पत्रकारिता हे एक दर्शन आहे, पवित्र कर्तव्य, धर्म आहे, असे म्हणणे आज ‘हास्यास्पद’ ठरले आहे. अशी पत्रकारिता लोकशाहीची ‘रक्तवाहिनी’ व ‘आधारस्तंभ’ कशी काय राहू शकते?

माध्यमांच्या या शक्तीचे मात्र भयदेखील लोकमानसात आहे. त्यामुळे तटस्थता, वस्तुनिष्ठता ही पत्रकारितेची ग्रांथिक वैशिष्ट्ये तेवढी उरतील असे भय वाटू लागले आहे. पत्रकार आणि पत्रकारिता यांचे हे बदलते स्वभाव हा जगभरातच माध्यमाच्या नीतिमत्तेसंबंधांत दक्ष असणाऱ्यांसाठी चिंतेचाच विषय आहे. वृत्तपत्राचे आणि अभिव्यक्तीचे स्वातंत्र्य हे यापैकी कोणत्या वर्गाचे? पत्रकारांचे की मालक-संचालकांचे?.......