‘पहलगाम’पासून ‘ऑपरेशन सिंदूर’पर्यंत... ‘एकते’च्या परीक्षेवर भारत कुठे उभा आहे?
भारताची खरी ओळख आहे ‘विविधतेत एकता’. पंतप्रधान मोदी यांनीसुद्धा ३० मार्च २०२५ रोजी ‘मन की बात’मध्ये देशातील विविध सण व नववर्ष साजरे केल्याने एकतेची भावना दृढ होते, असे सांगितले. त्यांनी ईदसह इतर सणांच्या शुभेच्छा दिल्या आणि एकतेस बळकटी देण्याचे आवाहन केले. भारतीयांनी वारंवार दाखवून दिले आहे की ते दहशतवादाविरोधात एकदिलाने उभे आहेत. मुस्लीम समुदायानेही पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा जोरदार निषेध केला आहे .......