अक्षय शिंपी यांच्या ‘बिनचेहऱ्याचे कभिन्न तुकडे’ या काव्यसंग्रहात काळोख आणि मृत्यूवर अपार प्रेम आहे
३६५ रात्री नसत्या, तर कोणाच्या कुशीत माणूस निजला, सुखावला किंवा शांत पहुडला असता? भुईच्या गर्भातील काळोखातच अंकुरतात बीजं. काळोखातच उठतात बायका अन् फिरवतात रहाटगाडगं. आईच्या गर्भात असतोच ना अंधार; म्हणजेच आपला पहिला सामना होतो तो अंधाराशी. मग कसलं भय, भीती, भयग्रस्तता काळोखाशी? म्हणून कवी, अभिनेता अक्षय शिंपीला आवडतो काळोख! काळोखाच्या छटा. ओलावा आपलेपणाचा अन् पांघर मृत्यूचा.......