‘भारतात पुन्हा मोदी सरकारच येणार!’... चीनची भविष्यवाणी!
पडघम - देशकारण
सुधीर अग्रवाल
  • पंतप्रधान नरेंद्र मोदी, चीनचे ‘ग्लोबल टाइम्स’ हे वर्तमानपत्र आणि आणि त्यातील लेख
  • Thu , 02 May 2019
  • पडघम देशकारण क्षी जिनपिंग Xi Jinping नरेंद्र मोदी Narendra Modi ग्लोबल टाइम्स Global Times

चीनमधील कम्युनिस्ट नेत्यांनी स्पष्ट केले आहे की, भारतातील लोकसभा निवडणुकीनंतर नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत. चीनचे परराष्ट्रमंत्री वांग यी यांनी ही घोषणा केली आहे. त्यांचे सरकार राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग व मोदी यांच्यातील अनौपचारिक बैठकीची तयारी करत आहे. मागील वर्षी चीनच्या वुहान शहरात ही बैठक झाली होती. त्याच धर्तीवर पुन्हा बैठक आयोजित केली जात आहे. या वर्षी ही बैठक भारताच्या एखाद्या शहरात होऊ शकते.

परराष्ट्र धोरणात निवडणूक निकालापूर्वी अशी तयारी करणे धोकादायक समजले जाते. कारण निवडणुकीनंतर विरोधी पक्षाचेही सरकार सत्तेत येऊ शकते. मात्र तरीही चीन हे पाऊल उचलत आहे. कारण चीनला मोदी यांचे सरकार सत्तेवर येईल, याची पूर्ण खात्री वाटत आहे. वांग यांनी निवडणुकीदरम्यान बैठकीची घोषणा करून स्पष्ट केले की, मोदी यांनाच सत्ता स्थापनेची पुन्हा संधी मिळणार आहे.

भारताचे पंतप्रधान मोदी व चीनचे राष्ट्राध्यक्ष क्षी जिनपिंग यांच्यात वुहानमध्ये झालेली बैठक यशस्वी झाली होती. दोन्ही नेत्यांनी आपसातला विश्वास कायम ठेवत भारत-चीन यांचे संबंध अधिक दृढ करण्याचा विश्वास व्यक्त केला. वांग म्हणतात, वुहान बैठकीनंतर आम्ही सर्वच क्षेत्रांत सहकार्य करणार आहोत.

चीनचे अधिकारी व थिंक टँककडून मोदी यांनाच प्राथमिकता दिली जात आहे. चिनी सरकारचे समर्थक असलेले वृत्तपत्र ‘ग्लोबल टाइम्स’मध्ये शिन्हुआ विद्यापीठातील संशोधक फेलो लू यांग यांनी एक लेख लिहिला आहे. त्यात मोदी यांचे पुनरागमन होणार असल्याचे म्हटले आहे. नरेंद्र मोदींचा भारतीय जनता पक्ष हा संसदेत सर्वांत मोठा पक्ष बनेल, यात कोणतीही शंका नसल्याचे लू यांग यांनी म्हटले आहे. मोदींची राजकीय उंची इतर उमेदवारांना पिछाडीवर नेत असून, भाजपची आर्थिक व संघटनशक्ती विरोधी पक्षांपेक्षा किती तरी जास्त आहे. त्यामुळे मोदींना पुन्हा एकदा संधी मिळेल, असा निष्कर्ष लू यांग यांनी काढला आहे.

कम्युनिस्ट चीन हा सामान्यपणे अशा नेत्यांचे समर्थन करतो, जे एखादा मुद्दा दीर्घकाळ रखडवण्याऐवजी त्यावर तत्काळ निर्णय घेऊ शकतात. कारण लोकशाही व स्वतंत्र न्यायव्यवस्था असलेल्या देशांत नेहमीच असे होत असते. चीनचीही भारतात एक मजबूत नेता असावा, अशी इच्छा आहे. कारण चिनी गुंतवणूकदार हे भारतीय बाजारपेठेकडे विकासाचा एक मुख्य स्त्रोत म्हणून बघतात. कारण भारतात मोबाइल फोनच्या ६० टक्के बाजारपेठेवर चिनी ब्रँड‌्सचा ताबा आहे. दिल्लीत विदेशी गुंतवणुकीबाबतच्या प्रस्तावांवर तत्काळ निर्णय घेऊ न शकणारे कमकुवत आघाडी सरकार नसावे, असेही चीनला वाटतेय.

.............................................................................................................................................

या पुस्तकाच्या ऑनलाईन खरेदीसाठी क्लिक करा -

https://www.booksnama.com/book/4810/Shivputra-Chhatrapti-Rajaram

.............................................................................................................................................

