संत चोखामेळा हा एक सांस्कृतिक वारसा आहे. त्यांच्या रूपाने अतिशय प्रतिभासंपन्न असा एक कवी मराठीला लाभला आहे
संत चोखामेळा हा एक सांस्कृतिक वारसा आहे. त्यांच्या रूपाने अतिशय प्रतिभासंपन्न असा एक कवी मराठीला लाभला आहे. मात्र तत्कालीन परिस्थिती लक्षात न घेता अनाठायी विद्रोही अपेक्षा बाळगून त्यांना नाकारणे हे चुकीचे ठरते. तसा अविवेकी निर्णय घेणे, हे एक प्रकारे सांस्कृतिक करंटेपण ठरू शकेल. असे करणे म्हणजे एकप्रकारे सबंध वारकरी परंपराच प्रक्षिप्त म्हणून नाकारण्यासारखे ठरेल.......