पुस्तक हे एकच असतं. प्रत्येकाचं एक. आपल्या घरी आपलं विशिष्ट पुस्तक आलं की आपण त्या पुस्तकात प्रवेश करतो आणि ते आपल्यात
कुणाला सापडलं आपलं पुस्तक आणि त्याला वाचनाची आवड असेल, तर तो ते ठेवून घेईल स्वतःकडे. पुस्तकाच्या मधल्या काही पानांवर आपल्या बोटांचे पुसट डाग आहेत, ते त्याला दिसतील. काही वेळा कुशीत घेऊन झोपतो आपण पुस्तक. आपण पुस्तकावर आपलं नाव लिहीत नाही. तो माणूस मिळालेलं पुस्तक आपलंसं करून स्वतःजवळ ठेवू शकेल. आपल्याविषयी अनोळखी व्यक्तीने हळुवार विचार करावा म्हणून काही माणसं आवडती पुस्तकं सोडून देत असावीत.......