धर्म, जात, राजकारण व इतर अनेक कारणांनी दुभंगलेल्या आपल्या समाजात ‘प्रेमाला समजून घ्यायची व प्रेमाने वागायची’ नितांत गरज आहे!
संकीर्ण - ललित
डॉ. वृषाली रामदास राऊत
  • प्रातिनिधिक चित्र
  • Sat , 13 February 2021
  • संकीर्ण ललित व्हॅलेंटाइन डे Valentine's Day १४ फेब्रुवारी 14 February

Darkness cannot drive out darkness; only light can do that. Hate cannot drive out hate; only love can do that. — Martin Luther King Jr

करोनाच्या भीतीच्या छायेत ‘प्रेमाचा उत्सव’ सुरू झालाय. १४ फेब्रुवारी हा प्रेमाचा दिवस. संत व्हॅलेंटाइन या युरोपातील एका प्रेमाचा संदेश देणार्‍या व्यक्तीच्या स्मरणार्थ आपण ज्या व्यक्तीवर (रोमॅंटिक किंवा प्रणयरम्य) प्रेम करतो त्या व्यक्तीला फूल, चॉकलेट अशा वस्तू देऊन प्रेम व्यक्त करण्याची प्रथा युरोपात कित्येक शतकापूर्वी सुरू झाली, ती आता जगभरात लोकप्रिय आहे.

‘हॅरी पॉटर’ या सिनेमात प्रेमाचा काढा पिऊन व्यक्ती खोटी का होईना, जिच्यासाठी काढा तयार केला आहे, तिच्या प्रेमात पडते. अर्थात ती प्रेमाची भावना काही खरी नसते, मात्र Oxytocin नावाचं एक रसायन - ज्याला आपण love potion म्हणू शकतो - आपल्या मेंदूत पाझरतं जेव्हा आपण कोणाच्या तरी प्रेमात पडतो. प्रेमाचा ‘केमिकल लोच्या’ समजून घ्यायला आपल्याला मेंदूतील काही रसायनं किंवा द्रव्यं कशी व का स्त्रवतात, हे समजून घ्यायला हवं.

मानवी भावनेचा इतिहास बघितला तर प्रेम ही भावना नसून एक वर्तन आहे, असा काही शास्त्रज्ञ दावा करतात, कारण आई-वडील आपल्या मुलामुलींवर करतात ते प्रेम किंवा एखादं प्रेमात पडलेलं जोडपं एकमेकांवर करतं ते पण प्रेम असेल, तर फरक काय? प्रेम ही मानवी जीवनातली सगळ्यात महत्त्वाची भावना आहे. ती प्रत्येक नात्यात वेगवेगळ्या प्रकारे व्यक्त होते. प्रेम ही भावना एकटी नसून त्यात लोभ, माया, आकर्षण, लैंगिक सुख, आनंद, असूया, ईर्ष्या, हक्क, काळजी, सुरक्षितता, जबाबदारी, करुणा, दया, सहसंवेदना, त्याग, निष्ठा, संशय, राग व अगदी सूड या भावनासुद्धा येतात. आई आपल्या बाळावर प्रेम करते, पण गरज पडली तर रागवतेसुद्धा. त्यामुळे तिचं बाळावरचं प्रेम कमी होत नाही.

जन्माला आल्यानंतर आईचा स्पर्श मानवाला प्रेमाची पहिली जाणीव करून देतो. त्यामुळे मायेची ऊब कळते. तिथूनच प्रेम ही भावना हळूहळू आपल्याला उमजते. ही ‘स्व’च्या घडण्याची प्रक्रिया जर प्रेम, माया, काळजी व गरज पडेल त्या वेळी योग्य दिशा मिळावी यासाठी रागानं बोलणं जरी असलं तर व्यक्तीत सहसंवेदनेसाठी आवश्यक असलेले mirror neurons हे वयाच्या पहिल्या वर्षापर्यंत बर्‍याच प्रमाणात विकसित होतात.

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - सर्व प्रकारच्या कट्टरतेला नाकारणाऱ्या ‘इन्शाअल्लाह’ या अभिराम भडकमकर यांच्या बहुचर्चित कादंबरीवरील ‘परीक्षण’ स्पर्धा

..................................................................................................................................................................

