थोर संगीतकार (आणि दिग्दर्शक, निर्मातेही) चोर!
सदर - इनसाइडर
अमोल उदगीरकर
  • 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या सिनेमाचं पोस्टर
  • Sat , 11 March 2017
  • इनसायडर Insider अमोल उदगीरकर Amol Udgirkar बद्रीनाथ की दुल्हनिया Badrinath Ki Dulhania तम्मा तम्मा Tamma Tamma जुम्मा चुम्मा Jumma Chumma माय कझिन विन्नी My Cousin Vinny बंदा ये बिंदास है Banda Yeh Bindaas Hai मन Mann

धर्मा प्रोडक्शन्सचा 'बद्रीनाथ की दुल्हनिया' या नावाचा चित्रपट येत आहे. त्यात निर्माता-दिग्दर्शकांनी माधुरी-संजय दत्त यांच्या 'थानेदार' चित्रपटातलं 'तम्मा तम्मा' गाणं 'रिक्रिएट' केलं. या गाण्यावरून काही दिवसांपूर्वी बरंच वादंग उठलं होतं. हीच धून असणारं अजून एक गाणं अमिताभ बच्चनच्या 'हम' चित्रपटात (जुम्मा चुम्मा) वापरलं होतं. 'थानेदार'ला बप्पी लाहिरी यांचं संगीत होतं, तर 'हम'ला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांचं. तर त्यावेळेस ही धून कुणाची यावरून बप्पी लाहिरी आणि लक्ष्मीकांत प्यारेलाल यांच्यात जोरदार भांडण झालं. दोन्ही बाजूंनी ओरिजनल धून आपलीच असून, दुसऱ्याने ती ढापली आहे, असा आरोप उच्चरवात केला गेला. प्रसारमाध्यमांतून दोन्ही बाजूंनी एकमेकांवर यथेच्छ चिखलफेक केली. नंतर काही वर्षांनी उघडकीला आलं की, हे गाणं या दोघांचंही नव्हतं. हे कम्पोज केलं होत गयानामधल्या मॉरी कांटे या कलाकारानं. आपल्या गाण्यावरून भारतासारख्या देशात रण माजलं आहे, याची त्या मनस्वी कलाकाराला खबरही नव्हती. एखाद्या घरात दोन चोर शिरावेत, तिथल्या एका मूल्यवान दागिन्यांवर दोघांचीही नजर पडावी, दोघांचा हा दागिना कोण चोरणार यावरून भांडण सुरू व्हावं आणि घरमालक गाढ झोपेत असावा, असाच काहीसा हा प्रकार झाला!

करण जोहरलाही 'बद्रीनाथ की दुल्हनिया'मधल्या गाण्याचं श्रेय मॉरी कांटेला द्यावंसं वाटलं नाही. 

संगीत चौर्य म्हटलं की, भारतीय लोकांना हटकून आठवतात ते अनु मलिक (याच्यावर इस्रायलच्या राष्ट्रगीताची धून चोरण्याचा आरोप पण आहे) आणि प्रीतम. पण आपली संगीतचौर्याची थोर परंपरा फार मोठी आहे. कोण नाहीत या परंपरेचे पाईक? आर. डी. बर्मन, ओ. पी. नय्यर, सलील चौधरी (यांनी एका गाण्यात मोझार्टच्या सिम्फनीवरच डल्ला मारला होता), शंकर -जयकिशन, राजेश रोशन, नदीम श्रवण, आनंद-मिलिंद, जतीन-ललित आणि आपले बहुतेक दिग्गज संगीत दिग्दर्शक या संगीत चौर्याच्या महान परंपरेचे पाईक आहेत. अनेक लोकांच्या तरुणपणीच्या रम्य आठवणींचा नॉस्टॅल्जिया हा यांच्या संगीतावर चालतो. अनेक लोक आपल्या आवडत्या संगीतकारांच्या इतके प्रेमात असतात की, मग ते ‘शंकर-जयकिशन नाईट’ किंवा ‘एक शाम नय्यर के साथ’ असे कार्यक्रम आयोजित करतात आणि त्यांनी सहीसही उचललेल्या गाण्यांची हिंदी व्हर्जन्स ऐकत आपल्या नॉस्टॅल्जियाच्या नावानं उसासे टाकतात.