अमेरिकेप्रमाणे चीनमध्येही राजकीय पक्षांसाठी निधी जमवण्याकरता भारतीय समुदायाच्या डिनर मीटिंग होत नाहीत; परंतु तेथे राहणारे भारतीय व्हॉसट‌्अॅप व वीचॅटसारख्या चिनी अॅपच्या माध्यमातून गांभीर्याने चर्चा करत आहेत. या लोकांमध्ये इतर कोणत्याही नेत्याच्या तुलनेत मोदी चाहत्यांची संख्या जास्त आहे. कारण त्यात व्यापाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक आहे.

दक्षिण चीनमधील एका कारखान्याचे मालक असलेले राजेश पुरोहित सांगतात की, मोदींचे आंतरराष्ट्रीय दौरे व त्यांच्या प्रभावामुळे चीनच्या नागरिकांत भारतीयांचे स्थान उंचावले आहे. यासोबतच भारतीय पासपोर्टचा सन्मानही वाढला आहे. २०१४ पूर्वी चीनमध्ये भारतीयांकडे सन्मानाने पाहिले जात नव्हते; परंतु मोदी पंतप्रधान बनल्यानंतर सन्मानाने पाहिले जाऊ लागले. हा सन्मान भारतीयांना सामाजिक व व्यापारी अशा दोन्ही पातळ्यांवर मिळणे गरजेचे आहे.

तथापि मोदींच्या सत्ताकाळात डोकलामसह अनेक विषयांवर भारत व चीनदरम्यान पूर्वीच्या तुलनेत अधिक वाद झाले. याशिवाय मोदींचे चीनच्या ‘वन बेल्ट-वन रोड’ प्रकल्पापासून दूर राहणे व मसूद अझहरला ‘जागतिक दहशतवादी’ म्हणून घोषित करण्यात चीनने अडथळे निर्माण करणे, हेदेखील काही वादाचे मुद्दे आहेत.

आश्चर्याची बाब म्हणजे, हे वाद असूनही चीनमध्ये भारताचा मान वाढला आहे. कारण चीन हा ताकद व त्याच्यासमोर सक्षमपणे उभे राहणाऱ्या कोणत्याही देशाच्या क्षमतेचा सन्मान करतो. आणि भारत याबाबत आतापर्यंत तरी चीनच्या नजरेत अव्वलस्थानी आहे.

.............................................................................................................................................

लेखक सुधीर अग्रवाल प्राध्यापक आहेत.

drsudhiragrawal239@gmail.com

.............................................................................................................................................

Copyright www.aksharnama.com 2017. सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

.............................................................................................................................................

‘अक्षरनामा’ला आर्थिक मदत करण्यासाठी क्लिक करा -

.............................................................................................................................................

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

प्रिय नरेंद्रभाई, तुम्ही जणू यादवी युद्ध लढत असल्यासारखे देश चालवत आहात! हे तुम्हाला शोभत नाही. तुम्ही भले कितीही लोकप्रिय असाल, पण तुम्ही संसदेला उत्तरदायी आहात

नेहरूंचे सगळे विरोधकही त्यांचा आदर करायचे. तुमच्या बाबतीतही पहिल्या दिवसापासून विरोधकांमध्ये चर्चा आहे. फक्त एवढाच ‘किरकोळ’ फरक आहे की, मोदी-चर्चेत ‘आदरा’ऐवजी ‘अविश्वास’ आणि ‘अनादर’ भरलेला असतो! नेहरूंवर जनता प्रेम करत होती, पण त्यांच्या पक्षातले राजकारणी त्यांना घाबरत असत. या बाबतीतही तुम्ही त्यांना मागे टाकलं आहे; तुमच्या पक्षातले लोक आणि जनता — दोघंही तुम्हाला घाबरतात!.......

दादा, विद्यापीठांनी काय केले हा प्रश्न योग्य आहे; पण विद्यापीठांना काम करण्यासाठी आवश्यक असलेले वातावरण निर्माण करण्यात सरकार कितपत यशस्वी झाले, याचाही हिशेब कधीतरी मांडावा लागेल

इतिहास विद्यापीठांना त्यांच्या संशोधनासाठी लक्षात ठेवेल; पण सरकारांना त्यांच्या प्राधान्यक्रमांसाठी. विद्यापीठांच्या कामगिरीचे मूल्यमापन होईलच; परंतु त्या कामगिरीसाठी आवश्यक असलेली जमीन तयार करण्याची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांच्याही भूमिकेचे मूल्यमापन तितक्याच कठोरपणे होईल. आत्मपरीक्षणाची सुरुवात तिथून झाली, तर कदाचित महाराष्ट्रातील उच्च शिक्षणाच्या नव्या पर्वाचीही सुरुवात तिथूनच होईल.......