‘बॅड ब्लड : सिक्रेट्स अँड लाईज इन अ सिलिकॉन व्हॅली स्टार्टअप’ : अंगावर शहारे आणणारी खळबळजनक रहस्यकथा
ग्रंथनामा - दखलपात्र\इंग्रजी पुस्तक
सतीश बेंडीगिरी
  • ‘बॅड ब्लड : सिक्रेट्स अँड लाईज इन अ सिलिकॉन व्हॅली स्टार्टअप’ या पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि एलिझाबेथ होम्स
  • Thu , 10 March 2022
  • ग्रंथनामा दखलपात्र बॅड ब्लड : सिक्रेट्स अँड लाईज इन अ सिलिकॉन व्हॅली स्टार्टअप Bad Blood : Secrets and Lies in a Silicon Valley Startup एलिझाबेथ होम्स Elizabeth Holmes जॉन कॅरेरो John Carreyrou सिलिकॉन व्हॅली Silicon Valley थेरानोस Theranos

अमेरिकेतील एक महिला उद्योजक. तिच्या कंपनीच्या संचालक मंडळात हेन्री किसिंजर, जॉर्ज शुल्त्झ आणि लष्करात मोठ्या पदावरून निवृत्त झालेले जेम्स मॅटिस, अशा दिग्गज लोकांचा समावेश. तीदेखील बोर्ड ऑफ डायरेक्टर्सचा एक भाग आणि अमेरिकेचे माजी अध्यक्ष क्लिंटन व ओबामा यांची निकटवर्तीय. शिवाय व्हेंचर कॅपिटलिस्ट, मीडिया आणि मासिके, पाक्षिके, वर्तमानपत्रे, व्यापारमंडळे यांची आवडती ‘सिलिकॉन व्हॅली स्टार’. व्यवसाय चांगलाच मूळ धरत आहे, असे भासवून ती तिच्या यशाबद्दल भागीदार, संचालक आणि गुंतवणूकदारांना फसवून बोर्ड ऑफ डायरेक्टर्सच्या काही सभासदांच्या संगनमताने संपत्ती गोळा करते. पण म्हणतात ना, तुम्ही सर्व काळ सर्वांना फसवू शकत नाही.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.................................................................................................................................................................

अखेर ही फसवणूक एक पत्रकार तिच्या कंपनीच्या सर्व खाजगी ई-मेल्सचा हवाला देऊन ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये लेख लिहून उघड करतो. तेव्हा अमेरिकेत, विशेषत: सिलिकॉन व्हॅलीमध्ये मोठीच खळबळ उडते. ही एक अंगावर शहारे आणणारी रहस्यकथा उघड करणारा तो पत्रकार पुढे पुलित्झर या प्रतिष्ठित पुरस्काराने नावाजलाही जातो.

ही खळबळजनक रहस्यकथा ‘वॉल स्ट्रीट जर्नल’साठी काम करणारे ते फ्रेंच-अमेरिकन पत्रकार आहेत - जॉन कॅरेरो. आणि त्यांच्या त्या पुस्तकाचे शीर्षक आहे- ‘बॅड ब्लड : सिक्रेट्स अँड लाईज इन अ सिलिकॉन व्हॅली स्टार्टअप’. २१ मे २०१८ रोजी प्रकाशित झालेल्या या पुस्तकात एलिझाबेथ होम्स या नवोदित उद्योजिकेने केलेल्या चित्तचक्षुचमत्कारिक फसवणुकीची साद्यन्त हकीकत आहे.

..................................................................................................................................................................

उमर खय्याम आणि रॉय किणीकर यांच्यात एक समान धागा आहे. तो म्हणजे अध्यात्माचा, स्पिरिच्युअ‍ॅलिझमचा. खय्याम सूफी तत्त्वज्ञानाकडे वळला. किणीकर ज्ञानेश्वरी, एकनाथी भागवत, गीता, उपनिषदे यांच्यात रमले. खय्याम अधूनमधून अर्थहीनतेकडे वळत राहिला, तसेच किणीकरसुद्धा...

