पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार : संपूर्ण आयुष्य संस्कृतच्या प्रसारासाठी वाहून घेतलेले विद्वान, व्यासंगी पंडित
संकीर्ण - श्रद्धांजली
वसंत काळपांडे
  • पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार
  • Sat , 01 May 2021
  • संकीर्ण श्रद्धांजली पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार Pandit Ghulam Dastagir Birajdar संस्कृत Sanskrit

पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांचे २२ एप्रिल २०२१ रोजी वयाच्या ८७व्या वर्षी निधन झाले. त्यांच्यासारख्या संपूर्ण आयुष्य संस्कृतच्या प्रसारासाठी वाहून घेतलेल्या विद्वान, व्यासंगी पंडितांचे हे जग सोडून जाणे विशेषच दुःखदायक आहे.

त्यांची माझी पहिली भेट १९८१मध्ये कोल्हापूरला झाली होती. पोस्टल इंडेक्स नंबरचे जनक दिवंगत श्री. भि. वेलणकर यांनी संस्कृतमध्ये अनुवादित केलेल्या ‘संगीत सौभद्र’ या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने ते आणि श्री. धुं. कवीश्वर तिथे आले होते. नाटक पाहायला केवळ २० प्रेक्षक होते. मराठीतील संगीत नाटकांच्या लोकप्रियतेलाही उतरती कळा लागली असतानाच्या त्या काळात संस्कृतमधली संगीत नाटके प्रदर्शित करण्याचा या तिघांचा उत्साह कौतुकास्पद होता. १९८६पासून माझा त्यांच्याशी संबंध आला. गुलाम दस्तगीर बिराजदार आणि श्री. धुं. कवीश्वर या उत्साही जोडीने स्वतःला आयुष्यभर  संस्कृतप्रसाराच्या कार्यासाठी वाहून घेतले होते.

१९८६मध्ये महाराष्ट्र शासनाने सर्व शाळांना १०० गुणांचा हिंदीचा पेपर अनिवार्य केला होता. त्यामुळे मराठी माध्यमात शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना संस्कृत, पाली, अर्धमागधी अशा अभिजात भाषा शिकण्याची सोय राहिली नव्हती. बिराजदार आणि कवीश्वर या दोघांनी शासनाच्या निर्णयाविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ‘अभ्यासक्रम, विषय योजना, भाषा योजना, परीक्षा पद्धती आणि एकूणच मंडळाच्या नियमावलीत बदल करणे किंवा नवीन नियमांचा अंतर्भाव करणे, याबाबत राज्य मंडळाला निर्देश देण्याचे अधिकार शासनाला आहेत आणि ते शासनाने वापरले’, अशी शासनाने बाजू मांडली होती. परंतु उच्च न्यायालयाने शासनाची बाजू अमान्य केली. शासनाला हे अधिकार असले तरी मंडळाचा सल्ला घेतल्यानंतरच शासनाला हे अधिकार वापरता येतात. मंडळाचा सल्ला शासनाला बंधनकारक नसला, तो योग्य त्या कारणांसह नाकारता येत असला, तरी सल्लाच न घेणे बेकायदेशीर होते. आणीबाणीच्या परिस्थितीत मंडळाचा सल्ला घेतला नाही तरी चालते, परंतु या निर्णयाच्या बाबतीत अशी कोणतीही परिस्थिती नव्हती. उच्च आणि सर्वोच्च न्यायालयांनी महाराष्ट्र शासनाचा निर्णय रद्दबातल ठरवला. आज मराठी माध्यमाच्या विद्यार्थ्यांना आठवीपासून संस्कृत, पाली, अर्धमागधी शिकता येते. याबद्दल गुलाम दस्तगीर बिराजदार आणि श्री. धुं. कवीश्वर यांचे ऋण विसरता येणार नाहीत.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पंडित बिराजदारांनी महाराष्ट्र शासनाचे मानद संस्कृत संघटक म्हणून जबाबदारी सांभाळली होती. पंडित बिराजदारांनी शेवटच्या क्षणापर्यंत संस्कृतच्या प्रसारासाठी केलेले कार्य अजोड, कधीही विसरता येणार नाही, असेच आहे. १९८०च्या दशकात त्यांनी काढलेल्या ‘पप्पू गच्छति शिशुशाला’, ‘मोटारयान’ अशा बालगीतांची ध्वनिफीत मला अजूनही आठवते.

गुलाम दस्तगीर बिराजदार यांच्याशी माझे काही महिन्यांपूर्वी फोनवर बोलणे झाले होते. त्या वेळी त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते. या वयातही त्यांच्या मनात संस्कृतच्या प्रचारासाठी अनेक कल्पना होत्या. त्यांनी कुराणचे संस्कृतमध्ये भाषांतर केले होते. त्याचे प्रकाशन व्हायचे होते. अभ्यासक्रमात इयत्ता सहावीपासून संस्कृतचा एक ऐच्छिक विषय म्हणून समावेश व्हावा, हे त्यांचे अनेक वर्षांपासूनचे स्वप्न अपूर्णच राहिले होते. संस्कृतचे मोठ्या प्रमाणावर मोफत ऑनलाइन प्रशिक्षण आयोजित करण्याचा त्यांचा विचार होता. ही स्वप्ने त्यांच्या काळात पूर्ण होऊ शकली नाहीत. पण मोठी स्वप्ने जगणाऱ्या, सतत क्रियाशील राहणाऱ्या व्यक्तींची काही स्वप्ने अपुरी राहणे, हेच त्यांच्या कार्याची थोरवी दर्शवणारे महत्त्वाचे लक्षण असते. ही अपुरी स्वप्नेच त्यांचे कार्य पुढे नेणाऱ्यांना दिशा दाखवतात.

पंडित गुलाम दस्तगीर बिराजदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

Post Comment

Dilip Chirmuley

Sun , 02 May 2021

I heard of Pandit Birajdar almost 50 years ago in an editorial in Loksatta under the title मुसलीमान्ची संस्कृत मुहब्बत. In the editorial I read about Panditji's Sanskrit scholarship. At the bottom of the editorial there was this verse which was in invitation to his daughter or son's wedding. गमनागमनेचापि त्रासो भवति यद्यपि । सम्मानो वर्धतेस्माकमवश्यमुपस्थातव्यम ।। I still remember this verse for its simplicity and humility. I am very sorry to hear about his death.


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......