आई-वडील, मित्र-मैत्रिणी, शेजारी, शिक्षक, जोडीदार, कामाच्या ठिकाणचे सहकारी या सगळ्यांत आपल्याला प्रेमाचे बंध अनुभवायला मिळतात. आई-वडील आणि काळजी घेणारी व्यक्ती यातून निर्माण झालेले प्रेमाचे बंध आपली भावनिक वीण घट्ट करतात. ही वीण आपल्या पुढच्या आयुष्याचा पाया ठरवते.

भारतीय समाजाची मानसिकता जाती-वर्ण व पितृसत्ताक पद्धतीने झाकोळून गेल्याने प्रेमाची भावना दबली गेली आहे. प्रेम अनुभवणं, ते व्यक्त करणं, समोरच्याने व्यक्त केलेलं प्रेम समजून घेऊन प्रतिसाद देणं, या गोष्टी कमीपणाच्या व दुर्बलतेच्या मानल्या जातात.

Dopamine, Serotonin, Oxytocin, Endorphin आणि Norepinephrine ही चेतातंतूच्या टोकाला तयार होणारी पाच प्रकारची रसायनं आपल्या आजूबाजूच्या नात्यातून मिळणार्‍या वेगवेगळ्या गोष्टींची अनुभूती देत असतात. उदा. कुठल्याही प्रकारचं बक्षीस मिळालं की, dopamine स्त्रवतं, तर Serotonin हे मेंदूसाठी पोलिसाचं काम करतं. त्यामुळे उतावळेपण, राग यावर नियंत्रण राहतं, तसंच हे रसायन आध्यात्मिक अनुभवालासुद्धा कारणीभूत असतं. याउलट व्यायाम करताना endorphin स्त्रवल्यानं वेदनेची जाणीव कमी होते.

..................................................................................................................................................................

खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी अशा काळात चांगल्या पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे. ‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

..................................................................................................................................................................

स्पर्श, आवाज, नजर व देहबोली हा मानवी संवादाचा पाया आहे. त्यावरून नाती घट्ट होतात. याउलट नात्यातील असुरक्षितता, भीती, अविश्वास असलेली नाती या ओझं असतात. जवळच्या विश्वासू व्यक्तीकडून आलिंगन व चुंबन यांमुळे आपल्या मेंदूत serotonin व oxytocin स्त्रवतात व भावनिक सुरक्षितता वाटून दोन व्यक्तीमध्ये घट्ट बंध तयार होतो (जोडीदार किंवा मित्र/मैत्रिणीच्या आवाजाने व स्पर्शानेसुद्धा छान वाटतं) म्हणूनच लहान बाळाला आईच्या कुशीत सुरक्षित वाटतं, पण आईच जर वैतागलेली/भीतीत जगत असेल तर ती नकारात्मक भावना बाळाकडे जाते आणि तेही घाबरतं. स्पर्शाची जादू अशी आहे!

काही मानसिक आजारांची औषधं घेतल्यानं या पाचपैकी एक किंवा काही रसायनं स्त्रवतात. त्यातून शांतता, आनंद व भावनिक, तसंच शारीरिक सुरक्षितता अनुभवता येते. गंमत म्हणजे प्रेम, marijuana व चॉकलेट हे खाल्यानं मेंदूतील एकाच प्रकारचे receptors जागृत होतात. आपल्या आवडत्या व्यक्तीला आपण अगदी अंधारातसुद्धा केवळ घ्राणेद्रियांच्या मदतीनं ओळखू शकतो, कारण आवडत्या व्यक्तीचा स्पर्श व शरीराचा विशिष्ट वास हा आपल्या मेंदूत नोंदला गेलेला असतो.

आपल्याला कुणी व्यक्तीने १०० रुपये दिले तर मेंदूत oxytocin नावाचं रसायन स्त्रवतं, मात्र हेच १०० रुपये मशीनने दिले तर मात्र मेंदूत कुठलाही बदल होत नाही.

भावना या कालातीत आहेत की नाहीत, यावर वाद आहेत, कारण अनेक भावना ज्या पूर्वी अस्तित्वात होत्या त्या आता नाहीत व त्यांची तीव्रतासुद्धा बदललीय. त्यामुळे २०२१मधील प्रेम, २००१मधील प्रेम आणि शेक्सपियरच्या काळातील प्रेम यात जमीन-आसमानचा फरक आहे. धर्माचा पगडा व त्या अनुषंगाने येणारी भक्ती ही भावना त्या काळातील प्रेमावर किती स्वार होती, हे त्या-काळातील कला व साहित्य यावरून दिसून येतं.

