‘भावे आणि सुकथनकरांचा सिनेमा’ हे मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध होणारं पुस्तक लवकरात लवकर पूर्ण करणं, हीच सुमित्रामावशीला खरी आदरांजली… 
संकीर्ण - श्रद्धांजली
अक्षय शेलार
  • सुमित्रा भावे (१२ जानेवारी १९४३- १९ एप्रिल २०२१). छायाचित्र सौजन्य - श्रीराम पत्की
  • Tue , 27 April 2021
  • संकीर्ण श्रद्धांजली सुमित्रा भावे Sumitra Bhave सुनील सुकथनकर Sunil Sukthankar

या महिन्यात १५ ते १७ एप्रिल दरम्यान मी काहीसा अस्वस्थ होतो. कारण, सुमित्रामावशी(भावे)ची तब्येत पुन्हा एकदा खालावली होती. गेल्या दोन-तीन महिन्यांमध्ये त्यांची तब्येत खालावण्याची ही दुसरी-तिसरी वेळ असावी. अंतर्ज्ञान म्हणा किंवा काहीही म्हणा, पण या वेळी मी ही बातमी कळण्याच्या काही दिवस आधीपासूनच अस्वस्थ होतो. शेवटी १९ तारखेला काही जवळच्या लोकांच्या फोन कॉल्स आणि मेसेजेसने दिवसाची सुरुवात झाली. सर्वांना जोडणारा समान दुवा एकच होता, तो म्हणजे सुमित्रा भावे यांचे निधन… 

मी सुमित्रामावशीच्या कामाशी बऱ्याच आधीपासून परिचित असलो तरी त्या आणि सुनील सुकथनकर यांच्याशी प्रत्यक्ष संबंध आला, तो काही काळापूर्वी. गेला काही काळ मी ‘भावे आणि सुकथनकरांचा सिनेमा’ या विषयावरील एका संशोधनपर पुस्तकाच्या लेखन आणि निर्मितीच्या प्रक्रियेत गुंतलो आहे. त्यामुळे त्यांचे सहजासहजी उपलब्ध नसलेले सिनेमे त्यांच्याकडून मिळवणे, सर्व चित्रपटांचा आणि त्यामागील निर्मितीप्रक्रियेचा अभ्यास करून त्यावर लिहिणं, सुमित्रामावशी आणि सुकथनकर यांच्या मुलाखतीची तयारी करणं, अशी अनेक कामं गेल्या काही महिन्यांमध्ये सुरू होती. अनेक गोष्टींमध्ये सुकथनकर स्वतः मदत करत होते. आणखी काही मदत लागली तर अवश्य कळव, असंही आवर्जून सांगत होते. पण आजारी असूनही आपल्या संपूर्ण कामावर अशा प्रकारचं पुस्तक निर्माण होत आहे, हे ऐकून सुमित्रामावशीही खूप आनंदी होत असल्याचं मला वेळोवेळी कळवलं जात होतं. 

सुमित्रामावशीच्या कामाविषयी मराठी प्रेक्षक आणि भारतीय प्रेक्षक तितकासा जागरूक नाही, हे मला वेळोवेळी वाटत राहिलं आहे. ‘विविध संस्थांकडून निधी मिळवून फक्त पुरस्कारांसाठी चित्रपट बनवणारे लोक’ असं म्हणून त्यांची केली जाणारी हेटाळणीसुद्धा मी अनेकदा पाहिली आहे. त्यामुळेच मराठी आणि इंग्रजी अशा दोन्ही भाषांमध्ये त्यांच्यावर एक विस्तृत पुस्तक लिहिलं जावं, असं मला बऱ्याच काळापासून वाटत होतं. शेवटी या प्रकल्पाला सुरुवात झाल्यानं मला स्वतःला जितका आनंद होत होता, तितकाच आनंद आणि समाधान सुमित्रामावशी आणि सुकथनकर या दोघांनाही वाटल्यानं काम करण्यास अधिक हुरूप यायचा. 

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

पुस्तकातील काही भाग लिहून झाल्यावर मी तो सुमित्रामावशी आणि सुकथनकर यांना पाठवला. अशातच एके दिवशी सुकथनकर यांच्याशी बोलणं झाल्यावर त्यांनी सुमित्रामावशींनी माझ्या पुस्तकासाठी म्हणून एक मनोगत लिहून दिल्याचं कळवलं. मी ते पुनःपुन्हा वाचलं. त्यातून सुमित्रामावशीची स्वतःच्या कामाचा जागरूकपणे विचार करण्याची प्रवृत्ती दिसून येते. स्वतःला कुठल्या प्रकारचं काम उत्तमरीत्या करता येतं नि कुठल्या कामाकरता इतर लोकांची मदत घ्यायची, हे त्यांना उत्तम प्रकारे समजत होतं. यात ना कमीपणाचा विचार होता, ना अहंकाराचा लवलेश. सिनेमाप्रतीचं प्रेम मात्र जरूर दिसतं… स्वतःच्या सहकाऱ्यांच्या कामाची त्यांना असलेली कदरदेखील त्यात दिसते.

सुमित्रामावशी आणि सुनील सुकथनकर यांचं दिग्दर्शकीय साहचर्य तब्बल १५ चित्रपट, काही मालिका आणि असंख्य लघुपट निर्माण होईतो टिकून राहण्यामागील कारण इथंच तर आहे! त्यामुळे स्वतःच्या कामाकडे इतक्या सजगपणे पाहू शकणारी व्यक्ती जेव्हा माझ्यासारख्या एखाद्या तरुणाच्या प्रकल्पाबाबत उत्सुकता दाखवते, तेव्हा त्यात मी खुश व्हावं, असं बरंच काही असतं. 

भारतात गोष्टींचं डॉक्युमेंटेशन करणं, महत्त्वाच्या कलाकृतींचं जतन करणं, याबाबत अनेकदा अनास्था दिसून येते. अशीच अनास्था महत्त्वाच्या कलाकारांच्या कामाच्या दस्तऐवजीकरण करण्याबाबतही दिसते. सुमित्रामावशी आणि सुनील सुकथनकर यांच्यासारख्या प्रतिभावान दिग्दर्शकद्वयीच्या कामाबाबत एकही मोनोग्राफ किंवा पुस्तक लिहिलं गेलेलं नसणं, याच गोष्टीचं द्योतक आहे. डॉ. आनंद नाडकर्णी लिखित ‘देवराईच्या सावलीत’ हे भावे-सुकथनकरांच्या ‘देवराई’ सिनेमाविषयीचं पुस्तक किंवा एन. मनु चक्रवर्ती या बंगाली चित्रपट समीक्षकानं ‘मुव्हिंग इमेजेस, मल्टिपल रिॲलिटीज’ या पुस्तकासाठी दोघांची घेतलेली दीर्घ मुलाखत, असे काही अपवाद वगळता फारसं काही उपलब्ध नाही. 

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

सध्या मी लिहीत असलेल्या ‘भावे आणि सुकथनकरांचा सिनेमा’ या पुस्तकाच्या माध्यमातून या द्वयीच्या कामाच्या दीर्घ समीक्षेसोबतच त्यांच्या कामाचं दस्तऐवजीकरण होईल, अशीही अपेक्षा आहे. मराठी आणि इंग्रजीमध्ये उपलब्ध होणारं हे पुस्तक लवकरात लवकर पूर्ण करणं, हीच सुमित्रामावशीला दिलेली खरी आदरांजली ठरेल… 

..................................................................................................................................................................

लेखक अक्षय शेलार चित्रपट अभ्यासक आहेत.

shelar.a.b.mrp4765@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......