‘ब्लॉटेंटिया’ : वस्तुनिष्ठ न राहता ही कविता आत्मनिष्ठ होते. हा काव्यसंग्रह सामान्य माणसाचे आत्मचिंतन ठरावे
‘ब्लाटेंटिया’ हा इंग्रजी शब्द. अर्थ आहे - झुरळ! सजीवाची, माणसाचे प्रतीक म्हणून आले आहे हे झुरळ. याशिवाय अनेकविध प्रतिमांच्या बहुविधमिती याला लाभलेल्या आहेत! झुरळ मानवाच्या दुर्दम्य आशावादाचे प्रतीक, प्रतिनिधी म्हणून या कवितेत दिसून येते. मानवी मनातील दुर्दम्य आशावाद आणि विजिगीषू जीवनवाद संपृक्ततेने झुरळाच्या योजनेमध्ये आढळतो. या दृष्टीने व्यापक, वैश्विक सत्याचे दर्शन या कवितेतून घडते.......