‘पालकनीती’ ही एक वैचारिक चळवळ आहे, मात्र तिचं स्वरूप संघर्षाचं नाही, जिव्हाळ्यातून आलेल्या जाणिवेचं आहे. त्यामागचा हेतू - मुलं माणूसपणानं वाढावीत - इतका मूलगामी आणि साधा आहे

‘पालकनीती’ मासिक बाजारू जगापासून लांब होतं आणि आहेच, त्यामागचा हेतू - मुलं माणूसपणानं वाढावीत - इतका मूलगामी आणि साधा आहे. न्याय, ऋजुता, समता अशा मानवी मूल्यांवर या मासिकाची बैठक आधारलेली असावी, हे सुरुवातीपासून मानलेलं तत्त्व. पालकत्व निभावणं म्हणजे मुलांचं संगोपन, आरोग्य, शिस्त, इतकं राहू नये, यासाठी ‘पालकनीती’नं मुलाचं वाढणं समजावून घ्यायला आजवर मदत केली, पालकांना विचार करायला भाग पाडलं.......