‘फोर्टिफाईड तांदळा’ने देश ‘कुपोषणमुक्त’ होईल? जगामध्ये फोर्टिफिकेशनमुळे कुपोषणाची समस्या दूर झाली, असे कुठलेही उदाहरण नाही!

कुपोषणाची समस्या संपवण्यासाठी स्थानिक पातळीवर भरपूर उपाय उपलब्ध असताना मोदी सरकार ‘फोर्टिफिकेशन’ का लागू करत आहे? कारण हे धोरण मोदी सरकारने ठरवलेले नाही, तर अन्न धान्याच्या क्षेत्रांमध्ये असलेल्या मोठमोठ्या कंपन्यांनी ठरवलेले आहे. जितके जास्त कुपोषण, तितके जास्त ‘फोर्टिफिकेशन’, तितकाच जास्त व्यापार आणि मग जास्तीत जास्त नफा, अशी ही साखळी आहे. थोडक्यात, हा‌ धंदा पूर्णपणे गरीब देशांतील ‘कुपोषणा’वर अवलंबून आहे.......