टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • मोदी, मुकेश अंबानी आणि डोनाल्ड ट्रम्प
  • Sat , 03 December 2016
  • विनोदनामा टपल्या नरेंद्र मोदी Narendra Moi मोबाईल बँकिंग Mobile Banking रिलायन्स जिओे Reliance Jio डोनाल्ड ट्रम्प Donald Trump

१. आपण सर्व मोबाईल बँकिंग आणि मोबाईल वॉलेट्सच्या युगात आहोत. जेवण मागवणं, फर्निचर विकत घेणं, टॅक्सी मागवणे या सर्वच गोष्टी मोबाईलच्या माध्यमातून केल्या जाऊ शकतात. तंत्रज्ञानामुळे सर्व काही सुखकर आणि वेगवान झालं आहे. : 'लिंक्ड इन'साठी लिहिलेल्या लेखात पंतप्रधान नरेंद्र मोदी.

जिथं पिण्याचं पाणीही आयाबायांना अनेक मैलांवरून डोक्यावरून वाहून आणावं लागतं आणि लाइटही दिवसातून १२-१५ तास गायब असते, अशा आमच्या दुर्गम खेड्यांतल्या आणि आदिवासी पाड्यांतल्या बांधवांना इंग्रजी वाचता येत नाही, हे केवढं मोठं भाग्य! नाहीतर त्यांनी पंतप्रधान मोदी ज्या देशात राहतात, त्याच देशात ‘घेऊन चला’ राहायला, असा हट्ट धरला असता आणि पंचाईत झाली असती!

…………………………..

२. सरकारी कर्मचाऱ्यांचं नोव्हेंबर महिन्याचं वेतन आणि सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचं निवृत्तीवेतन रोखीनं देण्याची मागणी राज्य सरकारने मान्य केली नाहीच; उलट बँकांमध्ये गर्दी करू नका, गरज असेल तेव्हा आणि आवश्यकता असेल तेवढेच पगारातील पैसे काढा, असा सल्लाही राज्य सरकारने या कर्मचाऱ्यांना दिला आहे.

सरकारचाही दोष नाही. मुळात एखाद्या कर्मचाऱ्याला तसाच काही अडीअडचणीचा प्रसंग असल्याखेरीज पगाराचे पैसे काढायलाच का लागावेत, असा मूलभूत प्रश्न त्यांना पडलेला असू शकतो ना!

…………………………..

३. पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) रिलायन्स जिओच्या जाहिरातींमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे फोटो वापरण्याची परवानगी दिली नव्हती. मात्र, फोटो वापरला जाणार आहे, याची सरकारला कल्पना होती.

अंबानी काय, अडाणी काय, सरकार काय, सगळे एकच! भारत सगळा एक आहे, सगळेच आपले बांधव आहेत. वाटीतलं ताटात आणि ताटातलं वाटीत होतंच की! त्याचा कोणी हिशोब करतं का?

…………………………..

४. मोदी हे आमचेही पंतप्रधान आहेत. त्यांनी डिजिटल इंडियाचं स्वप्न पाहिलं आहे आणि मीही त्यामुळे प्रेरित झालो आहे. आम्ही या भारतीय नेत्याचं स्वप्न, भारत आणि भारतीयांना आमची सेवा समर्पित करत आहोत आणि त्यामुळेच जिओच्या जाहिरातीत मोदींचा फोटो वापरण्यात काहीही राजकीय नाही : मुकेश अंबानी.

मोदी हे 'आमचेही' पंतप्रधान आहेत, हे वाक्य मनोज्ञ आहे… त्यापुढचं 'एकट्या अडाणींचे नाहीयेत काही' हे अनुच्चारित वाक्यही कसं स्पष्टपणे ऐकू येतं की नाही? बाकी अंबानी देशाची सेवा करतात, म्हटल्यावर देशात २७ मजली (अंबानींच्या अँटिलियाच्या उंचीइतकं) हास्यस्फोट झाला म्हणे!

…………………………..