हे पुस्तक २५ टक्के सवलतीत खरेदी करण्यासाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/5357/Ghartyat-Fadfade-Gadad-Nile-Abhal

................................................................................................................................................................

‘हुलू’ या ओटीटी प्लॅटफॉर्मने ‘वॉल स्ट्रीट जर्नल’मध्ये प्रकाशित झालेल्य लेखांवर आधारित ‘द ड्रॉपआऊट’ ही टीव्ही मालिका प्रसारित करायला सुरुवात केली. आमंडा सिगफ्रेड या हॉलिवुडच्या सुप्रसिद्ध अभिनेत्रीने यात एलिझाबेथ होम्सचे पात्र साकारले. आता या पुस्तकावर आधारित हॉलिवुड चित्रपट अ‍ॅडम मॅके दिग्दर्शित करणार आहे आणि सुप्रसिद्ध हॉलिवुड अभिनेत्री जेनिफर लॉरेन्स फसवणूक करणारी एलिझाबेथची भूमिका साकारणार आहे.

एलिझाबेथ होम्सला या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजे ३ जानेवारी २०२२ रोजी फसवणूक केल्याबद्दल दोषी ठरवण्यात आले. तिने ‘थेरानोस’ या नावाने कंपनी स्थापन करून अत्याधुनिक रक्त-चाचणी उपकरण तयार करण्याचे ठरवले. त्यासाठी एका नमुना उपकरणाचे ‘नोव्हार्टीस’ या जगप्रसिद्ध फार्मास्युटिकल कंपनीसाठी स्वित्झर्लंड येथे थेट प्रात्यक्षिकदेखील सादर केले. थेरानोससाठी हा एक अभूतपूर्व क्षण होता.

एलिझाबेथने स्टॅनफोर्ड इथे शिकताना तिथल्या वसतिगृहात असे उपकरण तयार करण्याची कल्पना केली होती. नवीन उपचारांचा शोध घेण्यासाठी फार्मास्युटिकल कंपन्या क्लिनिकल चाचण्यांवर अब्जावधी डॉलर्स खर्च करतात. जर अशा एखाद्या उपकरणाचे उत्पादन करून थेरानोस त्यांच्यासाठी अपरिहार्य बनू शकली आणि त्यांच्या खर्चाचा काही भाग नफा म्हणून कमावला तर, असा विचार एलिझाबेथने केला होता.

स्वित्झर्लंडहून परतल्यावर एलिझाबेथने तिचे चीफ फायनान्सिअल ऑफिसर हेन्री मॉस्लेला गुंतवणूकदारांनी या कंपनीत किती रक्कम गुंतवावी, याचा आर्थिक अडाखा तयार करण्यास सांगितला. मॉस्लेचा पहिला आडाखा तिने नाकारला आणि त्यात अजून वाढ करण्यास सांगितले. नवीन आकडेवारीमुळे तो थोडा अस्वस्थ झाला, परंतु कंपनीने चांगले काम केल्यास एवढी रक्कम उभी करणे सहज शक्य होईल, असे त्याला  वाटले. 

जेव्हा गुंतवणूकदार उपकरण पाहण्यासाठी येत असत, तेव्हा हेन्री त्यांना शौनक रॉय - जो या कंपनीचा सह-संस्थापक होता - याच्याकडे घेऊन जात. रॉय या टोस्टरसारख्या दिसणाऱ्या उपकरणातील बारीक सुईच्या टोकावर आपले बोट टोचायचा आणि नंतर बाहेर आलेले एक दोन थेंब रक्त एखाद्या क्रेडिट कार्डाच्या आकाराएवढ्या पांढऱ्या रंगाच्या प्लास्टिक कुपीवर घ्यायचा. ती कुपी रीडर नावाच्या एका छोट्या पेटीच्या आकाराच्या यंत्रात सारायचा. हे यंत्र त्यानंतर वायरलेस यंत्रणेच्या माध्यमातून रक्तातील घटकांची माहिती मुख्य सर्व्हरला पाठवत असे. तेथे त्याचे विश्लेषण होऊन चाचणीचा निकाल वायरलेस यंत्रणेने परत पाठवला जाई.

