सरंजामशाही ही पद्धत लोकशाहीच्या आणि निवडणुकांच्या मार्गाने सत्ता, अधिकार, संपत्ती, प्रतिष्ठा यांवर नियंत्रण मिळवत आहे. त्यामुळे एक छोटा गट सत्तेवर नियंत्रण ठेवताना दिसतो

सरंजामशाही ही केवळ कृषी उत्पादन पद्धतीमध्ये असते, हा गैरसमज आहे. सरंजामशाहीची मूल्यव्यवस्था लोकशाहीविरोधी असते. सरंजामशाहीची मूल्यव्यवस्था निवडणुका, मतदान, प्रौढ मताधिकार, संसदेतील चर्चा, मंत्रिमंडळाची रचना, सत्तेचे वाटप, सार्वजनिक धोरण-निर्मिती या सर्वांवर प्रभाव टाकते. समकालीन युगात सरंजामशाही प्रबळ झालेली आहे. लोकशाहीत स्वातंत्र्य, समता, बंधुता, न्याय या गोष्टी कशा तरी तग धरून आहेत.......