ही प्रा.सरदेशमुखांची ‘विश्रब्ध शारदा’ आहे. या नोंदींच्या प्रकाशात त्यांची साहित्यसंपदा आणि त्यांनी ज्यांच्यावर भाष्य केले आहे, ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणे शक्य होईल

लेखकाला नुसती प्रतिभा असून भागत नाही. त्याबरोबर अभ्यास, चिंतन, मनन, वाचन आणि विश्वभान असावे लागते. समीक्षेबद्दलही हेच म्हणता येईल. असे झाल्यावर लेखकाच्या प्रतिभेला आणि समीक्षकाच्या विचारांना सोन्याची झळाळी येते. या नोंदी वाचकांच्या मनात हे भान जागृत करतात. या नोंदींतून प्रा.सरदेशमुखांची विचारमौक्तिके प्राचुर्याने पसरलेली आहेत. त्यात त्यांच्या विचारातले सौंदर्य पदोपदी दिसते.......