इब्राहिम अल्काझी यांच्याविषयी निस्सिम इझिकेल यांनी लिहिलेली कविता
संकीर्ण - श्रद्धांजली
निस्सिम इझिकेल
  • इब्राहिम अल्काझी यांचं सेल्फ पोर्ट्रेट (१८ ऑक्टोबर १९२५ - ४ ऑगस्ट २०२०)
  • Thu , 06 August 2020
  • संकीर्ण श्रद्धांजली इब्राहिम अल्काझी Ebrahim Alkazi निस्सिम इझिकेल Nissim Ezekiel

आधुनिक भारतीय रंगभूमीचे जनक’, केंद्रीय नाट्य विद्यालयाचे दुसरे संचालक इब्राहिम अल्काझी यांचं परवा दिल्लीत वयाच्या ९५व्या वर्षी निधन झालं.  अल्काझी १९६२ ते ७७ अशी सलग १५ वर्षं केंद्रीय नाट्य विद्यालये संचालक होते. अल्काझी १९४८ ते ५१ या काळात लंडनमध्यील ‘रॉयल अ‍ॅकडमी ऑफ आर्टस’मध्ये शिकत असताना इंग्रजीत नंतर ख्यातनाम कवी झालेले निस्सिम इझिकेल हे त्यांचे सहकारी होते. त्यांनी ‘The Exact Name’ (१९६५) या कवितासंग्रहामध्ये अल्काझींविषयी एक कविता लिहिली आहे. इझिकेल यांच्या निवडक कवितांचा मराठी अनुवाद साहित्य अकादमीनं ‘आधुनिक स्तोत्रं’ (१९९४) या नावाने प्रकाशित केला आहे. प्रदीप गोपाळ देशपांडे यांनी हा संग्रह मराठीमध्ये अनुवादित केला आहे. त्यातील ही एक कविता...

..................................................................................................................................................................

आर्ट लेक्चर ईब्राहिम अल्काझीसाठी

 

तो करतो सुरुवात तारखांनी अन शेवट स्तुतीनं,

करतो वर्णन एखाद्या तरल प्रसंगाचं, वेधतो लक्ष

एखाद्या तात्पर्याकडं, किंवा हुशारीनं बोलतो

कुठल्या तरी ऐतिहासिक, औपचारिक संकेतकोशावर.

 

दिवे विझतात. पडद्यावर

त्या उत्कृष्ट कलाकृती पसरतात दूरवर.

कुठल्या नग्नावस्थेतल्या स्त्रिया दिसतात!

कुठले देवदूत कपडे परिधान केलेले

 

चालतात किंवा तरंगतात कुठल्या गूढ डोंगरांवर किंवा आभाळांवर!

तो सांगतो आम्हाला की रेषा थरथरतात,

रंग खटकतात नाहीतर जुळून येतात –

आमच्या शिक्षणाला खूपच उशीर झालाय.

 

इथली ही बोधकथा बायबलमध्ये आहे.

ती आख्यायिका ग्रीक साहित्यातली आहे.

आम्ही ऐकतो, ताणतो आमचे डोळे बघण्यासाठी,

ग्रहण करण्यासाठी ती प्राचीन नटवी भाषा.

 

शेवटची प्रतिमा चांगली समजावून झाल्यानंतर

सरकते झर्रकन. आम्ही टाळ्या वाजवतो अन निघून जातो.

डोळ्याच्या अशिक्षित सवयींना मिळते इथं

एक उसंत छोटीशी

..................................................................................................................................................................

अधिक माहितीसाठी पहा - https://bit.ly/2De0Sya

..................................................................................................................................................................

‘अक्षरनामा’वर प्रकाशित होणाऱ्या लेखातील विचार, प्रतिपादन, भाष्य, टीका याच्याशी संपादक व प्रकाशक सहमत असतातच असे नाही. पण आम्ही राज्यघटनेने दिलेले अभिव्यक्तीस्वातंत्र्य मानतो. त्यामुळे वेगवेगळ्या विचारांना ‘अक्षरनामा’वर स्थान दिले जाते. फक्त त्यात द्वेष, बदनामी, सत्याशी अपलाप आणि हिंसाचाराला उत्तेजन नाही ना, हे पाहिले जाते. भारतीय राज्यघटनेशी आमची बांधीलकी आहे. 

..................................................................................................................................................................

नमस्कार, करोनाने सर्वांपुढील प्रश्न बिकट केले आहेत. त्यात आमच्यासारख्या पर्यायी वा समांतर प्रसारमाध्यमांसमोरील प्रश्न अजूनच बिकट झाले आहेत. अशाही परिस्थितीत आम्ही आमच्या परीने शक्य तितकं चांगलं काम करण्याचा प्रयत्न करतो आहोतच. पण साधनं आणि मनुष्यबळ दोन्हींची दिवसेंदिवस मर्यादा पडत असल्याने अनेक महत्त्वाचे विषय सुटत चालले आहेत. त्यामुळे आमची तगमग होतेय. तुम्हालाही ‘अक्षरनामा’ आता पूर्वीसारखा राहिलेला नाही, असं वाटू लागलेलं असणार. यावर मात करण्याचा आमचा प्रयत्न आहे. त्यासाठी आम्हाला तुमची मदत हवी आहे. तुम्हाला शक्य असल्यास, ‘अक्षरनामा’ची आजवरची पत्रकारिता आवडत असल्यास आणि आम्ही यापेक्षा चांगली पत्रकारिता करू शकतो, यावर विश्वास असल्यास तुम्ही आम्हाला बळ देऊ शकता, आमचे हात बळकट करू शकता. खोटी माहिती, अफवा, अफरातफर, गोंधळ-गडबड, हिंसाचार, द्वेष, बदनामी या काळात आम्ही गांभीर्याने पत्रकारिता करण्याचा प्रयत्न करत आहोत. अशा पत्रकारितेला बळ देण्याचं आणि तिच्यामागे पाठबळ उभं करण्याचं काम आपलं आहे.

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......