या संगीत चौर्य करणाऱ्या लोकांचं व्यक्तिस्तोम इतकं मोठ्या प्रमाणावर माजलं आहे की, त्यांच्या संगीतचौर्यावर काही ऐकून घेण्याचीही त्यांची तयारी नसते. या लोकांनी स्वतःची अशी सुंदर गाणी केली आहेतच यात वादच नाही. पण या संगीतदिग्दर्शकांनी अनेक गाणी मूळ संगीतकारांची परवानगी न घेता अमेरिकन, युरोपियन, आफ्रिकन आणि अगदी पाकिस्तानी गाण्यांच्या धून इथं स्वतःच्या नावावर बिनदिक्कत खपवल्या आहेत, हे मान्य करावं लागतंच. 'मन' हा आमिर खानचा चित्रपट सगळ्यांना आठवत असेल. चित्रपट तिकीटखिडकीवर आपटला असला तरी त्याचं संगीत सुपरहिट होतं. या चित्रपटाला नदीम-श्रवण जोडगोळीतल्या श्रवणची मुलं असणाऱ्या संजीव-दर्शनच संगीत होतं. या 'मन' चित्रपटाच्या नावानं एक आगळा वेगळा विक्रम आहे. त्या चित्रपटातलं प्रत्येक गाणं हे अनु मलिकच्या शब्दांत सांगायचं तर 'इन्स्पायर्ड' आहे. संगीतचोरीचा हा आगळा वेगळा लाजिरवाणा विक्रमच! 

जेव्हा हे संगीतचौर्य जोरात चालू होतं, तेव्हा भारत उर्वरित जगाशी जोडला गेलेला नव्हता. उर्वरित जगातल्या संगीतकारांनाही भारतासारख्या तिसऱ्या जगातल्या देशात आपलं संगीत चोरलं जातंय याची कल्पना नव्हती. त्यामुळे सुमडीत हा उद्योग बराच काळ चालला. विदेशी संगीत ऐकणाऱ्यांची आपल्याकडची संख्याही अतिशय अल्प होती. जागतिकीकरणानंतर परिस्थिती हळूहळू बदलायला लागली. सांस्कृतिक आणि आर्थिकदृष्ट्या भारत उर्वरित जगाशी जोडला जाऊ लागला. विदेशी संगीतकारांचं संगीत हळूहळू आपल्याकडे यायला लागलं आणि आपल्याकडच्या संगीतदिग्दर्शकांचं चौर्यकर्म उघडकीस यायला लागलं. इंटरनेटची व्याप्ती जशी जशी वाढायला लागली, तसं तसं हे चौर्यकर्म अजून वेगानं उघड पडायला लागलं. ‘आता बाप दाखव नाहीतर श्राद्ध घाल’ युगात युट्युबवर तुम्ही लगेच चोरलेली गाणी शोधू शकता. अनेक भारतीय लोकांनीही संगीतचौर्यावर संशोधन करून पुराव्यांसकट आपल्या संगीतदिग्दर्शकांची चोरी उघडी केली. सज्जाद किंवा रेहमानसारखे काही लखलखीत अपवाद वगळता थोड्याफार फरकानं आपले बहुतेक संगीतकार सांगीतिक चौर्यात लिप्त आहेत, ही गोष्ट या संशोधनावरून उघड होते. 

या संगीतकारांच्या चोरीचं समर्थन करणारे एक बाजू मांडतात. त्यांचं मत असं असतं की, या संगीत दिग्दर्शकांनी 'मध्यस्थाची' भूमिका बजावल्यामुळे तेव्हाच्या भारतीय प्रजेला जागतिक दर्जाचं संगीत ऐकायला मिळालं. पण ही 'मध्यस्थी' ओरिजनल संगीतकाराला श्रेय देऊनही करता आली असतीच की! त्यामुळे या युक्तिवादात फारसा दम नाही.

पण फक्त संगीतचौर्याबद्दल बोलणं म्हणजे त्यांच्यावर अन्याय होईल. आपले चित्रपटलेखक, दिग्दर्शक हेही मोठ्या प्रमाणात दुसऱ्यांची कलाकृती चोरण्याबद्दल प्रसिद्ध आहेत. आपले अनेक गाजलेले चित्रपट हुबहू इंग्रजी, कोरियन, तुर्की सिनेमांची नक्कल आहेत. इतकंच काय आपल्या सिनेमांच्या पब्लिसिटीसाठी वापरल्या जाणाऱ्या पोस्टरच्या कल्पनाही चोरलेल्या  असतात. भारतीय लोक आपल्या अनैतिक वागण्यासाठी जगात ओळखले जातात. आपण पायरेटेड चित्रपट बघतो, पायरेटेड संगीत ऐकतो, पायरेटेड सॉफ्टवेअर्स वापरतो, ट्रॅफिक पोलिसला चिरीमिरी देतो आणि त्यात आपल्याला काहीच वावगं वाटत नाही. अशा देशात संगीतचौर्य हा फारसा महत्त्वाचा मुद्दा असूच शकत नाही. कारण एक समाज आणि एक देश म्हणून आपण कायमच ‘जुगाडू’ होतो आणि राहू. 

