‘हक्कसोड’ : तुटत चालेल्या भावभावनांचं सावत्रपण ठसठसत्या खवंदासारखं होतं. त्यातून नात्यातल्या कोरडेपणाची जाणीव होते
कादंबरी आटोपशीर असल्यामुळे कथानक कुठलेही आडेवेढे न घेता हृदयाला स्पर्श करणारं आणि जगण्याच्या तीव्रतम असह्यतेला वाचा फोडणारं आहे. ही कादंबरी ‘स्त्री’ या नात्यातून फसल्या जाण्याच्या एकाच गोष्टीवर बोलत नाही, तर अनेक वेगवेगळ्या नात्यातून फसल्या जाण्याच्या जाणिवेनं तिचा पट विस्तृत होत जातो आणि मानवी पातळीवरून बदलत चाललेला नात्याच्या गुंतागुंतीचा पीळ उकलत जाण्यास सुसह्य ठरतो.......