आज आता, वाल्याचा वाल्मिकी झाल्यानंतर, विराट आपला तो मस्तवालपणा खुल्या दिलानं मान्य करताना दिसतो. यालाही अर्थातच एक जिगर लागते

विराटने घेतलेल्या मेहनतीचं फलित जसं त्याच्या कामगिरीतून मैदानात दिसतं. तसंच ते त्याच्या पाठीराख्यांच्या वाढत्या संख्येतूनही दिसतं. तसं पाहता, शेजारी पाकिस्तानशी आपली खुन्नस जुनीच. त्यामुळे उभय देशांतल्या नागरिकांनी एकमेकांच्या गुणवत्तेचं खुल्यादिलाने कौतुक करण्याचे प्रसंग क्वचितच येतात. निःशंकपणे ते निमित्त विराटनं पाकिस्तानला मिळवून दिलं. एकेकाळचा पार्टीबॉय विराट आता, संबंध क्रिकेटविश्वाचा आदर्श बनला.......