शेवटी एक मुद्दा स्पष्ट करणं जरुरी आहे. वर ज्या संगीत दिग्दर्शकांच्या चौर्यकर्माचा उल्लेख केला आहे, त्यांच्याबद्दल मला आदर आहे. या लोकांनी अनेक सुमधुर ओरिजनल गाणीही बनवली आहेत हेसुद्धा मान्यच आहे. पण त्यांच्या कारकिर्दीचं सकल मूल्यमापन करताना त्यांच्या संगीतचौर्याचा हिशेबही मांडायला हवाच. ज्यानं ओरिजनल गाणं बनवलेलं असेल, त्याला उशिरा का होईना श्रेय द्यायला हवं. परिस्थिती हळूहळू बदलत आहे. अनेक विदेशी स्टुडियोजची आणि म्युझिक लेबल्सची ऑफिस भारतात आली आहेत. ते आपल्याकडच्या चित्रपटविषयक आणि संगीतविषयक घडामोडींवर बारीक नजर ठेवून आहेत. मध्यंतरी बी. आर. चोप्रांच्या प्रोडक्शन हाऊसने गोविंदा आणि लारा दत्ताला घेऊन ‘बंदा ये बिंदास है’ नावाचा चित्रपट सुरू केला. तो चित्रपट 'माय कझिन विन्नी' या चित्रपटाची सहीसही नक्कल होती. पण ट्वेन्टीएथ सेंच्युरी फॉक्स या मूळ निर्मात्यांना याची भनक लागली. त्यांनी लगेच कोर्टात निर्मात्यांविरुद्ध खटला गुदरला. कोर्टात सिद्ध झालं की, चोप्रांचा चित्रपट ही 'माय कझिन विन्नी'ची नक्कल आहे. निर्मात्यांना एक कोटी रुपये ट्वेन्टीएथ सेंच्युरी फॉक्सला द्यावे लागले. चित्रपटही गुंडाळला गेला. ही केस सृजनशील चौर्यकर्माच्या बाबतीत लँडमार्क केस मानली जाते. तेव्हापासून आपल्याकडची चोरी परंपरा खंडित झाली आहे. पण जोपर्यंत आपला 'जुगाडू' अॅटिट्यूड कायम आहे, तोपर्यंत हे पूर्णपणे थांबणार नाहीच. 

लेखक फँटम फिल्म्ससोबत पटकथा लेखक म्हणून काम करतात.

amoludgirkar@gmail.com

Post Comment

Vijay Paranjape

Tue , 12 March 2019

माय कझिन विन्नी हा मराठी मधे कायद्याचे बोला या नावाने हुबेहुब अगदी व्यक्तिरेखेच्या लकबी सकट उचलला होता


Chandrakant Kamble

Wed , 28 June 2017

yes this is Indian mentality.


Ravindra Gandhi

Sat , 22 April 2017

This happens in Pharma and medical industry also..


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

नेहरूंऐवजी पटेल भारताचे पंतप्रधान झाले असते, तर काय झाले असते, या प्रश्नाला अर्थ नाही. पण ते अधिक काही वर्षँ जगले असते, तर काय झाले असते, हा प्रश्न मात्र रास्त आहे (लेखांक तिसरा आणि शेवटचा)

पं. नेहरू-पटेल यांच्यातील मतभेद मूलभूत स्वरूपाचे होते. हिंदू-मुस्लीम प्रश्न, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक धोरण या विषयांवर मतभेद होते. ज्या धोरणांबाबत पं. नेहरू आग्रही होते, त्याबाबत साशंकता असूनदेखील पटेलांनी नेहरूंना पाठिंबाच दिला. पण इतर मुद्द्यांबाबत काय? त्याबाबत नेहरूंना आपल्याला हवे तसे धोरण आखता आले नसते. पटेलांनी त्यांना रोखले असते किंवा निदान धीम्या गतीने चालण्यास भाग पाडले असते.......

अर्थखाते महत्त्वाचे असल्यामुळे त्यासाठी योग्य व्यक्ती निवडली पाहिजे. आपली पहिली पसंती देशमुख यांना आहे, असे पटेलांनी स्पष्ट केले (लेखांक दुसरा)

२२ जानेवारी १९५० रोजी महाराज्यपालांचे सचिव आणि ज्येष्ठ आयसीएस अधिकारी शावक्स लाल यांनी सरदार पटेलांना पत्र लिहून शपथविधीची वेळ कळवली. याच पत्रात तुम्ही ईश्वरसाक्ष शपथ घेणार की, प्रतिज्ञापूर्वक शपथ, याची लाल यांनी विचारणा केली. त्यावर आपण प्रतिज्ञापूर्वक शपथ घेऊ, असे पटेलांनी कळवले (पृ. ७५). याच अर्थ एकतर पटेल हे निरिश्वरवादी होते किंवा अशा बाबींशी ईश्वराचा संबंध नाही, अशी त्यांची धारणा असावी.......