५. पाकिस्तान हा विस्मयकारक देश आहे. इथली जनता सुज्ञ आणि हुशार आहे. पंतप्रधान नवाझ शरीफ यांचा चांगला नावलौकिक आहे, त्यांनी उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पाकिस्तानच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करणार : डोनाल्ड ट्रम्प.

तात्यांच्या विजयानिमित्त सत्यनारायण घालणारे आणि यज्ञयाग करणारे आता समोर आले की, फुटपाथ बदलतात… मुंगसानं कितीही आकर्षक डिस्को डान्स करून दाखवला, तरी गारुडी सापालाच दूध पाजतो.

editor@aksharnama.com

Post Comment

Nilesh Sindamkar

Sat , 03 December 2016

रोजच्या रोज इतकं तिरकस, उपरोधिक, धमाल विनोदी लेखन करणं खरंच खुप अवघड गोष्ट आहे... या स्तंभ लेखकाचं खुप खुप कौतुक आणि आभार... !!


अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

शिरोजीची बखर : प्रकरण २९ – अध्यात्मामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘गुण’ असतो आणि राजकारणामध्ये ‘श्रद्धा’ हाच भक्ताचा एकमेव ‘दुर्गुण’ असतो!

मोदीजींच्या या भाषणामुळे विचार करणाऱ्या सर्व भारतीय नागरिकांच्या मनात प्रश्न उभा राहिला की, ‘खाण्यात तेल कमी वापरा’ असं जर भारताच्या पंतप्रधानांना सांगावे लागत असेल, तर हे कसले ‘अच्छे दिन’? भक्तांच्या मनात अर्थातच असे प्रश्न उभे राहण्याचा प्रश्न नव्हता. मनामध्ये कुठलाही प्रश्न उभा राहत असेल, तर तो ‘भक्त’ कसला? हे सगळं घडत असतानाच पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांना हरवून भाजप जिंकला. भक्त भयंकर खुश झाले, परंतु.......

शिरोजीची बखर : प्रकरण २८ - कधी हे ‘नॅरेटिव्ह’, तर कधी ते ‘नॅरेटिव्ह’ असं करत करत ११ वर्षं निघून गेली होती. आता पितळ हळूहळू उघडं पडू लागलं होतं…

भारतासारख्या विकसनशील देशाचा पंतप्रधान कितीसा समर्थ असणार होता? पण नाही! विश्वगुरू, अवतार, समर्थ राजकारणी, धुरंधर! जितकी विशेषणं भारताला, त्याच्या दुप्पट त्याच्या नेत्याला अशी अवस्था! हे सगळं नॅरेटिव्ह अत्यंत जाणीवपूर्वक आणि काळजीपूर्वक सेट केलं गेलं होतं. एक छायाचित्र त्या काळी व्हायरल केलं गेलं होतं. मोदीजी एका खुर्चीवर बसले आहेत आणि समोरच्या टेबलावर हात ठेवून जगभरातल्या अनेक मोठ्या देशांचे प्रमुख ऐकत आहेत. .......

शिरोजीची बखर : प्रकरण २७ - लिबरल लोक चर्चा जिंकून स्वतःच्या पाठी थोपटून घेत राहिले आणि उजवे लोक मात्र चर्चांमध्ये हरले तरी निवडणुकांमागून निवडणुका जिंकत राहिले!

या बखरीमध्ये एक चांगली गोष्ट झाली! शिरोजीच्या मनात खूप महिन्यांपासून रेंगाळणारे राजू नावाचे पात्र विराजमान झाले! या पूर्वी शिरोजीने हे पात्र एका बखरीमध्ये एक प्रयोग म्हणून आणलेही होते. राजू म्हणजे चिंतनशीलता आणि सहसंवेदनेचा मिलाफ!... लिबरल आणि उजवे अशा दोघांनाही सुनावणारा… उजव्यांच्या उन्मादामुळे व्यथित होणारा… लिबरल लोकांच्या स्वतःच्या चुका न बघण्याच्या वृत्तीमुळे चिडणारा.......