गुलजार यांनी ‘दिल से’ या चित्रपटासाठी लिहिलेल्या ‘छैयाँ छैयाँ’ या गाण्याची कल्पना सूफी पंथातील बुल्लेह शाह या कवीच्या कवितेवरून प्रेरित आहे. देवाच्या भक्तीत व्यक्ती ‘स्व’ विसरते, तीच तीव्रता प्रेम या भावनेत बघायला मिळते. प्रेम करताना त्याचा परतावा मिळेल की नाही, याची अपेक्षा न ठेवता प्रेम हे भक्तीच्या श्रेणीत येतं. दुसर्‍यात स्वत:ला विसरणं, दुसरी व्यक्ती नुकसान करू शकते, हे जाणूनही असुरक्षितता झेलत प्रेम करत राहणं ही प्रेमाची व्याख्या २०२१मध्ये अजिबात लागू पडत नाही.  

‘टायटॅनिक’ या सिनेमातील रोझ हे मुख्य पात्र जेव्हा Jack Dawson बद्दल तिच्या नातीसमोर सांगतं, त्या वेळेस ती प्रेमात अनुभवाला येणार्‍या अनेक गोष्टींबरोबर सांगताना एक वाक्य सांगते - “But now you know there was a man named Jack Dawson and that he saved me… in every way that a person can be saved.”

प्रेम असंही असू शकतं. हे ‘चकाकतं म्हणजेच प्रेम’ असं समजणार्‍या पिढीला समजणं शक्य नाही.

Robert J Sternberg यांनी स्त्री-पुरुष प्रेमाचा सिद्धान्त मांडताना तीन गोष्टी सांगितल्या आहेत-

- Intimacy

- Passion

- Commitment

त्यांच्या मते प्रेम हे वेगवेगळं रूप धारण करतं, पण या तीन गोष्टी सगळीकडे सारख्याच असतात. पहा - 

http://www.robertjsternberg.com/love

कोणत्याही व्यक्तीत ‘स्व’ हा शारीरिक, मानसिक, बौद्धिक, लैंगिक व आध्यात्मिक असतो. त्यामुळे प्रेमात पडताना केवळ शारीरिक आकर्षणालाच प्रेम म्हणून समजलं तर फक्त जोडप्यातील ‘नर व मादी’ सुखावतात, मात्र इतर गोष्टींची अनुकूलता नसल्याने त्यांच्या प्रेमाचा प्रवास एकतर खडतर असतो किंवा मध्येच थांबतो. रोलो मे या अस्तित्वाच्या मानसशास्त्राचा अभ्यास करणार्‍या अभ्यासकाच्या मतानुसार लैंगिक सबंध हे प्रेमाचं एक महत्त्वाचं रूप आहे, संपूर्ण प्रेम नाही. प्रेम विकसित व्हायला वेळ घेतं, पण लोक प्रेम व लैंगिक सुख यात गल्लत करतात व निराशा ओढवून घेतात.

सध्याच्या सोशल मीडिया कंपन्या अमेरिकन संस्कृती सगळ्या जगावर लादण्याचं काम करतात. त्यात sexual desirability किंवा लैंगिक स्पृहणीयता म्हणजे पडद्यावर सतत आकर्षित व तरुण दिसण्याचा अट्टाहास महत्त्वाची ठरते. त्यातून विचित्र प्रकार घडताना दिसतात. सध्याच्या मार्केटिंगच्या जगात प्रेम ‘भक्ती’ या भावनेपासून दूर जाऊन ‘मालकी हक्क’ या नवीन रूपात आलं आहे.

नकार न पचवता येणारी पिढी पुढे जाऊन हिंसा व विकृत मार्गावर प्रेमाला नेते. ‘डर’ या सिनेमातील शाहरुख खानचं पात्र हे अशा प्रेमाचं एक रूप होतं. ‘प्यार जब हद से गुजार जाए तो पूजा बन जाता है... और पूजा बहके जाए तो जुनून’ हे ‘डर’ सिनेमातील वाक्य अशा वाट चुकलेल्या प्रेमाचं यथार्थ वर्णन करतं.

