‘कळीकाळ’ : त्याला उलटा प्रवास करायचा नव्हता. लोक कामधंदा मिळवण्यासाठी शहरात जातात. आपण गावाकडे जाऊन काय करणार, या विचारानं तो अस्वस्थ होत होता…
एसटी पुण्याच्या रोडवरून जोरात जात होती. खिडकीवाटे तितक्याच जोरात वारा आत येत होता. त्या सुसाट वाऱ्यामुळे तो भानावर आला आणि गावाकडल्या मंडळींना नोकरीचं कोणतं कारण सांगायचं, यावर विचार करायला लागला. त्या वेळी त्यानं ठरवलं, आपण महामारीचं उत्तर द्यायचं. येथील भ्रष्ट व्यवस्थेमुळे नोकरीपासून दूर राहिलो, असं म्हटलं, तर लोक मूर्खात काढतील, पहिलंच उत्तर बरोबर आहे. आता पुढं काय?.......