धतीमधील त्रुटी मुलांच्या विचारप्रक्रियेतून, संवादातून समोर येतात आणि त्यात बदल व्हायला हवा, हे आपल्याला मनोमन पटते, हे या कादंबरीचे बलस्थान म्हणावे लागेल. शिक्षण म्हणजे मुलांना चार भिंतीत कोंडून करून शिक्षकाने एकतर्फी  बडबडणे, या रूढ, पारंपरिक समजाला खोडून काढत शिक्षकाने न शिकवताही मुलं नैसर्गिक पद्धतीने आणि निसर्गाकडून सहज शिकत असतात, हे मूल्य अनेक प्रसंगांतून सिद्ध करत लेखकाने शिक्षणक्षेत्रातील जाणकारांपुढेही अनेक प्रश्न उभे केले आहेत.

‘सृजनकट्ट्या’वर होणारा मुलांचा परस्परसंवाद\चर्चा, गुगलसर्च करून जागतिक संदर्भ शोधत त्यांना स्थानिक प्रश्नांशी जोडत, त्यावर उपाय शोधणे, या गोष्टी तर सध्या शिक्षणक्षेत्रातही चर्चेचा विषय झालेल्या आहेत. यातून एकविसाव्या शतकातील संवाद, सर्जनशीलता, चिकित्सक विचार आणि सहकार्य, या चार जीवनकौशल्यांशी लेखक नातं सांगतात

कोंबड्याच्या आरवण्यावर बंदी घालण्याची मूळ घटना फ्रान्समध्ये घडलेली आहे, हा मूळ संदर्भ येऊ लागतो, तेव्हा ही कादंबरी माहितीच्या अंगाने जाऊन विरस होतो की काय, अशी शंका येऊ लागते, पण ती अल्पकाळच. कारण लेखकाने जाणीवपूर्वक वेगळा फॉर्म निवडला आहे. लेखकाने सलग गोष्ट न सांगता घटनाक्रमाची वेगळ्या प्रकारे मांडणी केली असली, तरी एकसंध वाचनानुभवाला ती बाधक ठरत नाही.

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

.................................................................................................................................................................

गौरवचे कोंबड्यात रूपांतर होणे, त्याने गब्रूसोबत जंगलातील प्राण्यांच्या सभेत सहभागी होणे, तिथे विविध प्राण्यांच्या माणसांविषयी मार्मिक तक्रारी ऐकायला मिळणे, हा भाग अद्भुतता, रंजकता यांचा तोल जपतो, तेही वास्तवाचे भान सुटू न देता, ही बाब अत्यंत महत्त्वाची ठरते.   

शेवटाकडे जाताना लेखकाने दिलेले अनपेक्षित वळण, संपत चाललेली एकत्र कुटुंब पद्धती, ज्येष्ठांच्या वाट्याला येत असलेले एकाकीपण, त्यातून उद्भवणाऱ्या मानसिक समस्या, यांवर भाष्य करते आणि त्यावर उपायही सुचवते.

मुलांना काय समजते, असा सार्वत्रिक गैरसमज आहे, पण त्यांची समज अनेकदा  मोठ्यांच्या डोळ्यात अंजन घालते. वर्तमानातील अनेक चुकीच्या आणि घातक बाबींवर उपाय शोधायचे असतील आणि संविधानिक मूल्यं जपायची असतील, तर या साऱ्या घटनांकडे समाजधुरिणांनी मुलांच्या दृष्टीने आणि दृष्टीकोनातून पाहायला हवे. असे घडले, तर त्यांना त्यांच्या भूमिका अवश्य तपासून पाहाव्याशा वाटतील, हा विचार मांडणारी ही कादंबरी अनेक अर्थाने महत्त्वाची आहे.

‘एका कोंबड्याचे अभिव्यक्ती स्वातंत्र्य’ - नामदेव माळी

साधना प्रकाशन, पुणे | पाने - ९४, मूल्य - १२५ रुपये.

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. 

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला ​Facebookवर फॉलो करा - https://www.facebook.com/aksharnama/

‘अक्षरनामा’ला Twitterवर फॉलो करा - https://twitter.com/aksharnama1

‘अक्षरनामा’चे Telegram चॅनेल सबस्क्राईब करा - https://t.me/aksharnama

‘अक्षरनामा’ला Kooappवर फॉलो करा -  https://www.kooapp.com/profile/aksharnama_featuresportal

.................................................................................................................................................................

तुम्ही ‘अक्षरनामा’ची वर्गणी भरलीय का? नसेल तर आजच भरा. कर्कश, गोंगाटी आणि द्वेषपूर्ण पत्रकारितेबद्दल बोलायला हवंच, पण जी पत्रकारिता प्रामाणिकपणे आणि गांभीर्यानं केली जाते, तिच्या पाठीशीही उभं राहायला हवं. सजग वाचक म्हणून ती आपली जबाबदारी आहे.

Pay Now

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......

या स्त्रिया म्हणजे प्रदर्शनीय वस्तू. एक माणूस म्हणून जिथं त्यांना किंमत दिली जात नाही, त्यात सहभागी होण्यासाठी या स्त्रिया का धडपडत असतात, हे जाणून घेण्यासाठी मी तडफडत होते…

ज्यांनी १९७०च्या दशकाच्या अखेरीला मॉडेल म्हणून काम सुरू केलं आणि १९८०चं संपूर्ण दशकभर व १९९०च्या दशकाच्या सुरुवातीचा काही काळ, म्हणजे फॅशन इंडस्ट्रीच्या वाढीचा आलेख वाढायला सुरुवात झाली, त्या काळापर्यंत काम करत राहिल्या आहेत, त्यांना ‘पहिली पिढी’, असं म्हटलं जातं. मी जेव्हा त्यांच्या मुलाखती घेतल्या, तेव्हा त्या पस्तीस ते पंचेचाळीस या दरम्यानच्या वयोगटात होत्या. सगळ्या इंग्रजी बोलणाऱ्या.......

निर्मितीचा मार्ग हा अंधाराचा मार्ग आहे. निर्मितीच्या प्रेरणेच्या पलीकडे जाणे, हा प्रकाशाकडे जाण्याचा, शुद्ध चैतन्याकडे जाण्याचा मार्ग आहे

ही माया, हे विश्व, हे अज्ञान आहे. हा काळोख आहे. त्याच्या मागील शुद्ध चैतन्य हा प्रकाश आहे. सूर्य, उषा ही भौतिक जगातील प्रकाशाची रूपे आहेत, पण ती मायेचाच एक भाग आहेत. ह्या अर्थाने ती अंधःकारस्वरूप आहेत. निर्मिती ही मायेची स्फूर्ती आहे. त्या अर्थाने माया आणि निर्मिती ह्या एकच आहेत. उषा हे मायेचे एक रूप आहे. तिची निर्मितीशी नाळ जुळलेली असणे स्वाभाविक आहे. निर्मिती कितीही गोड वाटली, तरी तिचे रूपांतर शेवटी दुःखातच होते.......