सध्याच्या काळात वाढलेल्या व्यसनांमागचं कारण आपल्या दुभंगलेल्या नात्यात आहे. खडतर बालपण, आई-वडलांकडून, इतर कुटुंबियांकडून, शिक्षकांकडून, सोबत्यांकडून, अनोळखी लोकांकडून आलेले चुकीचे अनुभव ज्यांनी सोसलेले असतात, त्यांच्यात झिडकारलं जाणं, पुरेसं प्रेम व काळजी न मिळणं, अशा गोष्टी भावनिक पोकळी तयार करतात. ती भरायला व्यसनं सुरू होतात.

Dr Bruce K. Alexander यांनी १९७०च्या दशकात ‘Rat park’ नावानं एक प्रयोग केला होता. यात उंदरासाठी दोन पार्क तयार करण्यात आले. एका पार्कमध्ये खाद्य, खेळणी व सहवासासाठी दुसरे उंदीर, तर दुसर्‍या पार्कमध्ये उंदरांना अलगीकरणात ठेवण्यात आलं. दोन्ही पार्कमध्ये साधं व कोकेन/हेरॉईनचं पाणी ठेवलं होतं. जे उंदीर एकटे होते, त्यांना कोकेनची सवय लागली, काही मेले, तर दुसर्‍या पार्कमध्ये उंदीर जास्त आनंदी आढळले व व्यसनाधीन झाले नाहीत.

अब्राहम मास्लो या मानवतावादी मानसशास्त्रज्ञाच्या मते प्रेम व प्रेमाचे बंध ही माणसाची मूलभूत गरज आहे. ती अपूर्ण राहिल्यानं मानवी विकासात अडथळा येतो.

भारतातील काही मोजकं शहर सोडली, तर ग्रामीण व निमशहरी भागात जात व धर्म व्यवस्था इतकी मजबूत आहे की, प्रेम हा गुन्हाच आहे. शिक्षण, पैसा असूनही लोक जुनाट रूढी, पुरुषी अहंकाराला अनुसरतात, त्यातून अंहकार, गर्व, माज व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सत्ता, वर्चस्व व शक्तीची पूजा होते. त्यात प्रेमाला जागाच नसते. लग्न हा व्यवहार व मुलं जन्माला घालणं म्हणजे वंश चालवणं एवढंच अपेक्षित असतं.

अशा लोकांचे प्रेमाचा ओलावा नसणारे शरीरसंबंधसुद्धा एक शारीरिक क्रिया असते. त्यात आनंदापेक्षा भीती व घृणा या भावना अधिक असतात. मन व शरीर आनंदी नसेल तर त्याचे परिणाम कामाच्या ठिकाणीही दिसून येतात.

..................................................................................................................................................................

'अक्षरनामा' आता 'टेलिग्राम'वर. लेखांच्या अपडेटससाठी चॅनेल सबस्क्राईब करा...

..................................................................................................................................................................

शारीरिक, सामाजिक, आर्थिक गरजेतून केलेल्या लग्नातून प्रेमाची उब मिळणं कठीणच आहे. मा‍झ्या माहितीतील काही मेरिटमध्ये आलेल्या मुलांनी पुढे मेरिटमध्ये आलेल्या मुलींशी लग्नं केली, पण काही वर्षांनी त्यांचा घटस्फोट झाला. डॉक्टरचं डॉक्टरशीच कशावरून पटेल, हा विचार लोक लग्नाआधी करत नाहीत. सगळ्याच नात्यांप्रमाणे लग्नही सतत आनंदी राहू शकत नाही. त्यामुळे अत्यंत बिनसलेल्या नात्यात, लग्नात राहणं जीवघेणं असतं. अशी दुभंगलेली नाती कामावर व तब्येतीवर परिणाम करतात. नात्यात आणि नात्यांमुळे वाढलेली हिंसा ही एक नवीन डोकेदुखी आहे. 

हे बघा  - https://www.scientificamerican.com/article/for-couples-success-at-work-is-affected-by-partner-s-personality/

