मागच्या जन्मीचे पाप, या जन्मीचे भोग याच्याशी कर्करोग होण्याचा सूतराम संबंध नाही, हे विज्ञानाधारित सत्य वाचकांपर्यंत पोहोचावे, हा या पुस्तकामागचा उद्देश आहे
या पुस्तकात कर्कविज्ञानाच्या आजवरच्या इतिहासातल्या दोन ओळींत, दोन वाक्यांत दडलेल्या चित्तवेधक गोष्टी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या गोष्टी माणसाच्या दुर्दम्य इच्छाशक्तीचे, संयम, जिद्द आणि सृजनशीलतेचे विहंगम दर्शन घडवणाऱ्या आहेत. या गोष्टींमध्ये माणसाच्या बुद्धिमत्तेची, प्रज्ञा-प्रतिभेची लख्ख प्रतिमा उमटली आहे. त्यातून कर्कविज्ञानाचा मानवी चेहरा वाचकांच्या नजरेपुढे येण्यास मदत होईल, अशी आम्हाला आशा आहे.......