‘नि:शब्द सावल्या, Grief unplugged’ : ‘मृत्यू...’ समजून घेण्यासाठी लेखिकेने स्वतःशी केलेला संवाद
आपल्या प्रिय माणसाला निरोप सावकाशच देता येतो. निरोप देता देताच आठवणींचा दिवा उजळतो. त्या उजेडात समजतं ‘तिने माझ्यामध्ये तिला स्वतःलाच जन्म दिला होता कदाचित. म्हणून एवढी माया केली... ’ उजळलेल्या वाटेवर सम्यक भाव तिच्या मनाला सहज उभारी देतात. लेखिका ‘दिवसातल्या प्रत्येक तासाचा, मिनिटाचा एकेक टाका घालत… देखणी, अगदी घट्ट गोधडी शिवताना दोऱ्याला गाठ मारायची विसरत’ नाही!
.......