खरे तर सतीश आळेकरांनी या नाटकाचे नाव ‘ठकीशी संवाद’ याऐवजी ‘मध्यमवर्गाचे महानिर्वाण’ असे त्यांच्या अगोदरच्या नाटकाच्या धर्तीवर ठेवायला हवे होते!
संहितेतील हे विविध अर्थ आजची कलाकारांची पिढी कसे पाहते? त्यांच्या दृष्टीला हे नाटक, त्यातले विविध व्यंगार्थ कसे दिसतात? तरुण दिग्दर्शक अनुपम बर्वे याने या नाटकाचे सारे व्यंगार्थ ज्या पद्धतीने संहितेत अचूकपणे टिपून बाहेर साकारले आहेत, त्याच्या ‘दृष्टी’ला आणि ‘कर्ते’पणाला खरोखरीच दाद द्यायला हवी. अनुपमने अत्यंत कल्पकपणे नाटकातील अनेक आशयसूत्रे प्रखरपणे बाहेर काढली आहेत.......