निखळ, निरपवाद, निरालंब स्वातंत्र्य कोणतेही अर्थकारण खरोखरच कोणाला बहाल करते का, हा एक मोठा गहन, गंभीर प्रश्नच आहे. त्यालाच कदाचित ‘आर्थिक शहाणपण’ म्हणत असावेत!

‘स्वातंत्र्य’ आणि ‘स्वयंनिर्णय’ या दोहोंत व्यवहारतः तफावत नांदत राहणे, हेच अर्थकारणातील ‘स्वातंत्र्य’ या संकल्पनेचे वास्तव रूप. कोणत्याही अर्थकारणात आणि खुल्या व मुक्त स्पर्धेच्या नियमांनुसार साकारणाऱ्या अथवा कडेकोट अशा केंद्रवर्ती नियोजन प्रक्रियेद्वारे सक्रिय राहणाऱ्या अर्थव्यवस्थेत सर्वसामान्यांच्या स्वातंत्र्याला आणि त्यांद्वारे निपजणाऱ्या स्वायत्ततेला अशा अदृश्य मर्यादा व्यवहारात असतातच.......

इतिहासाचे अत्यंत सम्यक ज्ञान, तौलनिक धर्मशास्त्राचा डोळस अभ्यास, भागवत-धर्माचे संस्कार आणि अतिशय निष्कलंक ज्ञानोपासना यांचा संगम म्हणजे बाबासाहेबांचे ‘कर्ते अर्थचिंतन’ आहे

केंद्रीय वित्तीय आयोग हे बाबासाहेबांचं खऱ्या अर्थानं लखलखीत आणि प्रेरणादायी स्मारक आपल्यापुढे आहे. ही संस्था आपल्या संपूर्ण वित्त व्यवहाराच्या व्यवस्थापनामध्ये अत्यंत महत्त्वाची घटनात्मक संस्था राहिलेली आहे. घटनात्मक व्यासपीठ म्हणून केंद्रीय वित्तीय आयोगासारखी संस्था स्थापन करणं, हे बाबासाहेबांचे भारतीय लोकव्यवहारावरचे आणि विशेषत: अर्थकारणावरचे मोठे उपकार आहेत.......