टपल्या
संकीर्ण - विनोदनामा
टिक्कोजीराव
  • ‘कोल्ड प्ले’चं पोस्टर, गाय आणि राजनाथ सिंह
  • Wed , 09 November 2016
  • टपल्या टिक्कोजीराव Taplya Tikkojirao

१. पत्नी सकाळी उशिरा उठून पतीकडे चहा मागत असेल, तर ती केवळ आळशी आहे, ते काही क्रौर्य ठरत नाही. त्या आधारावर घटस्फोट मिळणार नाही : दिल्ली उच्च न्यायालयाची टिपणी

- मुळात पत्नी सकाळी इतकी उशिरा उठणार असेल आणि पतीला ती जागी होण्याआधी सकाळचे दोन-तीन तास तिचं बोलणं ऐकावं लागणार नसेल, तर पतीने चहाबरोबर ब्रेकफास्टही द्यायला हवा आपणहून. घटस्फोट कसला मागतो इतक्या गुणी पत्नीकडून!

...

२. माणसाचे आणि गायीचे जीन्स ८० टक्के सारखे, त्यामुळे गाय पवित्र : राजनाथ

- माणसासारख्या जीन्सचं प्रमाण गायीपेक्षा चिम्पांझी आणि मांजर यांच्यात जास्त आहे. माणूस आणि केळे यांच्यातही ५० टक्के जीन्स सारखे असतात, ही सगळी वैज्ञानिक माहिती छद्मविज्ञानप्रवर्तक राजनाथांना माहिती असणं शक्य नाही. पण, गाय आणि काही माणसं यांच्यातलं समान जीन्सचं प्रमाण जवळपास शंभर टक्के असावं, अशी शंका काही गोपुत्र आणि गोरक्षकांना पाहिल्यावर येते.

...

३. गरिबी निर्मूलन आणि युवकांमध्ये सामाजिक जाणीवेच्या जागृतीसाठी आयोजित केलेल्या आणि राज्य सरकारने सवलतीचा वर्षाव केलेल्या ‘कोल्ड प्ले’ या वाद्यवृंदाच्या कार्यक्रमस्थळी दारूविक्रीची परवानगी मागण्यात आल्याने गदारोळ.

- यात गदारोळ करण्यासारखं काय आहे? ‘कोल्ड प्ले’चा वाद्यवृंद ऐकण्यासाठी जे कोणी तरुण येतील, त्यांच्यात गरिबी निर्मूलनाचा आणि सामाजिक जाणीवेचा जोश उत्पन्न व्हावा असं विरोधकांना वाटत नाही का? दारू न पिता हा जोश निर्माण होऊ शकला असता, तर ही उद्दिष्टं साध्य करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्याची वेळ कशाला आली असती.

...

४. सामाजिक विज्ञानाच्या संदर्भात जगभरातल्या ख्यातनाम नियतकालिकांमध्ये २००९ ते २०१४ या काळात प्रसिद्ध झालेल्या १६ लाख ६० हजार लेखांमध्ये भारताचा वाटा अवघा १.६ टक्क्यांचा.

- काय सांगताय? फेसबुकवरच्या समाजप्रबोधनाच्या पोष्टी काउंट करत नाहीत की काय अभ्यासपूर्ण सामाजिक लेखनात? मग बरोबर. त्या मोजा, मग भारतीयांचा वाटा २००० टक्क्यांच्या आसपास निघेल.

...

५. उत्तर प्रदेशात भाजपला सत्ता द्या, ऊस पिकवणाऱ्या शेतकऱ्यांची सगळी थकबाकी सहा महिन्यांत माफ करू : राजनाथ सिंह

- अहो, थांबा थांबा काका, आधीच प्रत्येकाच्या अकाउंटमध्ये जमा झालेल्या १५-१५ लाखांचं काय करायचं, हेच ठरलेलं नाही. त्यात तुम्ही थकबाकीही माफ करणार. एवढे पैसे खर्च तरी कसे करणार बिचारे शेतकरी! शिवाय एखाद्याला हर्षवायू होऊन प्राणावर बेतलं तर.

editor@aksharnama.com

अक्षरनामा न्यूजलेटरचे सभासद व्हा

ट्रेंडिंग लेख

सुरेश प्रभू : “कदाचित देशातले पहिले मराठी पंतप्रधान नाना दंडवते झाले असते, पण माझी घोडचूक झाली. माझ्याकडून न विसरता येणारी, अशी एक चुकीची गोष्ट झाली…”

पहाटे चार-पाच वाजता निकाल जाहीर झाला. नानांनी रिटर्निंग ऑफिसरकडे माईक मागितला आणि भाषण केलं. त्यांनी मला थांबवून माझं जाहीरपणे अभिनंदन केलं. खरं सांगतो, मला निवडून आल्याचा आनंद होण्यापेक्षा नाना पडल्याचं दुःख जास्त झालं. कारण नाथ पै आणि मधु दंडवते या नेत्यांनी लोकसभेचं स्थान एवढ्या उंचीवर नेलं होतं की, असा माणूस संसदेत नसणं, हे लोकशाहीचं नुकसान आहे, असं मला वाटलं. माझ्या मनाला ते खूप लागलं.......