आम्ही मागितली त्या तत्त्वावर या प्रश्नाची सोडवणूक झाली पाहिजे, नाही तर आपद्-धर्म म्हणून सार्वमताच्या आधारे सोडवणूक झाली पाहिजे!
जो वादग्रस्त प्रदेश आहे त्यात ८०० ते १,००० गावे आहेत. या वादग्रस्त गावांमध्ये आम्ही सार्वमत घ्यावयाला तयार आहोत. ही सूचना केल्यानंतरही कर्नाटकाला ते चालत नाही. त्यांना काय चालते हे आम्हांला समजत नाही. त्यांना वेलदोड्याने थंडी होते आणि लवंगेने उष्णता होते. त्यांना काय चालते हे समजत नाही. त्यांना निवडणुकीचा निकाल मान्य नाही, भाषिक बहुसंख्येचा आधार चालत नाही. सार्वजनिक मतही चालत नाही.......