आजवर कोणीही करोनाच्या थोतांडाविरुद्ध ठामपणे उभा राहिलेला नाहीये. आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे...
पडघम - तंत्रनामा
गामा पैलवान
  • प्रातिनिधिक चित्र
  • Wed , 17 March 2021
  • पडघम तंत्रनामा करोना Corona कोविड-१९ Covid-19 करोना व्हायरस Coronavirus

लोकहो, आजवर कुठल्याही लसीने साथीचे रोग आटोक्यात आलेले नाहीयेत, हे तथ्य डॉ. सुझन हम्फ्रीज (Suzanne Humphries) या मूत्रपिंडतज्ज्ञेने लिहिलेल्या ‘Dissolving Illusions : Disease, Vaccines, and the Forgotten History’ (२०१३) या पुस्तकात सविस्तर वर्णिलेलं आहे. हे पुस्तक वाचल्यावर मला काही प्रश्न पडले...

१. एवढी खतरनाक महामारी?

करोना महामारी इतकी खतरनाक आहे की, तिच्या विषाणूची वारंवार चाचणी करावी लागते म्हणे! नाहीतर कळणार कसं लोकांना की, त्यांना करोना झालाय ते. करोनाचा विषाणू खरोखर अस्तित्वात आहे का?

२. करोनाचा विषाणू अस्तित्वात नाही

जनतेच्या आरोग्याची जबाबदारी असलेल्या अमेरिकेत ‘Centre for Controlling Diseases’ व इंग्लंडमध्ये ‘Public Health England’ या दोन सर्वोच्च संस्था आहेत. या दोन्ही संस्थांकडे करोनाच्या विषाणूचा अस्सल नमुना नाही. संदर्भ :

CDC : https://www.fda.gov/media/134922/download (कृपया पीडीएफ पान क्रमांक ४३ पाहणे वा 'quantified virus' वर ctrl-F करून शोध घेणे )

PHE : https://www.whatdotheyknow.com/request/documents

करोनाचा विषाणू अस्तित्वात नसताना चाचणी नेमकी कसली केली जातेय?

३. PCR चाचणीचं काम

PCR चाचणीत डीएनए रेणूच्या नमुन्याचं अनेक पटीने अभिवर्धन (= amplification) केलं जातं. या अभिवर्धित नमुन्यात ठराविक क्रमबंध (= sequence) शोधला जातो. याचा करोनाच्या विषाणूशी नेमका काय संबंध आहे? यातून करोनाचं अस्तित्व कसं काय सिद्ध होतं? हा विषाणू मानवी डीएनएचा भाग आहे का? तसा तो असल्यास त्याची चाचणी करायची गरजच काय मुळातून?

सदर तंत्र केवळ ठराविक प्रकारचं जनुकीय सामान अस्तित्वात असल्याचं सांगतं. हे सामान कदाचित विषाणू असू शकतं. जरी ते विषाणू असलं तरीही त्या सामानाची मात्रा धोक्याच्या पातळीच्या वर आहे की, खाली ते सदर तंत्र सांगू शकंत नाही. किंबहुना कोणत्याही पूर्णपणे निरोगी माणसाच्या अंगात कसले ना कसले तरी विषाणू सतत असतातच. मग करोनाची खास चाचणी का?

‘रॉयटर’चा हा लेख वाचनीय आहे : Fact check: Inventor of method used to test for COVID-19 didn’t say it can’t be used in virus detection

शेवटचा परिच्छेद अतिशय महत्त्वाचा आहे : “It is important to note that detecting viral material by PCR does not indicate that the virus is fully intact and infectious, i.e. able to cause infection in other people. The isolation of infectious virus from positive individuals requires virus culture methods. These methods can only be conducted in laboratories with specialist containment facilities and are time consuming and complex.”

वरील परिच्छेदात जे virus culture म्हटलंय ते आजवर अस्तित्वात आलेलं नाहीये. मग चाचणी नेमकी कसली होतेय?

४. PCR ने विषाणू शोधताय? काहीही हं....!

जागतिक आरोग्य संस्थेने PCR चाचणी अस्वीकारार्ह असल्याचं म्हटलंय : WHO Finally Admits COVID19 PCR Test Has A ‘Problem’

या कथनानुसार सदर चाचणी रामभरोसे असून तिच्यात प्रचंड प्रमाणावर होकार आगळीक (= false positive) होतात. यामागील कारण म्हणजे ‘विषाणू सापडण्या’साठी अनेक आवर्तने करावी लागतात. प्रत्येक आवर्तनात सामग्री विरळ होत जाते आणि काही आवर्तनांनंतर लक्ष्यसामग्री व गलका (= target virus and background noise) या दोहोंत फारसं अंतर उरत नाही. हे WHOने मान्य केलेलं आहे.

सांगायचा मुद्दा काये की, PCR चाचणीत बघतात तितक्या बारकाईने बाईकडे बघितलं तर तिला पण भरघोस मिश्या दिसतील! आडलंकेच्या पडलंकेच्या घोडलंकेला जाऊन म्हणे करोनाचा विषाणू शोधायचा असतो. PCR चाचणी भंपक नसून तिच्या सहाय्याने करोनाचा विषाणू शोधणे हा तद्दन भंपक प्रकार आहे!

५. करोनाची लस रोगप्रतिबंधक नाही

कॅनडात एके ठिकाणी लस टोचूनही करोनाची लागण झालीच. हे होणारंच होतं. कारण की, करोनाचा विषाणू अस्तित्वात नसल्याने त्याची चाचणी हे थोतांड आहे. साहजिकच लस हेही एक अनुसृत थोतांड बनतं.