..................................................................................................................................................................

अवघ्या २४ तासांत महाराष्ट्रात एक सत्तांतर नाट्य घडलं आणि संपलं... त्याची ही कहाणी सुरस आणि चमत्कारिक... अदभुत आणि रंजक...

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी पहा -

https://www.booksnama.com/book/5312/Checkmate

..................................................................................................................................................................

औषध कंपन्यांना हे यंत्र म्हणजे जादूची कांडी वाटली, कारण यामुळे त्यांच्या चाचण्या करण्याची पद्धत सोपी व कमी खर्चात होणार, असे दिसत होते. चाचण्या होणाऱ्या रुग्णाच्या घरात हे रीडर्स बसवले की, त्यांना बाहेर जायची गरजच नव्हती. दिवसभरात अनेक वेळा रक्त घेण्यात अडचण नव्हती, कारण बोट टोचून रक्ताचा एकच थेंब घेणे पुरणार होते. रुग्णांच्या रक्तातील घटकांची माहिती वायरलेस यंत्रणेने मिळाल्यावर लगेच त्याचे विश्लेषण होऊ शकत होते. रुग्ण घरबसल्या वायरलेसवरून माहिती पाठवू शकत होते.

स्टीव्ह जॉब्सवर असलेल्या भक्तीमुळे एलिझाबेथ या उपकरणाला ‘द आयपॉड ऑफ हेल्थ केअर’ असे म्हणायची. अ‍ॅपल कंपनीमधील अ‍ॅन एरिओला नावाच्या आयफोन प्रॉडक्ट डिझायनरलादेखील तिने आपल्या कंपनीत चीफ डिझाईन आर्किटेक्ट म्हणून नोकरी दिली. 

स्वित्झर्लंडहून परतल्यावर एलिझाबेथ जरी उत्साही दिसत होती, तरी तिचे सहकारी खूश नव्हते. कारण कंपनीतील केवळ काही लोकांनाच या प्रक्रियेत असणाऱ्या त्रुटींची माहिती होती. चाचण्यांचे निकाल नेहमीच बरोबर येत नसत. गुंतवणूकदारांसमोर प्रात्यक्षिक दाखवताना जुन्या चाचण्यांचे निष्कर्ष ताजे निकाल म्हणून सादर केले जात. नोव्हार्टीस समोरही असेच झालेले होते. स्वित्झर्लंडला नेलेले उपकरण दुसऱ्या दिवशी सकाळी नोव्हार्टिसला प्रात्यक्षिक दाखवताना चालले नाही. तेव्हा चूक लपवण्यासाठी तिच्या सहकाऱ्यांनी बनावट निकाल प्रसारित केले.

एलिझाबेथने औषध कंपन्यांबरोबर करार झाले असल्याचे खोटे सांगितले. गुंतवणूकदार पुढे येत राहिल्याने बरीच मोठी गुंतवणूक झाली होती, परंतु कंपनीचा सीएफओ मोस्लेला मात्र ते करार कधीच दाखवले गेले नाहीत. अनेक खोटी कारणे देऊन एलिझाबेथ करार दाखवणे टाळत राहिली. शेवटी मोस्लेने ‘उपकरण नीट चालत नाही आणि जुने निकाल नवीन म्हणून तू दाखवतेस ते मला माहीत आहे’, असे तिला सांगितले, तेव्हा ‘हेन्री, यू आर नॉट अ टीम प्लेयर, यू शुड लिव्ह राईट नॉव’ असे तिने खडसावले... आणि मोस्लेला नारळ दिला.

