एका देशामधल्या समूहानं एकाकी पडत जाण्याची प्रक्रिया एका कोवळ्या मुलाच्या एकाकी पडत जाणाऱ्या आयुष्याशी इतकी तादात्म्य पावते की, त्यातून एक थंडपणा संपूर्ण चित्रपटात झिरपत जातो
टोकाची दृश्यं एकाच वेळी, एकाच फ्रेममध्ये पाहायला मिळाली, तर त्याचा काय परिणाम होईल? म्हणजे ‘ऑल क्वाएट ऑन वेस्टर्न फ्रंट’मध्ये एकीकडे दिसणारा एखाद्याला भोसकल्यावर त्यालाच आटोकाट वाचवण्याचा प्रयत्न करणारा सैनिक आणि दुसरीकडे दिसणारा युद्धबंदी जाहीर झाल्यावर कागदोपत्री युद्ध संपायला वेळ असल्यामुळे युद्ध सुरू ठेवायला लावणारा एका बटालियनचा प्रमुख. हे नक्की कशाचे द्योतक आहे? ही कुठली मूल्यव्यवस्था आहे? .......