संबंधित इंग्रजी लेख : COVID Outbreak Confirmed At Nursing Home Despite Staff, Patients Being Vaccinated

लशीकरणाने कुठलाही रोग आटोक्यात येत नाही, या चिरंतन सत्यावर परत एकदा शिक्कामोर्तब झालं आहे. मग लस हवीच कशाला?

६. मॉडर्नाची लस नेमकी काय आहे?

पेशीतला डीएनए (= DNA) प्रथिनं निर्मितीची आज्ञा देतो ते आरेने (= RNA) मार्फत. कोव्हिडची लस mRNA म्हणजे messenger RNA आहे. ही लस डीएनएने दिलेल्या आज्ञेत फेरफार घडवून आणते. अशा प्रकारे आरेनेचं कार्य भ्रष्ट होतं. सांगायचा मुद्दा काये की, मॉडर्ना अस्थापानाची लस ही एक प्रकारची व्यवहारप्रणाली (= ऑपरेटिंग सिस्टीम) आहे. हे त्या आस्थापनाच्या संकेतस्थळावर स्पष्टपणे लिहिलं आहे. इंग्रजी दुवा : mRNA Platform: Enabling Drug Discovery & Development

ही व्यवहारप्रणाली टोचून घेऊन आपल्या डीएनएची वाट लाववून घ्यायची का?

आणि हो, मायक्रोसॉफ्टचा बिल गेट्स औषधनिर्मितीत एव्हढा का रस घेतोय हे कळलं ना?

७. मुखपट्टी = गुलामीचं फडकं

तोंडाला फडकं बांधल्याने कुठल्याही विषाणूचा फैलाव रोखला जात नाही. फक्त एकाच प्रकारचे एन-९५ जातीचे मुखवटे हा फैलाव रोखू शकतात व ते केवळ शल्यागारात वापरले जातात. करोनाच्या प्रतिबंधासाठी मुखपट्टी लावणे, हे निर्बुद्धतेचं लक्षण आहे. पूर्वी गुलामांच्या तोंडावर सरसकट फडकी बांधली जात. म्हणून सक्तीची मुखपट्टी ही हीन दर्जाची अवहेलना आहे.

गुलामीच्या फडक्याचा आग्रह नेमका कशासाठी?

एक सत्यकथा सांगतो.

मित्राच्या आईची गोष्ट आहे. तिला व तिच्या जोडीदारास करोना आहे म्हणून रुग्णालयात दाखल केलं. दोघेही वयस्कर. दोघांना कुठलीशी लस टोचली. तिच्यामुळे रक्तात गुठळ्या झाल्या व त्यातून हृत्पीडन झालं (= हार्ट अॅटक आला). रक्त पातळ होण्यासाठी गोळ्या दिल्या. त्यामुळे शरीरात इतरत्र रक्तस्राव होऊन तो प्राणघातक ठरला. सुदैवाने जोडीदारास काही झालं नाही. याचा अर्थ हा हकनाक बळीच आहे. कोणी घेतलाय बळी? ओळखा पाहू!

करोनाच्या लशीमुळे रक्ताच्या गुठळ्या होतात याची एक बातमी : डेन्मार्कमध्ये AstraZeneca लसीच्या वापरावर तात्पुरती स्थगिती; रक्ताच्या गुठळ्या निर्माण होण्याच्या तक्रारी

मग लशीची चाचणी कसली केली होती? काय बोध घ्यायचा?

करोनाचा विषाणू = थोतांड

करोनाची चाचणी = थोतांड

करोनाचं फडकं = थोतांड

करोनाची लस = थोतांड

सगळंच थोतांड, मग सत्यांड काय? सत्य फक्त मृत्यू. तो मात्र अगदी खराखुरा आहे बरं का! माझ्या मित्राच्या आईसारखा.

या सगळ्याचा अर्थ काय? उपचारांच्या नावाखाली ड्रग्ज टोचून परावलंबन वाढवणे, हा हेतू सरळ दिसतो आहे.

आज प्रतिपिंड प्रमाणपत्र, आरोग्य पारपत्र वगैरेंची चर्चा चाललीये. उद्या काय येईल? छळछावणी? गुलामी? मृत्यू? तेव्हा सावधान! आजच या थोतांडाचा प्रतिकार करूया. त्यासाठी आपल्याला नैतिक बळ लागेल. हे नैतिक बळ आध्यात्मिक साधनेवर अवलंबून असतं. नामजप ही सर्वांत सोपी आध्यात्मिक साधना आहे. तो करायलाच पाहिजे.

आजवर कोणीही करोनाच्या थोतांडाविरुद्ध ठामपणे उभा राहिलेला नाहीये. आपली लढाई आपल्यालाच लढायची आहे...

..................................................................................................................................................................

गामा पैलवान

gamma.pailvan@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

‘जातवास्तव’ स्वीकारल्याशिवाय सत्ता आणि संसाधनांचा जातीय ‘असमतोल’ दूर करता येणार नाही. उमेदवारांची नावे जातीसकट जाहीर करणे, हा एक ‘सकारात्मक प्रयोग’ आहे

महायुतीच्या ३८ उमेदवारांपैकी १९ मराठा आहेत. विशेष म्हणजे हे सगळे श्रीमंत मराठे आहेत. महाविकास आघाडीच्या ३९ उमेदवारांपैकी २४ मराठा आहेत. वंचित बहुजन आघाडीच्या ३२ उमेदवारांपैकी ५ अनुसूचित जाती, १३ ओबीसी आणि ४ मराठा आहेत. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, मविआ असो वा महायुती एका विशिष्ट समाजाकडेच सत्ताबळ झुकलेले दिसते. मात्र वंबआने उमेदवारी देताना जात समतोल पाळलेला दिसतो.......