एलिझाबेथ संभाव्य गुंतवणूकदार आणि फार्मा कंपन्यांची बेमालूमपणे फसवणूक करत राहिली, दीर्घकाळ दिशाभूल करत राहिली. बोर्डाने तिच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्न विचारल्यावर तिने खोटी आणि बनावट कागदपत्रे सादर केली. खोटी विधाने देऊन त्यांच्या डोळ्यांत धूळफेक केली. आपले बिंग फुटू नये म्हणून या उपकरणावर आपले संशोधन चालू आहे, असे दाखवण्यासाठी मॉल्स, हॉस्पिटल्स आणि इतर ठिकाणी आपली उपकरणे बसवून आपण शोधलेल्या तंत्रज्ञानाच्या साहाय्याने लोकांच्या रक्तचाचण्या करून देत असल्याचे भासवायला सुरुवात केली. परंतु जुन्या पद्धतीनेच ती रक्तचाचण्या करत असे आणि लोकांची फसवणूकही.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

डिसेंबर २०१३मध्ये तिने एक ठराव मंजूर करून घेतला, ज्यायोगे तिच्या मालकीच्या प्रत्येक शेअरला १०० मते मिळणार होती. अशा प्रकारे तिला ९९.७ टक्के मतदानाचा अधिकार  मिळाला. त्यामुळे तिच्या उपस्थितीशिवाय कोरम पूर्णच होत नसे. त्यामुळे कंपनीत नेमके काय चालले आहे, याची चौकशी करण्यासाठी बोर्ड ऑफ डायरेक्टर्सना कायदेशीर चौकशी करण्यासाठी वकीलही नेमता येत नव्हता. याचा फायदा घेऊन ज्यांनी ज्यांनी तिला प्रश्न केले, त्या सर्वांची तिने उचलबांगडी केली. त्यानंतर आपले अपयश उघडे पडेल, या भीतीपोटी काढून टाकलेल्या अथवा राजीनामा दिलेल्या लोकांनी कसलीही कागदपत्रे बाहेर नेऊ नयेत म्हणून कर्मचाऱ्यांचे मेल तपासायला सुरुवात केली. त्यांना गुप्ततेचा भंग केल्याबद्दल एफबीआयकडे तपास सोपवण्यात येईल, अशा धमक्या दिल्या.

अखेर तो दिवस उगवला आणि तिचा खेळ संपला. सॅन फ्रान्सिस्को हेज फंडने या कंपनीत सुमारे १०० दशलक्ष डॉलर्स गुंतवले होते. त्यांनी एलिझाबेथ आणि तिच्या कंपनीवर २०१४मध्ये डेलावेअर न्यायालयात खटला दाखल केला आणि तिच्यावर खोटेपणा, चुकीची विधाने आणि गुंतवणूकदारांची फसवणूक, असे आरोप ठेवले. ३ जानेवारी २०२२ रोजी एलिझाबेथवरील आरोप सिद्ध झाले. तिला आता शिक्षा सुनावण्यात येईल.

सिलिकॉन व्हॅलीमध्ये तिचे गुणगान सुरू असताना तिच्याविरोधात जाऊन तिला उघडे पाडण्याचे श्रेय जॉन कॅरेरो याला जाते. ‘अ पर्पजफुल लाईफ’ या पहिल्या प्रकरणापासून लहानपणी कोट्यधीश होण्याचे स्वप्न बाळगणारी एलिझाबेथ, सिनसिनाटी जनरल हॉस्पिटल आणि सिनसिनाटी विद्यापीठाच्या मेडिकल स्कूलचे संस्थापक असणारे तिचे पणजोबा डॉ. ख्रिश्चन होम्स यांच्याबद्दल भरभरून बोलणारी एलिझाबेथ, स्वतःला ‘लेडी स्टीव्ह जॉब्स’ म्हणवून घेण्यात धन्यता मानणारी एलिझाबेथ, अशा सर्व प्रकरणांतून तिची ही सत्यकथा शेवटच्या प्रकरणात तिच्याविरुद्ध सुरू झालेल्या चौकशी पर्यंत येऊन संपते. म्हणूनच पुस्तकाच्या शेवटच्या प्रकरणाचे शीर्षक ‘द एम्प्रेस हॅज नो क्लोथ्स’ असे ठेवले असावे!