प्रेम हे dating app वर सापडतं, या भ्रमात असलेल्या पिढीच्या Splitvilla, Roadies या आवडत्या कार्यक्रमांवरून त्यांच्या प्रेम करण्याच्या क्षमतेचा अंदाज येतो. भारतात शारीरिक संबंधांबद्दलचं अज्ञान हे धार्मिक रीती व अंधश्रद्धांमुळे आहे. स्वत:च्या व भिन्नलिंगीय व्यक्तीच्या शारीरिक व मानसिकतेची माहिती असणं, हे मानवी नात्यांसाठी सगळ्यात महत्त्वाचं आहे. स्त्री व पुरुष या दोघांनाही सारख्याच मानसिक व शारीरिक गरजा असून त्या पूर्ण न झाल्याने स्त्रियांमध्ये त्याचे चुकीचे परिणाम psychosomatic disorderमधून व्यक्त होतात. आता तर इंटरनेटमुळे ही समस्या आणखीनच वाढली आहे. पालकांशी बोलू शकत नसल्याने, पण ऑनलाइन चुकीच्या गोष्टी बघून मुलं-मुली विचित्र गोष्टींत अडकतात. त्यामुळे शरीर व मन माहीत असणं गरजेचं आहे.

धर्म, जात, राजकारण व इतर अनेक कारणांनी दुभंगलेल्या आपल्या समाजात ‘प्रेमाला समजून घ्यायची व प्रेमाने वागायची’ नितांत गरज आहे!

..................................................................................................................................................................

लेखिका डॉ. वृषाली रामदास राऊत विश्वकर्मा विद्यापीठाच्या मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापक आहेत.

vrushali31@gmail.com

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण पंधरावे - ‘देश धोक्यात आहे’, असे हिंदुत्ववादी आणि लिबरल दोघांनाही वाटत होते. हिंदुत्ववाद्यांना वाटत होते, मुसलमानांकडून धोका आहे; लिबरल्सना वाटत होते, फॅसिस्ट शक्तींकडून...

२०१४पासून धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह अनेक मतदारांना पडला, हे नाकारता येणार नाही. हे घडून आले, याचे कारण भारताला गांधीजींच्या धर्मभावनेवर आधारलेल्या राजकारणाच्या विचारांचा विसर पडला होता, हे असेल का, असा विचार अनेकांच्या मनात तरळून जाऊ लागला. ‘लिबरल विचारवंत’ स्वतःशी म्हणत होते की, भारतीय जनतेला पडलेला धर्मावर आधारलेल्या जहाल राजकारणाचा मोह हे फक्त इतिहासाचे एक छोटेसे आवर्तन आहे.......

बंद करा ‘निर्भय बनो!, या राष्ट्राची ‘भयमुक्ती’च्या दिशेनं इतकी वेगानं वाटचाल चालू असताना, तुम्ही पण ‘निर्भय’ व्हा की! ‘राष्ट्रीय प्रवाहा’त सामील व्हा! बंद करा, तुमचं ते ‘निर्भय बनो’!

पोलीस शांत बसणार किंवा मदत करणार, याची खात्री असेल तरच ‘निर्भय’ता येणारच ना? निःशस्त्र सामान्य माणसं-मुलं मारणं, शत्रूच्या स्त्रियांवर बलात्कार करणं, हे शौर्यच आहे. म्हणजे ‘निर्दय बनो!’ हाच आजचा मंत्र आहे. एकच पक्ष, एकच नेता, त्याचा एकच उद्योगपती, एकच कायदा, एकच देव एकच भाषा, असं सगळं ‘एकी’करण झालं की, ते पूर्ण ‘निर्भय’ होतील. एकदा ते पूर्ण ‘निर्भय’ झाले की, जग ‘भयमुक्त’ झालंच समजा .......

बाबा आढाव : “भारतीय संविधानाची मोडतोड सुरू झाली आहे. त्यामुळे आता ‘संविधान बचावा’ची चळवळ सुरू झाली पाहिजे. डॉ. बाबासाहेबांनी तयार केलेल्या राज्यघटनेचं संरक्षण हा ‘राजकीय अजेंडा’ झाला पाहिजे.”

पंतप्रधानांच्या विरोधात बोलणं हा ‘देशद्रोह’ समजला जाऊ लागला आहे. या परिस्थितीतून पुढं काय निर्माण होईल, याचं विश्लेषण करत हात बांधून चूप बसण्याची ही वेळ नाही. चर्चा करण्याऐवजी काय निर्माण व्हायला हवं, यासाठी संघर्ष करण्याची वेळ आली आहे. यात जेवढे लोक पुढे येतील, त्यांना बरोबर घेऊन थेट संघर्ष सुरू करायला. हवा. प्रसंगी आपल्याला प्रस्थापित विचारवंत ‘वेडे’ म्हणतील, पण संघर्ष सुरू करायला हवा. गप्प बसण्याची ही वेळ नाही.......