सरदार पटेल : अंतिम वर्ष - पाकिस्तानातील अल्पसंख्याकांची स्थिती, त्याचे भारतातील हिंदू-मुस्लीम संबंधांवर होणारे परिणाम आणि काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा वाद (लेखांक पहिला)

पाकिस्तानात मुस्लिमांचा छळ होतो म्हणून आपण मुस्लिमांना छळले पाहिजे, ही धारणा बळावत चालल्याबद्दल त्यांनी खेद व्यक्त केला. सरकारचे धोरण ठाम नसल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे, असे मत त्यांनी नोंदवले. पाकिस्तानने काहीही केले तरी भारतीय नागरिकांचे संरक्षण करण्याची जबाबदारी भारत सरकारचीच आहे, मग ते नागरिक हिंदू असोत किंवा मुस्लीम असोत, अशी भूमिका त्यांनी मांडली. ही जबाबदारी पार पाडण्यात आपण कमी पडत आहोत, असे सांगत.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (उत्तरार्ध)

या खंडात समाविष्ट केलेल्या पत्रव्यवहारावरून स्वातंत्र्याच्या पहिल्या वर्षांमध्ये देशासमोर कोणते प्रश्न होते, हे स्पष्ट होते. त्यांच्या हाताळणीत आणि सोडवणुकीत सरदार पटेलांचे योगदान अर्थातच लक्षणीय असे होते. हे प्रश्न त्यांनी कसे हाताळले यावरुन त्यांच्या कामकाजाच्या पद्धतीचा अंदाज बांधता येतो. तसेच त्यांच्यात आणि पं. नेहरूंमध्ये मतभेद कोणत्या मुद्द्यावर होते, ही बाबदेखील स्पष्ट होते.......

सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होते, मात्र तरीही दोघांना एकमेकांबद्दल आस्था आणि प्रेम होते. महत्त्वाच्या प्रश्नांबाबत पं. नेहरू नेहमीच पटेलांशी सल्लामसलत करत (पूर्वार्ध)

सरदार पटेलांच्या पत्रव्यवहाराच्या नवव्या खंडातील पत्रं १९४९-१९५० या दोन वर्षांतील आहेत. संस्थानांच्या सामिलीकरणाची आणि विलीनीकरणाची प्रक्रिया बहुतांशी पूर्ण झाली असली, तरी संस्थानी प्रदेशांमधील विविध प्रश्न कायम होते. विविध प्रांतांमध्येदेखील अशाच स्वरूपाचे प्रश्न होते. त्या सर्वांची हाताळणी पटेलांना करावी लागली. याच काळात पटेल आणि पं. नेहरूंचे मूलभूत स्वरूपाच्या प्रश्नांबाबत खटकेदेखील उडाले.......

पटेलांची संभाव्य निवृत्ती आणि त्यांचा विमान अपघात, डॉ. राम मनोहर लोहिया यांच्या अटकेमुळे निर्माण झालेला प्रश्न आणि काही राजकीय, प्रशासकीय आणि संस्थानांशी निगडित प्रश्न - भाग ३

आठव्या खंडातील पत्रव्यवहाराकडे पाहिले तर देशासमोर किती विविध प्रकारचे प्रश्न उभे होते, हे लक्षात येते तसेच नव्याने स्वतंत्र झालेल्या भारताला स्थिर करण्याच्या प्रयत्नांच्या संदर्भात सरदार पटेल आणि पं. नेहरू यांच्यात मतभेद होतेच. त्याची चर्चा लेखात आलेली आहे, पण तरी दोघांमध्ये परस्पर स्नेहभावदेखील होता. आज रोजी पटेल-नेहरू मतभेदांची चर्चा करताना या परस्पर स्नेहादाराच्या भावनेची जाण ठेवणे आवश्यक आहे.......

महात्मा गांधी हत्येच्या खटल्याचा निकाल आणि त्याचे पडसाद, महत्त्वाच्या नियुक्त्यांचा प्रश्न, भाषेचा प्रश्न आणि एका आगळा-वेगळा शैक्षणिक प्रश्न - भाग २

बनारस विद्यापीठाचे प्रश्न मात्र कायम होते आणि त्यांची सोडवणूक करण्यासाठी केंद्र सरकारला १९५०च्या दशकात एक आणि १९६०च्या दशकात एक अशा दोन चौकशी समिती नेमाव्या लागल्या होत्या. बनारस हिंदू विद्यापीठाच्या संदर्भातील हा पत्रव्यवहार पाहिला की, देशासमोर इतके महत्त्वाचे प्रश्न उभे राहिलेले असताना तत्कालीन राष्ट्रीय नेतृत्वाला या अशा तुलनेने कमी महत्त्वाच्या प्रश्नावर इतका वेळ आणि ऊर्जा खर्च का करावीशी वाटली असेल.......