..................................................................................................................................................................

लेखक डॉ. सतीश बेंडीगिरी औरंगाबाद येथील मॅनेजमेंट कॉलेजचे निवृत्त संचालक असून हिंदी तसेच पाश्चात्य चित्रपटांचे अभ्यासक आहेत.

bsatish17@gmail.com

.................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

वाचकहो नमस्कार, आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला ‘अक्षरनामा’ची पत्रकारिता आवडत असेल तर तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात आम्ही गांभीर्यानं, जबाबदारीनं आणि प्रामाणिकपणे पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘भैया एक्स्प्रेस आणि इतर कथा’ : बिहारमधून येणाऱ्या गाडीला पंजाबात ‘भैया एक्स्प्रेस’ म्हटलं जातं. पण या एक्स्प्रेसमधून उतरणाऱ्या श्रमिक वर्गाकडे इतर वर्गाचा पाहायचा दृष्टीकोन मात्र तिरस्काराचाच असतो

अरुण प्रकाश यांची 'भैया एक्स्प्रेस' ही कथा नोकरीसाठी स्थलांतर कराव्या लागणाऱ्या गरीब बिहारी समूहाची व्यथाकथा कथन करते. रामदेव हा अठरा वर्षांचा तरुण पंजाबमध्ये मजुरीसाठी गेलेल्या आपल्या भावाला - विशुनदेव - शोधायला निघतो. पंजाबमध्ये दंगली सुरू असतात. कर्फ्यू लागणं सामान्य घटना होऊन जाते. अशा परिस्थितीत रामदेवला पंजाबात जावं लागतं. प्रवासात त्याला भावाविषयीच्या भूतकाळातील घटना आठवत राहतात.......

कित्येक वेळा माणूस एकटेपणाच्या फटकाऱ्यांनी इतका वैतागतो की, आपणच आपले प्रेत आपल्याच खांद्यावर घेऊन चाललेलो आहोत, असे त्याला वाटते

मन मरून गेलेले, प्रेतवत झालेले असते. पण शरीर जिवंत असते म्हणून वाटचाल सुरू असते. इतकेच! मागून आपल्याला छळणारे लोक कोल्ह्या-कुत्र्यासारखे आपल्याला त्रास द्यायला येत असतात. अशा वेळी स्वतःच स्वतःचा हा प्रवास संपवावा असे वाटते. आपण गेलो, तर केवळ आपल्या शरीराला खाणाऱ्या मुंग्यांना आपल्यात रस राहील. आणि त्यांनी खाऊन आपण संपलो, म्हणून फक्त त्यांना आपल्या संपण्याचे वाईट वाटेल. तेच मुंग्यांनी आपल्यासाठी गायलेले शोकगीत!.......

‘एच-पॉप : द सिक्रेटिव्ह वर्ल्ड ऑफ हिंदुत्व पॉप स्टार्स’ – सोयीस्करपणे इतिहासाचा विपर्यास करून अल्पसंख्याकांविषयी द्वेष-तिरस्कार निर्माण करणाऱ्या ‘संघटित प्रचारा’चा सडेतोड पंचनामा

एखाद्या नेत्याच्या जयंती-पुण्यतिथीच्या निमित्तानं रचली जाणारी गाणी किंवा रॅप साँग्स हा प्रकार वेगळा आणि राजकीय क्षेत्रात घेतल्या जाणाऱ्या निर्णयांवर, देशातील ज्वलंत प्रश्नांवर सातत्यानं सोप्या भाषेत गाणी रचणं हे वेगळं. भाजप थेट अशा प्रकारची गाणी बनवत नाही, पण २०१४नंतर जी काही तरुण मंडळी, अशा प्रकारची गाणी बनवतायत त्यांना पाठबळ, प्रोत्साहन आणि प्रसंगी आर्थिक साहाय्य मात्र करते.......